Saturday, October 31, 2020

सुक्यो गजाली . . .

अर्धमागधी

                
                  आम्ही शाळेत आसतानाची गजाल. संस्कृत कठीण वाटणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा अर्धमागधी नावाचो विषय होतो. आमी वीस-पंचवीस जाणांनी दहावी आणि अकरावीक तो विषय घेतललो. फक्त आमच्याच शाळेत तो शिकयत. पेद्रु गोन्साल्विस महाढोरगो ! त्येका, तोय विषय कधी समजाक नाय.

              
             एकदा त्या विषयाचो तास सुरू आसतानाच इन्स्पेक्टर तपासणीसाठी इले. आमच्या सरांका घाम फुटलो. इन्स्पेक्टरान नेमक्या पेद्रुकच उठयल्यानी. धडो वाचूक सांगल्यानी. ह्येच्याकडे पुस्तकय नाय होता. बाजूक आबा बांबार्डेकार बसललो. पेद्रुन त्येचा कसलातरी पुस्तक ओढल्यान आणि धडाधड कायमाय वेगळ्याच भाषेत बडबडाक सुरवात केल्यान.

      
   बिचारो इन्स्पेक्टर, त्येकाय अर्धमागधी ख्येच्यावांगडा खातत ता ठावक नाय होता.

   
' ठीक आसा ठीक आसा',म्हणीत तो वर्गातसून भायर पडलो!


उडाणटप्पू

Friday, October 30, 2020

सुक्यो गजाली . . .

डबल बारी

    आबा बांबार्डेकाराच्या मेव्हणेक जुळा झाला. दोनय चडवाच. दोघांका सांभाळता सांभाळता मेवणेचो जीव मेटाकुटिक येय. आबाच्या बायलेक भयनीची दया येय.

' आमका याक चडू सांभाळताना नाकी नव इले. तू कसा सांभाळतय दोघांका, कोणाक ठावक.' . . . आबाची बायल

' कोणाक कित्याक ? माकाच ठावक. करतलय काय, सांभाळूक होयाच.' . . . मेवणी

' पण काय गो ! मदतीक कोण ठेयलसय मा ?' आबाची बायल

' सासू आसा ती काय ! . .नाय तरी तिका खय काय काम
 आसता ?' . . . मेवणी

' सांभाळता ?' . . . आबाची बायल

' नाय सांभाळून सांगता कोणाक ?' . . . मेवणी

' पोरगी वगी रवतत ?' . . . आबाची बायल

' दिवसा रवतत . . दिवसाची ती सांभाळता, रात्रीचा मी !' . . . मेवणी

' रात्री रडतत ?' . . . आबाची बायल

' रडतत ? . . डबल बारी आसता !' . . . मेवणी

उडाणटप्पू

Thursday, October 29, 2020

सुक्यो गजाली . . .

श्रीमंती कोकणची !

आबा मध्यंतरी मुंबैक गेल्लो. थय एका कार्यक्रमात त्येची एका श्रीमंत माणसावांगडा ओळख झाली. आबाक घेवन तो एका फाई‌व्ह स्टार हॉटेलात जेवक गेलो.

   चिकन, मासे, सुंगटा खाता खाता आबान त्येका इचारल्यान,
'आपण ह्या, जा काय खातसो; त्येचा बिल साधारण काय‌ जातला !'

' जायत पाच- सहा हजार रुपये !' . . . तो

' काय ?' . . . आबा किंचाळलोच

' किंचाळा नकोत, . .बिल मीच दितलय ! . . . तो

' ता झालाच हो ! . .पण आमच्या कडच्या आर्थिक दृष्ट्या मागासांचा वार्षिक उत्पन्न अठ्ठेचाळीसशे रूपयांपेक्षा कमी आसता. ईबीसी ची सवलत गावता त्येंका !' . . .आबा

' खराच की काय ? . . जगतत कशे ते ? . . परवाडता कसा त्येंका? . . खातत तरी काय ते ?' . . . तो

' दोन टायम पेज- निवळ आणि तोंडाक कातळी !' . . .आबा

' तर मग ते खूपच श्रीमंत म्हणाक होये !' . . .तो

' कशे काय ?' . . .आबा

' ह्या मेनू कार्ड वाच ! . . ह्येच्यातली मुख्य डिश बघ ! . . सगळ्यात म्हाग आसा ती !' . . . तो

' राइस सूप विथ कोकोनट पिस !' . . . आबाचे शब्द घशातच अडकले.

उडाणटप्पू

Wednesday, October 28, 2020

सुक्यो गजाली . . .

सुरग्या सध्या काय करता ?

        कधी नाय तो आबा परवा एस्टीन कुडाळाक जाय होतो. डोक्यात जुने आठवणी येय होते. कॉलेज जीवनातले ! ' सुरग्या सध्या काय करत आसतला ?' ह्या विचारान आबा सैरभैर झालो. झाराप इला. बरेच प्रवासी उतारले. तितकेच चढले. काय आश्चर्य ! चक्क सुरग्या आपल्या धाकट्याक घेवन गाडयेत चढला. आबान बाजूची रिक्यामी शिट सुरग्याक दिल्यान.

' तुझीच आठवण काढी होतय !' . . . आबा

' वगीच सांगू नको कायतरी !' . . . सुरग्या

' तुझ्या घरच्यानी विरोध केल्लो नसतो, तर लगीन झाला आसता आपला !' . . . आबा

' हू !' . . . सुरग्यान सुस्कारो सोडलो.

' तू आत्महत्येची धमकीच दिल्लय म्हणता !' . . . आबा

' हू !' . . . सुरग्या

' मगे आवस काय म्हणाली ?' . . . आबा

' ह्याच ! हेरशी त्या आबा बांबार्डेकारावांगडा लगीन करून तू आत्महत्येशिवाय दुसरा काय करतलय ? असा इचारल्यान !' . . . . सुरग्या

' चल, कुडाळ इला ! मी उतरतय !' . . . आबा पिंगुळेतच उतारलो !

 उडाणटप्पू

Tuesday, October 27, 2020

सुक्यो गजाली . . .


कवटा खातलंय . . . कवचे खा !

     ॲक्सीडंट झाल्लल्या हाताची हाडा जुळत इल्ली. गोळये लिवन दिता दिता डॉक्टरान आबाक पत्थ्य सांगल्यान. सगळा शाकाहारी. पालेभाजी.

आबा करवादलो, ' मासळी, हिवळान काय नाय ?'

' तुमी शाकाहारी काय मांसाहारी ?'

' तसो मिश्रहारी !'

' कवटा . . . .'

' खातय, खातय !'

' रोज दोन मस्त कवटा घ्यायची !'

' ओके !' . . . आबा खुश.

' फोडायची !'

' फोडली !!'

' भितरलो पांढरो आणि पिवळो बलक फेकून द्यायचो !'

' काय s s s ?' . . . आबा किंचाळलो.

' आयका ! कवचे जाळायचे आणि त्येची राख मधातसून चाटायची ! कुक्कटांड भस्म म्हणतत त्येका ! हाडा लवकर सांधतत !'

उडाणटप्पू

Monday, October 26, 2020

सूक्यो गजाली . . .


साखरेचे खाणार . . .

      नंदू इन्सुलकाराक प्रमोशन गावला. पक्षान त्येका तालुका समितीचो अध्यक्ष केलो. नंदू खुष. संध्याकाळी पेढ्यांचो बॉक्स घेवन इलो. बॉक्स उघडतुकच पेद्रु गोन्साल्विसान एकदम दोन पेढे उचलून तोंडात टाकल्यान. पेद्रुची सवयच आसा म्हणा ती. हॉटेलात चहा-बिस्कीटा मागयली काय तो दोन, दोन बिस्किटा एकदम चहात बुडयता. तसाच आताय केल्यान.

' साखरेचे खाणार त्याला देव देणार !' . . . पेद्रुन म्हण सांगल्यान.

' पेद्र्या ! खव्याचे आसत ते पेढे !' . . .नंदू

' पण भितुर साखर आसाच मा ! म्हणान साखरेचे खाणार त्याला देव देणार !' . . . पेद्रु

' देव काय देणार ? . . . डायबेटिस ? . . . आबा कळवाळलो.

उडाणटप्पू

Sunday, October 25, 2020

सुक्यो गजाली . . .

फटाक्यांचा विष

  झिल खूपच कळीक इलो म्हणान नंद्या इन्सुलकारान त्येका पेटारे, केपी, फेस्तुल, नारींगणा, भुईचक्रा, बाण, चंद्रज्योत असला कायमाय घेवन दिल्यान. घराकडे येवन तो ह्या सगळा वाजवक लागलो. आवस वैतागाक लागली. परत,परत झिलाचे हात धुवक लागली. झिलय वैतागललो, ' आई, हात परत, परत शे धुताय ?'

' अरे ! विष ता, पोटात जायत तर मराक जायत !' . . .आवस

' बाप रे !' . . .झिल चिंतेत पडलो.

संध्याकाळी नंदू घराकडे इल्यार, तो बापाशिकडे इलो. आवसय पुढ्यात होती .

' बाबा ! आता विषाची भिती नाय !' . . .तो

' कशी रे ?' . . . आवस

' परत परत साबणान हात धुण्यापेक्षा, मी सगळे फटाकेच साबणान धुवन टाकलंय !' . . . तो

उडाणटप्पू

Saturday, October 24, 2020

सूक्यो गजाली . . .

दिवड !

आबा बांबार्डेकाराच्या घरात साप घुसलो. सगळ्यांची पळापळ झाली. साप पकडण्यात नंदू इन्सुलकार पटायत.आबान त्येका फोन करून बलयल्यान.


नंदू येयसर साप खयतरी अडगळीत जावन लपलो. नंद्यान इल्यार धुरी घातल्यान. साप हळूच भायर पडलो.


' अरे ! ह्यो दीवड !' . . . नंदू
नंद्यान तो दिवड पद्धतशीर पकडल्यान आणि रानात सोडल्यान. 


तो परत इल्यार आबाच्या बायलेन त्येका मस्तपैकी फॉव आणि चा दिल्यान.


' नंद्या तू येळेर इलय म्हणान बरा झाला !' . . .आबा


' पण का हो भावजी ! दिवड चावलो तर वायट मा?'. . . आबाची बायल


' होय. दिवडाक !' . . . नंदू


उडाणटप्पू

Friday, October 23, 2020

सुक्यो गजाली . . .



टवळा

आबा बांबार्डेकाराच्या मेव्हणेसाठी आबाच्या भावान स्वर्गत आणलली. मुंबैसून तो फोनवर नवऱ्या मुलाची म्हायती दिय होतो.

' पोरगो गोरो धयो आसा. उंच आसा. नोकरी बरी आसा.फक्त पुढचे केस कमी आसत, इतक्याच.पण तू जरा ह्येच्यावांगडा बोल !' . .  आबाच्या भावान फोन आपल्या बायलेकडे दिल्यान.

' भावजी ! पोरगो छानच आसा. हातचो सोडू नकात. पाठसून केस जरा विरळ आसत इतक्याच !' . . . आबाच्या भावाची बायल

आबा भिरभिरलो. दादा सांगता, पुढचे केस नाय. वैनी सांगता पाठसून विरळ. तरी पुतणो आणि पुतणी फोनवर येवक नाय. त्येंच्यापैकी एकान डावीकडचे केस पातळ आणि दुसऱ्यान उजवीकडचे विरळ असा सांगल्यान आसता तर . . .?

उडाणटप्पू

Thursday, October 22, 2020

सुक्यो गजाली . . .


लॉटरीची किमया !

         गंप्या सुताराक लॉटरी लागली. बरे लाखभर रुपये गावले. हेरशी गंप्या, गंपू, गणप्या म्हणून हाक मारणारे आवाठकार त्येका चक्क गणपती म्हणून आदरान साद घालू लागले. आबा, नंदू, पेद्रु तसे गंप्याचे लंगोटी यार. ते सुध्दा त्येका गंपोच म्हणीत. त्येचा खरा नाव गणपती, ह्या त्येंकाय ठावक नाय होता.

  लॉटरी लागली त्येवा नंदू मुंबैक होतो. इल्या, इल्या तो गंप्याकडे गेलो, 
' काय गणपतराव ! लॉटरी लागली म्हणता, तुमका लाखाची !'

' होय, लागली ! पण ह्यो गणपतराव, तुम्ही . . ह्यो काय   प्रकार ?' . . . गंपो

' मी मुंबैक गेल्लय ! अभिनंदन करुक वायच लेट झालो. ह्येचो अर्थ मी तुमका इसारलय असा समजा नकोत ! गणपतीक कोण कसो इसरात ? ता तर आमचा आराध्य दैवत !!' . . .नंदू

' मगे, कधी बुडयतास ?' . . . गंपो

उडाणटप्पू

Wednesday, October 21, 2020

सुक्यो गजाली . . .


संसर्ग

      देशात कोरोना नुकतोच पसरुक लागललो, तेव्हाची गजाल !
आबा बांबार्डेकार सकाळी सकाळीच भायर पडलो. मोकळी हवा घेवच्यासाठी आणि प्वॉट कमी करूच्यासाठी तळ्याक राऊंड मारल्यान. तसोच पुढे पेपर घेवच्यासाठी पेपरवाल्याच्या स्टॉलार गेलो. बघता तर तोंडाक रुमाल.

' फडको सो बांधलय ?' . . . आबा

' फडको न्हय तो. मास्क तो !' . . . तो

' थंडीसाठी ?' . . . आबा

' छा ! कोरोना !' . . . तो

' हय खय आसा ? पुण्याक आसा तो !' . . . आबा

' पुण्यासूनच पेपर येतत !' . . . तो

' पेपरावांगडा फुकट गावता मास्क ?' . . .आबा

' फुकट न्हय रे ! पुण्याच्या पेपरवांगडा थयलो कोरोना इलो तर वगीचच किल्लेस नको !' . . . तो

' बरोबर आसा ! असा म्हणीत पेपर न घेताच आबा परातलो. घराकडे इलो. तितक्यात रिंग वाजली, आबान नंबर बघल्यान,

' गो ! तुज्या भयनीचो आसा, पुण्यातसून !'

   आबाची बायल धावतच इली. पण आबान तिका थांबयल्यान,
' थांब, थांब ! घेव नको. फोन पुण्याचो आसा. तोंडाक फडको बांधून मगे बोल !'

उडाणटप्पू

Tuesday, October 20, 2020

सुक्यो गजाली . . .

बर्थ- डे पार्टी

  कॉलेजात आसताना, वर्षभर आबा भटवाडीत खोली घेवन रवा ! थय सुध्दा त्येनी आवाठकार गोळा केल्ल्यान. वाढदिवसाक सगळ्यांका जेवाण दिवचा आबान कबुल केल्ल्यान.


वाढदिवसासाठी कॉलेज आटोपून आबा खोलयेर इलो. थय सगळे आलेमाव- कोलेमाव आधीच जमलले. संध्याकाळी गजाली आटापल्यार आबा सगळ्यांका घेवन हॉटेलात गेलो. जेवाण मागयल्यान.


' ह्या आसला ? गवात ? आमका नको !'


' म्हंजे, तुमी खटाव- खटाव खातास ?' . . . आबा


' भायर खातो ! घरात नाय !'


' अरे देवक्या ! माका वाटला, मुळे, भेंडे, पडवळ, दोडके आडनावाचे तुमी ; शाकाहारी आसतल्यात ! नाय तर मी तरी खय जेवाण कबुल करतलय आसतय !'


उडाणटप्पू

Monday, October 19, 2020

सुक्यो गजाली . . .



आबाची स्वर्गत

      आबा बांबार्डेकाराच्या तरुणपणातली गजाल. आबाक खूप स्वर्गती येयत. पण आबाक पोरग्याच पसंत पडा नाय.

' आबा अशीच पोरगी नाकारीत रवलय तर म्हातारो जातलय. पोरगी संपतली आणि कोणय गळ्यात पडतला, ता स्विकारुक लागतला.' . . . आमी आबाक समजायला

' काय करु ? प्रत्येकात काय ना काय तरी दोष आसता !' . . . आबा

' आबा ! हयती मास्तरकी सोड.तू काय निर्दोष आसय ?'. . . आमी

   त्याच दरम्यान याक पोरग्या बघूक आमी आबा वांगडा गेलो. आबान पोरग्याक नाव, गाव, जन्मतारीख इचारल्यान. पोरग्यानय त्येच प्रश्न आबाक इचारल्यान.


' जेवाण, मासे, मटण, करुक येता ?'. . . आबा


' होय ! तुम्का येता ?' . . . ता


' नाय ! . . . गाना येता ?' . . . आबा


' होय ! . . . तुम्का ?' . . . ता


' नाय ! . . . शिवणकाम, विणकाम ?' . . .आबा


' येता ! . . . तुमका येता ?' . . .ता


' अगो ! माका जर ह्या सगळा येयत आसता, तर बायल ख्येका शोधतलय होतय !' . . . आबा उठलो !

उडाणटप्पू

Sunday, October 18, 2020

सुक्यो गजाली . . .

चवळेची शेंग

       संक्रांतीच्या हळदीकुंकूच्या निमतान घराची झाडलोट सुरू होती. तितक्यात आबाच्या बायलेक जुने लग्नाआधीचे अल्बम गावले.बाजुकच आसलल्या चडवान सोमती त्येचार डावली मारल्यान.


' आई ! ह्ये कोणाचे फोटो ?'


' माजेच ते !' . . . आवस


' स्कर्ट -पोलक्यात ?' . . . चडू फिदी फिदी हसला.


' अगो, लग्नाआधीचे ते ! कॉलेजात आसतानाचे !' . . . आवस


' इतकी बारिक ? . . . चडू


' म्हणजे काय ? चवळेच्या शेंगेसारख्या होतय, चांदणी म्हणीत माका ! ' . . . आवस भूतकाळात


 शिडयेर चढान पंखो साफ करता, करता आबा खदखदान हसलो. 


' आता, तुमका काय झाला, दात काढूक ?' . . . बायल


' तो भूतकाळ झालो, वर्तमानाचा बोल ! अगो आता तुझो झालोसा वटवृक्ष ! आता चांदणी कोण म्हणीत तुका ? खूपच तर चांदोबा म्हणतीत' . . . आबा


उडाणटप्पू

Saturday, October 17, 2020

सुक्यो गजाली . . .

आळस !

     आबाचा चडू खूपच मस्तीखोर ! बालवाडीत आसानसुध्दा ज्येचे, त्येचे कळी काढी. कोणाक चिमटे काढ, कोणाक ढकल, असले उपद्व्याप. बाई रोज थापटत त्येका. एकदा कंटाळान बाईनी आबाक शाळेत बलवन घेतल्यानी.

' ह्या तुमचा चडू खूपच मस्ती करता. आमका परवडाचा नाय. जरा
शिस्त लाया त्येका !' . . . बाई

' तुमी त्येका पयल्या बाकड्यार बसया !' . . .आबा
 
     बाईनी दुसऱ्या दिवसापासून त्येका पयल्या बाकार बसाक लायला. पण ता हळूच बाईंची नजर चुकवन पाटच्या बाकड्यार बसाक लागला. बाईंची परत तक्रार !

   त्या दिवशी घराकडे इल्यार आबान चडवाक जवळ घेतल्यान,
   ' बेबल्या ! इतकी मस्ती शी करतय ? तुका बाईंनी पयल्या बाकड्यार बसयला मा, मगे तू हळूच पाठीसा जातय ?

' बाई पट्टेन मारतत !' . . . बेबला

' पाठी बसल्यार मारनत नाय ?' . . . आबा

' त्येंची पट्टी थयपर्यंत पोचनाच नाय !' . . . बेबला

' मगे, उठान नाय मारनत ?' . . . आबा

' छा ! त्येंका खुर्चेतसून उठाचो कंटाळो येता !' . . . बेबला

उडाणटप्पू

Friday, October 16, 2020

सुक्यो गजाली . . .

    
    आसना

    आबा मध्यंतरी खूपच अस्वस्थ होतो. हातपाय दुखत, सर्दीन ज्याम झाल्लो. जीवाक ज्याम वैतागललो. सगळे उपाय झाले ; सगळे डॉक्टर झाले. गावठी औषधा झाली; झाडपालो झालो. पण कायच गूण येयना. 

एकदा रात्री त्येका नीजच येयना. रात्रभर अंथरुणात वळवळा होतो. तो अस्वस्थ आसल्याकारणान, त्येची बायल सुध्दा सैरभैर.

' काय हो ! . . .बरा वाटनासा नाय ?' . . . ती

' नीजच येयना !' . . . आबा

' तुम्ही उद्यापासून आसना करा !' . . .ती

' कसली करू ?' . . . आबा

' शवासन करा !' . . .ती

' ता नंतर करूचाच आसा !' . . . आबा

' मस्करी नको हो ! . . प्राणायम तरी करा !' . . .ती

' प्राणा -यम ? . . बापरे !' . . .आबा

' त्येतुर, बापरे काय ?' . . .ती

' प्राणाचो आणि यमा चो जवळचो संबंध . . भानगड नको !' 
. . .आबा करवादलो आणि घुसमाट मारून नीजान दिल्यान !

उडाणटप्पू

Thursday, October 15, 2020

सुक्यो गजाली . . .

भजी

     आबा बांबार्डेकार संध्याकाळी ऑफिसातून घराकडे इलो. भायर धो- धो पाऊस ओता होतो.

' काय गो ! . . . पावस थंड पडतासा नाय ?. . भजी- बिजी भाज गरमागरम !' . . . आबा

     ' होय भजी ! . . दुपारपासून पडवेची गळतवणी काढीसर    माजाच भजा झालासा . . .आणि बेसन तरी खय आसा ? . . बाजारात जावन आणतास तर बघा . . रात्री जेवताना तोंडाक भजी करीन !' . . . बायल

         बायलेन दिल्लो चिवडो आणि बिस्कीटा खावन आबा परत बाजारात गेलो. तितक्यात रिंग वाजली. बायलेचो फोन होतो.

' काय गो ! . . कांदे इसारलय सांगूक ?' . . . आबा

' कांदे आणाच . . पण असा करा, . . येताना आनंद भुवनातली भजी आणा !' . . . बायल

 उडाणटप्पू

Wednesday, October 14, 2020

सुक्यो गजाली. . .

 


हत्तीरोग

        आबा आणि पेद्रु, आबाच्या घराकडे बसान गजाली मारी होते. आयतवार आसल्याकारणान आबाकय ऑफिस नाय होता. तितक्यात नंदू स्कूटरीन इलो. ज्याम घाबरो- घुबरो झाल्लो.


' आबा ! आमच्या पाटल्याराक याक केलडा मरान पडलासा'


' सोमता जाळून टाक, नायतर जमनीत गाडून टाक.'. . .आबा


' ती व्यवस्था करुनच इलय. पण माकडताप नाय मा होवचो?'

. . . नंदू


' नाय होवचो ! पण खबरदारीचो उपाय म्हणान डॉक्टरचो सल्लो घेतल्या बरो !' . . .  आबा


' आबा, एक शंका म्हणान इचारतय !' . . . पेद्रु


' इचार !' . . . आबा


' माकडताप माकडांमुळे, लेप्टो, प्लेग उंदरांमुळे, स्वाईन फ्ल्यू डुकरांमुळे, बर्ड फ्ल्यू कोंबड्यांमुळे, मग हत्तीरोग हत्तींमुळे होता काय रे ?' . . . पेद्रु


उडाणटप्पू

Tuesday, October 13, 2020

सुक्यो गजाली . . .

ऑर्डर

            आबाचा नुकताच लगीन झाल्ला. बायल खेड्यातली. कमी शिकलली. लग्नानंतर रोज, रोज दुशिकडल्या पावण्यांकडे वरणभात खावन कंटाळललो. आबा बायलेक घेवन थेट एका चायनीज रेस्टॉरंटात गेलो.

        आबान स्टायलित वेटराक बलयल्यान. वेटर इलो.पाणी ठेयल्यान आणि ऑर्डर घेवची चोपडी हातीत धरल्यान. आबान काय- काय आसा ता इचारतुकच, वेटरान चायनीज पदार्थांची यादी सुरू केल्यान, 
       ' चिकन चिली, चिकन मंचुरियन, चिकन च्याव- च्याव, चायनीज म्याव- म्याव . . .'

' पुरे, पुरे, पुरे ! . . . तुमच्याकडे माणसान खावचे पदार्थ कायच नाय ?' . . . आबाच्या बायलेन वेटराक थांबायल.

' म्हणजे ?' . . . वेटर चकीत

' म्हणजे . . . वरणभात, डाळीचा सांभारा , वालिची भाजी, वाटाण्याची उसळ,  रव , कुळथाची पिठी , पिठला, भाकरी ,
किमान पेज तरी . .?' . . .आबाची बायल

उडाणटप्पू

Monday, October 12, 2020

सुक्यो गजाली . . .

अभ्यासाचे कंटाळो

     यंदापासून बालवाडीत जाणारो नंद्या इन्सुलकाराचो झिल, अभ्यास सोडून बाकी सगळ्या बाबतीत प्रगती दाखय होतो. गुरुजींनी त्येका वर्गाचो मॉनिटर करून टाकलो.

गुरुजी खूप अभ्यास दितत ह्येचो त्येका खूप राग ! रोज-रोज अभ्यास कशाक करायचो ह्याच त्येका कळा नाय होता.

परवा असाच झाला. नंदू त्येका शाळेतसून घेवन येय होतो. येताना त्येचे एकेक कारनामे आयका होतो, ' बाबा ! अभ्यास कशाक करुक होयो ? कंटाळो येता !' . . . झिल

' मोठो जावच्यासाठी अभ्यास करूचोच लागता बाळा !' . . .नंदू
तितक्यात तळ्याकडे गर्दी दिसली. दोघय झिल- बापूस थय गेले. बघतत तर तळ्यात भली मोठी मगर !

' बघलय मगर ?' . . .नंदू

' बाबा ! ती माणसाक खाता ?' . . . झिल

' म्हंजे काय ? सहज !' . . . नंद्यान भिती घातल्यान.

' बराच झाला तर मग !' . . . झिल

' कित्याक रे ?' . . . नंदू

' आमचे गुरूजी रोज तळ्यात पोवक जातत !' . . . झिलान खुशीत सांगल्यान.

उडाणटप्पू


Sunday, October 11, 2020

सुक्यो गजाली . . .




ऐका दाजीबा !

आबा नटा होतो, तितक्यात त्येच्याकडे एक इसम इलो. घाटावयलो. हयच स्थायिक झाल्याकारणान तोडक्या, मोडक्या
मालवणीत बोला.

' बांबार्डेकर, आज खय ?' . . . तो

' मालवणाक . . मालवणी सम्मेलनाक !' . . .आबा

' अहो, सगळा ग्लोबल होतासा, आणि तुम्ही हय आजून मालवणीचो जप करतासात !' . . .तो

' आमका मालवणी ग्लोबल करूची आसा !' . . .आबा

' करा बापडे ! . .असली संम्मेलना भरवन तुमची मालवणी ग्लोबल जातली ?' . . .तो

' दाजीबा, देवगडचो हापूस जगभर जाता ! . . जाता मा ?'
. . .आबा

' होय, जाता !' . . .तो

' वेंगुर्ल्योची सुंगटा, . .काजी खावक लोक जीव घालयतत ! .
. . घालयतत मा ?' . . .आबा

' होय घालयतत !' . . .तो

' बांगड्याचा तिखला . . . खातास मा ?' . . .आबा

' होय, खातो !' . . . तो

     ' पाणी सुटला जिभेक ? . . . ह्या सगळा मालवणी आसा.
तशीच आमची भाषा ! . . . तुमी बोलतासच मा ? . .पुढे जग बोलात ! . ‌. . ही सुरुवात आसा !!' . . . आबा

उडाणटप्पू

Saturday, October 10, 2020

सुक्यो गजाली . . .


टोप

               ठरल्याप्रमाणे नंद्या इन्सुलकाराचा कुटुंब आबा बांबार्डेकाराकडे जेवक इला.


' वैनी ! चिकन झक्कासच झालासा !' . . . नंद्यान प्रमाणपत्र दिल्यान.


' होय काकी ! . . बेश्टच !' . . . चिंग्याचा अनुमोदन


' आवाडला मा तुम्का ! . . चिज झाला कष्टाचा !' . . . आबाची बायल


' माका नंतर रेसिपी सांग हा !' . . . नंद्याची बायल


' वैनी ! . .ह्या कायच नाय ! . . ह्येची आवस, आमची सासू ! जा मटण करता ता ! . . भन्नाट . .खरी रेसिपी तिच्याकडसून घे !'. . .आबा


' पुरे झाला, सासयेचा कौतुक ? तिच्याकडसूनच शिकलय
 मी ! . . . आबाची बायल


' तरी पण, ती चव नाय तुज्या हातीक !' . . .आबा


' इतक्या कौतुक करतासात, तर परवा तिचो वाढदिवस आसा . . दिया कायतरी भ्याट तिका !' . . . आबाची बायल


' दितलय तर ! . . नक्कीच दितलय !' . . .आबा


' काय, दितल्यास ?' . . .आबाची बायल


' टोप !' आबान मटणाच्या टोपाकडे ब्वॉट केल्यान,
' हाड तो टोप इकडे. . . वायच फोडी वाढ !' . . . आबा


उडाणटप्पू

Friday, October 9, 2020

सुक्यो गजाली . . .

गाय - वासरू

         आबाची बायल नाय थयली फटकळ! आबा आणि नंदूची दोस्ती आसल्याकारणान, दोघांच्या बायलेंचाय आपसात बरा पटता असोच सगळ्यांचो समज. पण घराक इल्यार, आबाची बायल नंद्याच्या बायलेच्या नावान शिमगो घाली. 

  ' ती अशीच, आणि ती तशीच; . . . खावन- खावन नुस्ती म्हस कशी झालीसा,' असा म्हणी.

' आसाना, खायना . . . तुझा काय जाता ?' . . . असा म्हणून आबा विषय टाळी.

   मध्यंतरी नंद्याचा चडू परीक्षा संपल्यार, सुटयेर गावाक इला. त्या निमतान नंद्यान, आबाक बायल- पोरांसकट जेवक बलयल्यान.

    रात्री जेवाण झाल्यार, जाता-जाता आबाच्या बायलेन, नंद्याच्या चडवाक आपल्याकडे जेवणाचा आवतण दिल्यान,' गो चिंग्या!
आयतवारा आमच्याकडे जेवक ये ! कोंबो मारया !'

' चिंग्याकच बलयतय, . . .माका नाय?' . . .नंद्याची बायल

' तुका आणखी वेगळा आमंत्रण ख्येका दिवक होया? वासरू इला, काय म्हस आपसुकच येतली !' . . . आबाच्या बायलेन जीभ चावल्याने !

उडाणटप्पू

Thursday, October 8, 2020

सुक्यो गजाली . . .


सूचना

      आबा बांबार्डेकाराच्या घराचा बांधकाम सुरू होता, त्येवाची गजाल. आबाच्या आग्रहावरसून मी आणि नंदू  बघुक गेलो. आबान आमका सगळो प्लान समजावन सांगल्यान.
 
     'पण आबा, वरती सगळा ओपन टेरेस ठेव नको !' . . . नंदूची सूचना

' अरे ! मस्त चांदणे, तारे बघुक गावतत. शिवाय कोजाग्री, इअर एंडींग करुक बरा !' . . . आबाची कल्पना

' पावसात काय करतलय ? त्येच्यापेक्षा एक काचेची रूम      कर!' . . . नंदू

' होय रे होय ! तिका ' ग्लास रूम ' म्हणायचा !' . . . आबा

तितक्यात पेद्रु गोन्साल्विस येवन टपाकलो. त्येच्या तितक्याच कानार पडला.

' वरती ग्लास रूम बांधतसय ? बांध, बांध ! आमची सोय ! 
घेवक गावतला ? ग्लासा मी दितय. परवाच चुलत्यान फॉरेनसून आणल्यान !' . .  पेद्रु

उडाणटप्पू

Wednesday, October 7, 2020

सुक्यो गजाली . . .

  सागर  
            आबा बांबार्डेकाराक दुसऱ्यांची मापा काढूची मोठी  खोड! कधी कोणाची त्येच्या रंगावरसून, तर कोणाची त्येच्या शिक्षणावरसून केंड करण्यात त्येका खूपच आनंद वाटा.

    परवा असाच झाला. पेद्रु गोन्साल्विसाच्या आग्रहावरसून आमी त्येच्या मूळ गावाक आरलेक गेलो. रात्रभर धुमशाना घातली. सकाळी समुद्रार कुदलो. समुद्र पाटल्याराक! मजा केली!

     दुपारी जेवन् खावन् आरामात पत्ते कुटीत बसलो आसताना, पेद्रु आपल्या गावाचे फुशारके मारुक लागलो.

' पेद्र्या ! वगीच ख्येका मोठेपणा सांगतय, आमी शहरात मासे खातो, त्येच्यार तुमी जगतास ! खेड्यात काय आसा ? ना धड शिक्षण, ना धंदो ! प्रगती फक्त शहरातच होता ! जरा मोठ्या क्षेत्रात या ! सागरात पोवक शिका !' . . . आबा

   ' आबा ? वाडिक सागर कधी इलो ? तळा मरे ता ! सागर हाय आमच्या पाटल्याराक ! आमकाच सागरात पोवक शिकयतय !' . . . पेद्रुन आबाचा बऱ्यापैकी माप काढल्यान !

उडाणटप्पू

Tuesday, October 6, 2020

सुक्यो गजाली . . .

 वॉशिंग मशीन 

     आयतवार होतो ! . . . सुरग्या सकाळीच आबा बांबार्डेकाराच्या घराकडे इल्ला !

' काय गो सुरग्या ! . .आज हय खय वाट चुकलय ?' . . .आबाची बायल

'हयसून जाय होतय, ता म्हतला जाता, जाता हटकुया !'. . .सुरग्या

' हटकुक हे आसत खय ! . . सकाळीच गेलेसत मटण आणूक मार्किटात !'. . .आबाची बायल

' खराच की काय ?' . . . असा म्हणीत सुरग्यान आबाच्या बायलेक कपडे सुकत घालूक मदत सुरू केल्यान.

' वैनी ! . . .कपडे इतके ओले कशे ? मशिनीत पिळूक नाय ?'
. . . सुरग्या

' म्हंजे ह्यो काय प्रकार ?' . . . आबाची बायल

' ड्रायरात टाकूक नाय ?' . . . सुरग्या

' ता काय आसता ?' . . . आबाची बायल

' मशीन खय तुझी ?' . . . सुरग्या

' पाटल्याराक ! . . न्हाणयेकडे !' . . .असा म्हणीत आबाच्या बायलेन आपली सेमी ऑटोमॅटिक मशीन सुरग्याक दाखयल्यान.

' अगे ! . . .ह्या कप्प्यात धुल्ले कपडे, बाजूच्या कप्प्यात टाकून सुकवचे आसतत !' . . . सुरग्या

       ' खराच की काय ? . . माका ठावकच नाय ! . .मी      समाजतसय, पयलो कप्पो बिघाडलो तर दुसरो वापरायचो      म्हणान !' . . .   आबाची बायल

उडाणटप्पू

 



Monday, October 5, 2020

सुक्यो गजाली . . .


ॲक्सिडंट

  'पेद्रुक ॲक्सिडंट झालो . . . हॉस्पिटलात आसा . . लवकर ये !' आबा बांबार्डेकाराक नंदू इन्सुलकाराचो फोन इलो. आबा सोमतो धावलो. हॉस्पिटलात इलो. तितक्यात नंदूय येवन पोचलो. पेद्रुचो पाय फ्रॅक्चर झाल्लो. तंगडा वर करून खाटीर आडवो पडललो.

' काय रे ! काय झाला ? . . . सकाळीच घेतलय काय ? . . .आबा करवादलो.

' नाय रे ! . . .माका स्कुटरीन धडक दिल्यान !' . . . पेद्रु

' कोण तो ! . . . मारू नये कानफटात ?' . . .नंदू

' तो नाय ती होती !' . . . पेद्रु

' पोलिसात तरी कंप्लेंट दिलंय ?' . . .आबा

' कोणाविरुद्ध दितलय ? . . आपलेच दात . . आपलेच ओठ !' . . .पेद्रु

' अरे पण दात पडले, ओठ फुटलो त्येचा काय ? . . कोणय आसाने . . . आपण कंप्लेंट करुक भ्यायचा नाय !' . . .आबा

तितक्यात आबाची बायल धावतच इली. तिच्या हातीत औषध आणि खावक होता.

         ' बरा झाला तुम्हीच इल्यात ते ! . . ती स्कूटर आधी   दुरुस्तीक टाका ! ब्रेकच लागनसत नाय . .  तरी माझो स्पीडय रोजच्या सारखो नव्हतो म्हणान बरा !!' . . . आबाची बायल 

उडाणटप्पू

Sunday, October 4, 2020

सुक्यो गजाली . . .

  
 

 प्रमोशन  

             आबा प्रमोशनाक ड्यू होतो. पण सायबाची मर्जी आवश्यक होती.एकदा आबान सकाळी-सकाळीच बायलेक सांगल्यान,

' आज सायेब येवचो आसा मुंबैसून !'

' म्हणजे तुमी आज भुस्कटावक भायर तर ?' . . . बायल

' छा ! सायबाकच जेवक हाडतलय घराकडे ! मस्तपैकी बेत कर ! सायेब खुश जावक होयो !' . . . आबा

' तोच मा गेल्या पावटिचो ?' . . . बायल

' छा ! तो बदाललो. ह्यो मराठो !' . . .आबा

       आबा ऑफिसात जावक गेलो. हय आबाच्या बायलेन, कोंबडो, सुंगटा, इसवण, असला कायमाय आणल्यान. दुपारी आबा सायबासकट घराकडे इलो.

   ' मी ह्या काय खाणय नाय ! . .मी भट . . मराठे . . .मराठे आडनाव आसा माझा !' . . . सायब करावादलो
   बिचारो पापड, लोणचा जेवन गेलो ; आणि हय आबाचा प्रमोशन बोंबालला !

उडाणटप्पू




Saturday, October 3, 2020

सुक्यो गजाली . . .


  टिव्हीची गजाल

          नवीन टिव्ही घेवची त्येवा पेद्रु गोन्साल्विसाची ऐपत नाय होती. एका इसमाक आपलो जुनो टिव्ही इकुचो असल्याचो होलम पेद्रुक लागलो. पेद्रून सोमतो त्येका गाठल्यान आणि टिव्ही ताब्यात घेतल्यान.तीन हजाराक यवार ठरलो.ह्येच्या,तेच्याकडले उसने पैसे घेवन पेद्रुन यवार भागयलो.

    टिव्ही घेवन घराकडे इलो. सोमतो जोडल्यान,भुरभुरीत दिसाक लागला.दुसऱ्या दिवशी बारीक,बारीक गोळे दीसाक लागले.कंटाळलो. त्या टिव्ही मालकाकडे गेलो, 'टिव्हीर मुंगळेच दिसतत महो तुमच्या!'
    
 'मी काय करू त्येका?'. . .तो इसम
   
 'असा कसा? मी परत घेया म्हणनय नाय. पण कायतरी उपाय सांगा !'...... पेद्रु

     ' असा बोल !' असा म्हणीत त्येनी खिशात हात घातल्यान. पाकीट काढल्यान. भितरसून पाचाची नोट काढल्यान, ' असा कर ! बाजुक हयता खताचा दुकान आसा. थय जा. पाच रुपयांची डीडीटी पावडर आण आणि टिव्हीर मार. सोमते मुंगळे जातले बघ !'
                                            
 उडाणटप्पू 

Friday, October 2, 2020

सुक्यो गजाली . . .

     
भाजी ! 
  
         मध्यंतरी गडचिरोलीत आसतानाची गजाल ! तिखट जेवाण आणि भितुरच तेलाचो कट. थयले मित्र एकदा माका चिकन खावच्या धाब्यार घेवन गेले. धाबोवालो थयलोच. तरुण कार्यकर्तो ! चिकन अर्थातच झणझणीत. हाय-हुय करीत खाय होतय. दोन चपाते खावन जातत म्हणासर मालक इलो. तिखटान डोळ्यात पाणी इल्ला. सगळा धुरकट दिसा होता. तो इचारी होतो,

' सरजी, भाजी वाढू ?'

     भाजी ? . . . छा ! चिकन आसताना भाजी. मी हातानच नको सांगलय. माझ्या दोस्तदारांनी मात्र मागून घेतल्यानी. डोळे फुसून बघतय तर ता चिकन !

' ही कसली भाजी ?' . . . मी इचारलय

' चिकनची भाजी !' . . . तो वाढपी

' वाढ, वाढ ! . .माकाय वाढ !! ' . . . हवरटासारखो किंचाळलय !

उडाणटप्पू

Thursday, October 1, 2020

सुक्यो गजाली . . .

जन्मतारीख बदल

  पेद्रु परवा आबाच्या ऑफिसात येवन बसलो.

' आबा ! तू पत्रकार मा? . . .माझा याक काम कर !' . . . पेद्रु

' केला ! . . बोल !' . . .आबा

' माका सल्लो होयोसा !' . . . पेद्रु

' दिलो ! . . .सांग !' . . .आबा

' तुझो नको !' . . . पेद्रु

' मगे, कोणाचो ?' . . .आबा

' कॉलेक्टरांचो !' . . . पेद्रु

' कशाबद्दल ?' . . . आबा

' आपणाक आपला नाव बदलुक येता मा ?' . . . पेद्रु

' होय . . . तुझा बदलतसय ?' . . . आबा

' जल्मतारीख बदलुची आसा !' . . . पेद्रु

' ती नाय येना बदलुक !' . . . आबा

' कारण ?' . . . पेद्रु

' विनाकारण ! . . पण बदलतसय ख्येका ?' . . .आबा

' अरे, माझी जल्मतारीख २ ऑक्टोबर !' . . . पेद्रु

' मोठो माणूस मरे तू ?' . . .आबा

' पण ड्राय- डे आसता मरे, त्या दिवशी ! वांधे जातत !'. . . पेद्रु

उडाणटप्पू