Thursday, July 23, 2020

सुक्यो गजाली . . .

         



झाडपिके आंबे . . . !

यंदाच्या सिझनात आबाच्या बागेतली गारफा ब-यापैकी धरली. यंदा पैसे मिळवक चान्स इलो म्हणून आबा खूष होतो. पण कोरोनान धमाटो दिल्यान. माल भायर पाठवक गावाना आणि गावात इकुचो तर लॉक डाऊन! आबा शाप हरमाळलो. खिशात पैसोय नाय. रस्त्यार हडगेत भरुन बसाचीय लाज.

आबाकडे बारिकसारिक कामाक येणा-या शेवत्याकय काम नाय होता. आबान तेका कोंबार काढल्यान. ता तयार झाला. आबान सगळे आंबे रिक्शात भरल्यान आणि त्याचदिवशी सुरु झाल्लल्या वाडीच्या बाजारात इलो.

 शेवत्याक टोपले, हडगे लावन दिल्यान आणि आपण लांब जावन उभो रवलो. गिरायकांची गर्दी झाली काय आबा आपणय गिरायक बनान गर्देत घुसा, वगीचच दर केल्याचा नाटक करी, 'आंबे मस्तच आसत, परत गावाचे नाय! दी बाये दोन डझन!', असा मोठ्यान म्हणीत स्वत:च खरेदी करी. लोकांचे मगे आंब्यार उडये पडत. गर्दी कमी झाली काय हळूच येवन आधी वगीचच घेतलले आंबे परत टोपलेत ओती.

दोन तीन दिवस आबान ही आयडिया वापरुन बरोचसो माल इकून काढल्यान. असोच गर्दीत रवान आबा अळयाबळयाचो दर करीत आसताना बाजूकच उभो आसललो माणूस आबाच्या कानात मोठ्या आवाजात पुटपुटलो, 'झाडपिके आसत ते!' बाकीच्या गिरायकांच्या ता कानात पडला, आणि गिरायका पांगली.

आबाचा टाळक्या सणाकला, ' कोण सांगता झाडपिके? मी सोत्ता गडी चढवन खोबल्यान उतरवन घेतलसय! '

'म्हणजे? तुम्हीय माझ्या सारखेच?' . . . म्हतल्यान आणि त्या ईसमान सायट मारल्यान!

उडाणटप्पू

3 comments:

अरुण सौदागर said...

हा हा हा हा! छानच. हडगी, कोंबार, खोबला हे शब्द कानावर पडून जमाना झाला होता. तुम्ही प्रत्यक्ष समोर भेटून ही गजाल सांगताय असा भास झाला.

aryamadhur said...

माझा, या गजाली लिहिण्यामागचा उद्देश तोच आहे! मालवणीतील अधिकाधिक शब्द वाचकांपर्यंत पोहचवणे आणि बोली असूनही ती किती समृद्ध आहे हे दाखवून देणे. विनोद निमित्तमात्र आहे. मालवणीतील काही शब्दांना, पर्यायी शब्द अन्या भाषा व बोलींमध्येही सापडत नाहीत.

अरुण सौदागर said...

सही रे सही.