Friday, August 21, 2020

सुक्यो गजाली . . .

 


  

 . . . मम देव देव !


आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार, पेद्रु गोन्साल्वीस आणि मी गणेश दर्शनासाठी बाजारातसून फिरा होतो, निवडणुको तोंडार इल्ले. गणपती येवन विराजमान झाल्लो. चाकरमान्यांचोय ओघ ब-यापैकी होतो. तेंच्या स्वागताचे फलक, फ्लेक्स राजकारण्यांनी जयथय आपल्या पक्षातर्फे लायलले. गणपती बघता, बघता हे फलकय आम्ही वाची होतो. अर्थ लाय होतो, समजत नाय तेंचे अर्थ काढी होतो.

विशिष्ट संस्कृत भाषेतलो एक फलक मात्र सगळ्यांचो लक्ष आकर्षित करी होतो. तेच्यार असा कायतरी छापलला, 

          त्वमेव माता, पिता त्वमेव।

          त्वमेव बंधु, सखा त्वमेव।

          त्वमेव सर्वम, मम देव देव।

   आम्ही सगळे तेचो अर्थ आपापल्या परीन लाय होतो. तितक्यात पेद्रु आराडलो, 'थांबा, थांबा! मी सांगतय.'

   'मेल्या, संस्कृत आसा ता! तू काय डोंबाल सांगतलय?'. . . आबान बरो झापल्यान.

   'मगे, तू सांग तर!' . . . पेद्रुन चॅलेंज दितुकच आबाचे आवाज बंद.

   'बरा, सांग तर!' . . . आबान नांगी टाकली.

   'ह्या, चाकरमानी मतदारांका उद्देशून आसा! तुम्हीच आमचे मायबाप, भावंडा-मित्र पण तुम्हीच!' . . . पेद्रुचा भाषांतर.

   'ता कोणय सांगीत! फुडच्या ओळीचो अर्थ सांग!' . . . नंदू.

   'सांगतय, वायंच धीर धर!' . . . पेद्रु.

   'फाटदिशी सांग!' . . . आबा.

   'त्वमेव सर्वम म्हणजे तुमचा सगळा,  सोना-नाणा, संपत्ती मम देव देव म्हणजे माका दिया!' . . . पेद्रु.

   'पण, देव देव असा दोनदा ख्येका?' . . . माझी शंका.

   'जोर येवच्यासाठी! म्हणजे दियाच!' . . . पेद्रुचा स्पष्टिकरण.


उडाणटप्पू

   

   

          


सुक्यो गजाली . . .

 

   

तू खिंचो? . . . हांव गोयचो . . . !


पेद्रु गोन्साल्विसान मध्यंतरी बेकारीच्या काळात ट्रकार किलींडर म्हणानय काम केल्यान. गोयातल्याच एका पावण्यान तेका एका सरदारजीच्या ट्रकार कामाक लायल्यान. बिचारो पेद्रु मुकाट्यान सगळी कामा करी. सरदारजीचो ट्रक मुंबै-गोवा-मुंबै अशी माल वाहतुक करी.

पयल्या दिवशी गोयात, ट्रकात माल कसो भरतत, वर ताडपत्री कशी बांधतत, ह्या सगळा पेद्रुन व्यवस्थित बघून घेतल्यान. ट्रकात ताटकळत लकने काढीत पेद्रुन एकदाची मुंबै गाठली. सकाळी सगळा आवरुन एक नीज काढल्यान. त्यादिवशी दुपारनंतर गाडी खाली करुन झाली. रात्री ट्रकातच निजलो. बिचा-याक सरदारजीची पंजाबी मिश्रीत हिंदी बोलाक येय ना, आणि सरदारजीक हेची कोंकणी कळा नाय होती.

सकाळी हमालांनी दुसरो माल ट्रकात भरलो आणि ते जावक गेले. सरदारजी आणि पेद्रुन माल व्यवस्थित सेट केलो. ताडपत्री पगळली. पेद्रु ताडपत्रेर वर आणि सरदारजी खाली रस्त्यार रवान ताडपत्री बांधूच्या तयारीत. सरदारजीन दोरखंड ट्रकाच्या हुकाक ताणून, ताडपत्रेर फिरवन घेवच्यासाठी वर पेद्रुकडे फेकल्यान आणि मोठ्यान आराडलो, 'हां, तुम खिंचो!'

पेंद्रुन हातातली रस्शी खाली टाकल्यान आणि आराडलो, 'हांव गोयंचो!'

सरदारजी खालसून परत आराडलो, 'ओये तू खिंचो रे!'

'अरे हांव गोयंचो रे, वाळपोयचो!' . . . पेद्रुचा तुणतुणा सुरुच.


उडाणटप्पू

Thursday, August 20, 2020

सुक्यो गजाली . . .

 


  

आम्का पचास, लिम्का पचास . . . !


अण्णांच्या भुसारी दुकानात, आबा वाणसामान आणूक गेल्लो. मापारी पुडये बांधी होतो आणि अण्णा चोपडेर हिशोब करी होते. तितक्यात पाच सहा वर्षाचा याक ल्हान पोरग्या, आबाच्या शेजाराक येवन उभ्या रवला. 


अण्णांचो तेच्याकडे लक्ष गेलो. आवाठातल्या गफाराचा चडू फातिमा, कायम येणारा. 'क्या गे फातू, क्या हूना तेरेकू?' अण्णा मुसलमानी भाषेत बोलाक लागले.


'आम्का पचास, लिम्का पचास!' . . . फातिमाची ऑर्डर.


'क्याsss?' . . . अण्णा किंचाळले. फातिमा भियाला.


'आमका पचास, लिमका पचास!' . . .  शांतपणे फातिमान परत सांगल्यान, तरी कोडा सुटाना! आबाय विचार करुक लागलो, पण तेचाय टकला चलाना. 


'अण्णा, तेका लिम्का म्हणजे कोल्ड्रिंक होया असतला!' . . . आबान अक्कल पाजळल्यान.


अण्णा गल्ल्यावरसून भायर इले, त्या पोरग्याच्या बखोटेक धरुन रस्त्याच्या मधी इले, 'वो देख नेवगीका कोल्ड्रिंक हाऊस, उधर लिम्का मिळेगा तेरेकू!'


'वो नय, तुम्हारे दुकानका हुना!' . . . फातिमाचो हट्ट कायम. तितक्यात चडवाक शोधीत, आवस इली. 


'काय मागतासा ह्या? आम्का, तुम्का, लिम्का करतासा!' . . . अण्णा.


'अचार, लोणचा हो! . . . आंब्याचा पन्नास ग्रॅम, लिंबाचा पन्नास ग्रॅम!' . . . फातिमाच्या आवशिचो खुलासो आयकान अण्णानी कपाळार हात मारुन घेतलो.


उडाणटप्पू 

Wednesday, August 19, 2020

सुक्यो गजाली . . .

 


 

अचाटविराचा खाद्य . . . !


तरी तीस पस्तीस वर्षा झाली आसतली. आबा बांबार्डेकार तेव्हा एका लोकल दैनिकात उपसंपादक कम वार्ताहर म्हणून टेम्परवारी कामाक होतो. त्यावेळी आबा आणि मित्रमंडळीन याक युवक मंडळ स्थापन केल्ला. खूप कार्यक्रम करीत. आबाचो संपादक, मंडळाचो अध्यक्ष आणि आबा सेक्रेटरी. 


एकदा आबा ऑफिसात बसान बातमे लिही होतो. एक जर्किन घातललो मुंबैकार तरुण समोर येवन बसलो, 'बोला! काय काम?' . . आबान रोजच्या स्टायलीत इचारल्यान.


'मी धनंजय कुळकर्णी, अचाटविर! मी काची खातय, टाचणे चघळतय, उलटपावली चलतय, मी १०५ बायले करतलय, नायगारा धबधब्यात उडी मारतलय, समोरासमोर धावणा-या एका फास्ट ट्रेन मधून दुस-या फास्ट ट्रेनमधी उडी मारतलय!' . . . . सांगता, सांगता तेनी आपल्या कार्यक्रमांचे, बातम्यांचे फोटो दाखयल्यान. तितक्यात अध्यक्षय खाली इल्ले. सोमतो निर्णय घेवन दुस-या दिवशी कार्यक्रम करुचो ठरलो. आबान तेच्या पुढ्यातच बातमी तयार केल्यान. कागद जोडूक टाचणी शोधता तर टाचणेच गायब. ह्यो इसम चघळतासा.


दुस-या दिवशी संध्याकाळी उरफाटा चलणे, गुलोप-ट्युबलायटीचे नळये चावान पापड खातत तशे खाणे, असे अचाट कार्यक्रम त्या कुळकर्ण्यान हजारो लोकांसमोर केल्यान. खूप पैसेय जमले, ते आणि भरीक घालून मंडळान तेका थैलीय दिली.


रात्री घराक इल्यार जेयता जेयता, आबा ह्या सगळा वर्णन आपल्या म्हाता-या आवशिक सांगी होतो. ता आयकल्यार आवस कळवाळली, 'अरेरे! कोणार काय खावन जगाची पाळी येयत सांगूक येवचा नाय . . . आमच्याकडेय ते दोन गेल्ले ट्युबी आसत, ते तेका दिवचे न्हय. तेच्या तरी बिचा-याच्या पोटाक लागले आसते!'


उडाणटप्पू

Tuesday, August 18, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

चराब उतारली . . . !


आबा बॅचलर असतांनाची गजाल. सरकारी नोकरी. रवाक ब्लॉक. रात्री घेवक ऑफिसातले पंटर. 'खा-प्या-मजा करा' चा जीवन जगा होतो. 'आधीच रेटलोबा त्यात मद्य प्याला' म्हतल्यार आणखी काय जातला. प्वॉट सुटला, गोरे गाल गुलाबी दिसाक लागले. टाचणी टोचून काडी पेटवन धरली तर भाक्कन पेटतलो कापरासारखो, अशी चेष्टा पेद्रु आणि नंदू करुक लागलो. 


एकदा आबाक खूप त्रास होवक लागलो, छातीत दुखाक लागला. डॉक्टरान 'हायपर टेंन्शन' सांगल्यान. रोज तीन-चार मैल चलाक, धावाक सांगल्यान. त्याच दिवशी आबान पेपरात जायरात वाचल्यान, 'महिनाभरात तीन इंच चरबी उतरवू, हमखास पोट खपाटीस नेऊ!' आबान फोन करुन नावनोंदणी केल्यान. रात्री न घेता निजलो.


फाटफटेक उठान आबा, त्या कंपनीच्या फोनाची वाट बघीत बसलो. बरोब्बर सहाच्या ठोक्याक दारार टकटक झाली. आबान दार उघडल्यान. समोर याक सुंदर, गोरापान, तरुण पोरग्या, हाफ पॅंटीर!


'चला, पकडा माका!' म्हतल्यान आणि पळत सुटला. आबा तेच्या पाठसून धावत सुटलो. ती चवळीची शेंग ह्या बटाट्याक गावता? आबा हरमाळलो आणि घराक गेलो. दुस-या दिवशी फाटेक परत टकटक. ताच पोरग्या, तोच संवाद. आबा धाव धाव धावलो, हासड घालीत घराक परातलो! तिस-याय दिवशी तोच प्रकार. पकडा पकडी सुरुच. ती सुंदरी काय आबाच्या हातीक लागाना. आठवडो उलाटलो तशी आबाची आशा वाढत गेली, स्पीडय वाढलली. चौदाव्या दिवशी पोरग्या खूपच आवाक्यात इला. 


