Monday, July 13, 2020

सुक्यो गजाली . . .

        
                   


कुत्रं सुटलं . . . !

आबा बांबार्डेकराचा गणित उत्तम. सरकारी नोकरी लागाच्या आधी दोन तीन वर्षा आबान शाळेत मास्तरकीय केल्लयान. सातवी आठवीक गणित शिकय. नववीची गणितची बाई बाळंतपणाच्या रजेर गेली आणि नववीचाय गणित आबाच्या गळ्यात पडला. पोर्शन पुरो करुच्यासाठी आबा आयतवारचे ज्यादा तास घेय.

नववीच्या त्या वर्गासमोरच शिपाई रवा. तेचो एक कुत्रो होतो. तो खुळावललो. दोघा चौघांचो बरो रवको काढलल्यान. सगळे विद्यार्थी आणि मास्तरय तेका टरकान होते. तसो तो साखळेन बांधललो असा.

रविवारी नववीचो ज्यादा तास सुरू आसतांना, आबाचो दारातसून, तर विद्यार्थ्यांचो खिडकेतसून सतत त्या कुत्र्याकडेच लक्ष होतो. न जाणो साखळी तोडून कुत्रो येयत तर?

आबान बोर्डार, पोरग्यांका गणित घातल्यान, पोरग्यांचो लक्ष भायर, तेंका ता सोडवक येयना. शेवटी आबान स्वत:च  सोडवक घेतल्यान. म्हणाक लागलो, 'मला सांगा, आता इथे कुत्रं सुटलं वापरणार?' . . .  'कुत्रं सुटलं ' हे शब्द कानात पडतुकच सगळ्या पोरांनी भियान आपापल्या बाकड्यारनी उडी मारल्यानी. आबाय भांबावलो.  तोय खुर्चेर चढान थरथराक लागलो, ' सूत्रं कुठलं वापरणार असा विचारुचा, ता चुकान कुत्रं सुटलं वापरणार?' असा विचारलय, ह्याच तेच्या ध्यानात येवक नाय.

उडाणटप्पू

No comments: