Wednesday, July 1, 2020

सुक्यो गजाली . . .


सुक्यो गजाली . . .


कौरवांची कॉलनी !


बालपणीचो गुटगुटीतपणा आबा बांबार्डेकरान तरुणपणातय राखल्यान. तशीच बालपणीची दशावतारी नाटकांची आवडय जपल्यान. पाटबंधारे खात्यात नोकरी करणा-या आबाचो मोठो ग्रुप होतो. दरवर्षी दिवाळेकडे हेंचो ग्रुप नाटक करी. गोव्यासून नटी आणत.



यंदा द्रौपदी वस्त्रहरण करुचा नक्की झाल्ला. पात्रा निवडूच्यासाठी रात्री 'बसाचा' ठरला. सगळे आलेमाव-कोलेमाव जमले. काचसामायन इला. आबाचो देह बघून आबाक भिम करुचो ठरलो, पण आबाक दु:शासन करुची हुक्की इली, आणखीय दोघतीघजाण आपणाकच दु:शासनाची भूमिका होई म्हणान हट्टाक पेटले. जोरदार वादावादी झाली.



'भिमाची, दुर्योधनाची, कृष्णाची महत्वाची भूमिका सोडून दु:शासनाची किरकोळ भूमिका करुचो हट्ट सो?' . . . . बाकीचे चक्रावले. तितक्यात हातात मोबायल नाचयत नंदू इन्सुलकार इलो.



'आबा, वगीचच लाळ टाकू नकात, ह्यो बघ मेसेज इलो, यंदा गोव्यातली नटी येणासा नाय, पेद्रु गोन्साल्विसाक लुगडा नेसवचा लागतला!  . . . नंदू इन्सुलकार केकाटलो.



उडाणटप्पू