Wednesday, July 29, 2020

सुक्यो गजाली . . .


          

इंग्रजीच्या आवशीचो घो . . . !

आबा बांबार्डेकर अकरावी एस एस सी च्या शेवटच्या बॅचचो विद्यार्थी. मराठी मिडियम. आबाचे बाबा, नाना बांबार्डेकर शेतकरी असले तरी तेंचा इंग्रजी उत्तम! इंग्रजी कादंबरे, पेपर वाचीत. आबाचो शाळेचो इंग्रजीचो अभ्यासय नानांनीच घेतललो. आबाक सगळेच पेपर बरे गेल्ले. पास जावची फुल्ल गॅरेंटी आसल्याकारणान आबाचो हुरूपय वाढललो!

'नाना! आता दोन म्हयने सुट्टी, मी काय करु? वेळ कसो घालव?' . . आबा.

'बाबीकाका बलयतासा मा तुका मुंबैक? पंधरवडोभर तेच्याकडे जा, मुंबै फिर!' . . . नानांचो सल्लो.

'मुंबैक जावक वेळ आसा. काका येतलो आणि माका न्हेतलो म्हणासर मे उजाडतलो. तवसर काय करु?' . . . आबाची चिंता.

'असा कर, तुझा इंग्रजी पयल्यांदा सुधार! तेच्यासाठी वाचन कर. रोज टाइम्स वाच. सध्या ही कादंबरी वाचून काढ. वाचताना सोबत डिक्शनरी ठेय, शब्दाचो अर्थ नाय कळलो तर भितर शोध!' . . नाना.

नानानी दिल्लली कादंबरी घेवन रात्री जेवन आबा वाचूक बसलो. आबाक पयलोच शब्द अडलो. आबान सोमती डिक्शनरी काढल्यान, भितर शोध शोध शोधल्यान, शब्दच गावाक तयार नाय! आबा हैराण! वैतागलो आणि घुसमाट मारुन निजान दिल्यान. 

सकाळीच नानानी उठवन घातलो. आबा नर्व्हस! 'आवाडली काय रे कादंबरी?' . . . आबा गप! . . . 'वाचलय तरी?' . . . तरी आबा त्वॉंड उघडीना. . . 'किती पाना वाचून झाली? . . . रात्री बसललय मा वाचूक? . . . याक तरी पान वाचलय?' . . . नाना वैतागले.

आबान नकारार्थी मान हलयल्यान, ' पयलोच शब्द अडलो! डिक्शनरीतय खय गावाना!' . . .आबाची कबुली. 

नानानी कादंबरी काढून घेतल्यानी, पयला पान उघडल्यानी आणि कपळार हात मारुन घेतल्यानी, 'अरे खुळ्या आबल्या! ह्यो शब्द तुका डिक्शनरीत कसो गावतलो? अरे इंग्लंडमधल्या एका गावाचा नाव आसा ता!'

उडाणटप्पू

No comments: