थापाट . . . !
मोटरसायकलीन कुणकेश्वराक जावचा ठरलला. मी सकाळीच आबा बांबार्डेकाराकडे हजर झालय! आबा बेसीनवरच्या आरशासमोर उभो रवान दाढी करी होतो. तो गालातल्या गालात हसतासा, ह्या माका आरशात स्पष्ट दिसा होता. दाढी आटापली, तयारी करुन आबा भायर इलो.
पयल्याच कीकीक आबाची बुलेट धडधडली. मी पाठी मांड टाकलय. गाडयेन वेग घेतलो. मालवणाक पोचल्यार नाश्तो करुक थांबलो. 'सकाळी दाढी करताना हसा सो होतय? सुरग्या स्वप्नात इल्ला काय रे?' मी थेट मुद्याकच हात घातलय! आबाय वाटच बघी होतो.
'सुरग्या न्हय, मेल्या तूच स्वप्नात इलय!' . . . आबा.
'मी? . . मी कसो काय?' . . . मी चक्रावलय.
'अरे, गंमतच झाली. आजची तयारी करुन नीजासर रात्री उशीर झालो. नाना खाटीच्या बाजूकच खाली जमिनीर नीजलले. फाटेक कधीतरी माका स्वप्न पडला. तू आणि मी आत्मेश्वराक प्रदक्षिणा घालतसो. देवळाच्या सायडीक माका घाण दिसली. ती बघून मी थुंकतलय होतय. तुझ्या ता लक्षात इला, तू माका थांबयलय. हयसून देवाच तीर्थ जाता, हय थुका नको, लांब त्वॉंड करून थुंक, असो सल्लो दिलय. मी तुझा आयकान लांब त्वॉंड करुन थुंकलय!' . . . स्वप्न सांगता सांगता पॉज घेवन आबा हसाक लागलो.
'पुढे?' . . . माझी आतुरता बघून आबा हसाचो थांबलो.
'पुढे, खाडकन माझ्या कानाखाली कोणीतरी आवाज काढलो. मी खडबडान जागो झालय. बघतय तर काय! खाली नीजलले नाना उठान बसलले. माका गाळी मारता, मारता पांघरुणान आपला त्वॉंड फुशी होते!' . . . गाल चोळीतच आबान सांगल्यान.
उडाणटप्पू
4 comments:
आबा आता परत सल्लो घेवच्या भानगडीत पडाचो नाय...
स्वप्नातय!
नेहमी प्रमाणेच मस्त!!��
धन्यवाद मित्रा!
Post a Comment