Thursday, July 16, 2020

सुक्यो गजाली . . .



                           

देव दिता . . . !


आबाचे बाबा, नाना बांबार्डेकर म्हणजे अजब रसायन, भांडखोरय तितकेच. स्वत:ची चूक कबूल करुची सवयच नाय. शेजाराकच रवणा-या सख्ख्या भावावांगडा हेंचो उभो दावो. जमीन आणि प्रॉपर्टीवरसून  टोकाचे वाद! पण आबाचो काकार खूप जीव.

सकाळी सकाळीच आबा आपणाक न सांगता, गाडी घेवन खय गेलो, हेचा नानांका कोडा होता. भायर हॉर्न वाजलो, नाना घाय घायत खाटीवरसून उठले. भायरसून येणा-या आबाच्या आंगारच आपाटतले होते. 'काय हो, पडतसात शे?' . . . आबा.

'डावो डोळो दुखतासा! ता जावंदेत. तू सकाळीच खय गेल्लय?' . . . नाना.

'अहो, सकाळी तातूकाका हुंब-याक अडखळान खळ्यात पडले. टकलेक खोच पडलीसा. तेंका मलमपट्टी करुक आरोग्य केंद्रात नेवन आणलय, सकाळपासून कमी दिसतासा, चष्मो बदलूक होयो म्हणा होते!' . . . आबा.

'काय बदलूची गरज नाय. साफ आंधळो जातलो तो!' . . . नाना.

'भविष्य सांगतासात?' . . . आबा कुत्सित हसलो.

'हसा नको! मी सांगतय तसाच जातला! रात्री स्वप्नात देव इल्लो, वर माग म्हणाक लागलो. मात्र अटय घातल्यान, तू मागशित ता तुका दितलय पण, तेच्या दुप्पट तातूक दितलय!' . . . नाना.

'मगे, काय मागल्यात तुम्ही देवाकडे?' . . . आबाची उत्सुकता चाळावली.

' खूप विचार केलय आणि देवाक सांगलय, माझो एक डोळो फोडून टाक!' . . . नानांची मागणी आयकान आबा उडालोच. 

उडाणटप्पू

No comments: