Friday, July 17, 2020

सुक्यो गजाली . . .

                  



धूम 4

बूडाखाली बुलेट आसली काय आबा बांबार्डेकार हवेर स्वार होय. अशावेळी आबाच्या पाठी बसाचा म्हणजे जिवार उदार होना. विमो काढललो आसाकच होयो!

मध्यंतरी आबावांगडा गोयाक जावची एकदा पाळी इली. गाडी हळू चलवची अट घालूनच आबाच्या पाठी बसलय. आबान अट पाळल्यान, गजाली मारीत रमत गमत चलललो. हाय-वे वरती इलो तरी आबाचो वेग वाढाक नाय, हेचा समाधान होता. तितक्यात पाठसून नवी कोरी हिरो होंडा मोटरसायकल चलयत एक सरदारजी इलो. आमका पास करुन जाता जाता आबाकडे बघीत आराडलो, ' क्या कभी होंडा चलाई है क्या?'

आबाक चॅलेंज? आबाचो स्पीड वाढलो. आबान क्षणार्धात सरदारजीक पाठी काढल्यान. परत पाठसून सरदारजी वेगात इलो, आबाक पास करतांना परत आराडलो, 'क्या कभी हिरो होंडा चलाई है क्या?'

आबाचा सणाकला, आबा धूम स्टायलीत झापकन पुढे गेलो. शर्यतच लागली. शेवटी भितीन मीच आरडलय तसो आबान नाद सोडल्यान. थोड्या अंतरार गेलो न गेलो, तोच बघतो तर काय! सरदारजीची ढेंगा वरती! एका बाजूक हिरो होंडा पडलली. आबान बुलेट सायडीक लायल्यान, धावतच आम्ही सरदाजीकडे गेलो, सरदारजी ब्वॉब मारी होतो. 

'ऐसे कैसे हुवा सरदारजी? बहुत अकड रहे थे, हिरो होंडा चलाकर बुलेट को चॅलेंज कर रहे थे!' . . . आबान हिंदी पाजळल्यान.

'वही तो, अरे भाईसाब मै पहिली बार हिरो होंडा चला रहा था, इसलीये इसका ब्रेक किधर है ये पुछ रहा था . . . ' . . . सरदारजी रडकुंडीक!

उडाणटप्पू

No comments: