Saturday, July 25, 2020

सुक्यो गजाली . . .

        


फाssट . . . ढूमsss !

गंगाराम तुळपुळे ह्यो आबा बांबार्डेकराचो शेजारी. आबाच्या बापाशीच्या वयाचो. गंगारामाचे गजाली आयकण्यासारखे, धमाल! तेनी तरुणपणात काय काय दिवे लायले आसतले हेचो अंदाज त्या गजालींवरसून येय. तेचे शिकारकथा अख्ख्या आवाठात ठावक होते.

गंगारामाचा चडू दिसाक सुंदर, आबाक ता तसा भिक घाली नाय, पण 'वायच टायमपास' म्हणून आबा गंगारामाकडे घुटमळा! मध्यंतरी माका, पेद्रुक आणि नंदू इन्सुलकाराक घेवन आबा, गंगारामाक खाजवक गेलो.

'काका! तुमची ती सुप्रसिध्द बंदूक बघूची होती जरा पेद्रुक!' . . . आबान विषयाक हात घातल्यान. गंगारामान एअरगन भायर काढल्यान, 'आधी ह्या एअरगनची गजाल आयक!' गंगारामाची रेकॉर्ड सुरु झाली.

'साठातली गजाल आसा ही! सशाच्या शिकारीसाठी रानात गेल्लय. ससो गमाक नाय, पण एका झाडार कवडो दिसलो, म्हतला कवडो तर कवडो! पोझिशन घेतलय आणि चाप ओढतलय इतक्यात पायाकडे कायतरी सरसरला. मान न हलयता नजर खाली केलय, बघतय तर काय, ससो! माझी झाली पंचायत! कवडो पाडूचो, तर ससो पळतलो आणि सशाक गुळी घालूची तर आवाजान कवडो उडतलो! . . . ' गंगारामान पॉज घेतलो.

'मगे?' . . . आम्ही चौघय उत्सुक. 

'मगे काय? क्षणभर विचार केलय. पोझिशन कायम ठेयलय. कवड्यार नेम धरललोच होतो, हळूच पाय वर उचललय आणि फाssट-ढूमsss. एकाचवेळी पायाखाली फाटदिशी ससो चिरडलय आणि कवड्यार ढूमदिशी बंदूक चलयलय!' . . . गंगाराम.

उडाणटप्पू

No comments: