Saturday, July 4, 2020

सुक्यो गजाली . . .







 कॉट ॲंड 'बोल्ड' !


कॉलेजात असताना आबा बांबार्डेकार ब-यापैकी चावट होतो. मुलींचे कळी काढी पण लांबसून. आबा सेकंड ईयराक आसताना याक सुंदर, गोरागोमटा पोरग्या कॉलेजात इला. आबा पाघाळलो. ता एकटाच येय, एकटाच जाय. एकमार्गी. नाव, गाव कायच कळाना. आबा कासावीस.

'नंद्या! ओळख कशी काढू? कायतरी उपाय सांग ब्वॉ!' . . . आबा.

'डायरेक्ट इचार!' . . . नंद्याचो सल्लो.

'मा-याक घालतय काय? . . . शॅन्डल बघलय मा? . . . उंच टाचेचे आसत, कमीत कमी चार तरी टाके पडतले!' . . . आबा टराकलो.

'किती वाजले काय इचार!' . . . नंदू उवाच.

'ह्या ठिक आसा!' . . . आबाक नंदूचो सल्लो पटलो.

दुस-याच दिवशी आबा तेच्या येवच्या वाटेर थांबान रवलो. बरोब्बर मुन्शिपाल्टीसमोर दोघाय आमने सामने इली. आबा हसलो, ताय हसला. आबा खुश. आबाचो धीर बळावलो, 'वाजले किती?'

आबा थांबलो, ताय थांबला, ' ह्या बघ, ह्यो मवालीपणा जुनो झालो! ह्या माझा घड्याळ माका टायम बघुच्यासाठी, माझ्या बापाशिन दिलासा, टग्यांका टायम सांगूच्यासाठी न्हय. तुमच्यासाठी मुन्शिपाल्टिन येदोमोठो टॉवर बांधलोसा, तेतूर बघ! परत माज्या वार्तेक येव नको!'

बिचारो आबा त्वॉंड उघडा टाकून बघीतच रवलो.

उडाणटप्पू

4 comments:

प्रशांत मठकर said...

मित्रान घात केल्यान आबाचो..सल्लागार बरो न्हय आबाचो

aryamadhur said...

मी न्हय!

सतीश लळीत, माध्यमकर्मी, हौशी पुरातत्व संशोधक said...

घड्याळाखाली बसान् टायम इचारलो तर असाच होतला....

mazi akashwani said...

येळ वायट... दुसरा काय ?