पंधरावो दिवस, आबाचो वेष बदाललो, लेंगो जावन हाफ पॅंट इल्ली, पायात स्पोर्टस शूज! आज तेका नक्की पकडतलय, हेची आबाक खात्रीच होती. ठरल्याप्रमाणे सहाच्या ठोक्याक दार वाजला, आबान दार उघडला. भायर एक हिडींबा उभी, 'चल, धाव जोरात, नायतर मी तुका पकडतलय. बिचारो आबा! नंतरचो पंधरवडोभर जिवाच्या आकांतान पळा होतो. महिनाभरात प्वॉट खराच खपाटिक गेला. सगळी चरबी उतारली!


उडाणटप्पू

Monday, August 17, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

उडाणटप्पू आबा आणि चोरशिपाई . . . !


वार्षिक परीक्षा संपल्यार रिझल्ट लागासर पंधरवडोभर, आम्ही सगळेच उडाणटप्पू विद्यार्थी दररोज टायमार शाळेत येव. मास्तर पेपर तपासण्यात, रिझल्ट तयार करण्यात बिझी आणि आम्ही उनाडके करण्यात! आबाधुबी, चोरशिपाई खेळान वेळ घालव. दुपार झाली काय भुस्काट मारुक आपापल्या घराक. संध्याकाळी आवाठातल्या सवंगड्यांवांगडा विटीदांडू, नायतर लगोरी!


सकाळची एक टायम शाळा. शाळेत येवची सक्ती नाय. शक्यतो आम्ही येवच नये ही मास्तरांची इच्छा! आम्ही सुरवातीक आबाधुबी आणि नंतर चोरशिपाई खेळू! लपाक निर्बंध नाय होते. आमच्या टिमीत आबा, मी, इलगो, पको आणि पशा. 


एकदा आम्ही चोर होतो, आम्ही दडाक जागा शोधी होतो. शाळेच्या मागे आम्ही पळालो, आबान मोठ्ठ्यान उssचू केल्यान. आबान आमका सगळ्यांका एकठय करुन एक आयडिया सांगल्यान, 'दडाया खेका? सरळ घराकच जावया जेवक, बसांदेत शोधीत!' आम्ही पळालो. बिचारो किशा, राणो, पबी आमका शोधीत बसले.


दुस-या दिवशी आमच्यार राज्य. ते पळाले. आम्ही तेंचा 'उचू' आयकला आणि तेंका शोधूच्या भानगडीत न पडता निळूच्या हॉटेलातली साधी आयस्प्रोटा घेतली. खायत, खायत घराक गेलो. आम्ही शोधूक येवची वाट बघून बिचारे कंटाळले आणि भूक आवराना तसे घराक गेले.


उडाणटप्पू

Sunday, August 16, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

जन्या कूक . . . !


'जनाबाई कोदे' म्हतल्यार कोणच कदचित ओळखाचो नाय. पण 'जन्या कूक' आठावता काय रे, असा इचारला तर सगळेच होय, होय करतीत. त्या काळी आमची सगळ्यांची ती मानलेली जन्या मावशी.


 जन्या गावभर फिरा. सगळ्या घरातनी तिचा आनंदान स्वागत होय कारण सगळ्या गावाची खबर घरबसल्या, बायलमाणसांका गावा. मगे ही साळकाया-माळकाया एकठय जमत आणि मेळे करीत. मनोरंजनाची ती एक मोठी सोय होती. ही जन्यामावशी कोणाकडे फुकेरी चा-पाणी पीय नाय, घरात रांधूकय मदत करी.


कोणीतरी ह्या स्वयंपाकीन जन्याक 'कूक' म्हतला. पुढे, पुढे जना दिसला काय कोणय 'जन्या कूक' म्हणी. जन्याक वाटा लोक आपल्या नावान कूकारे घालतत. तेका राग येय. चिडानय कोण दाद दियनत तसा जन्या गाळी घालूक लागला. बाजारातसून, रिक्षा स्टॅंडाकडसून जना जावक लागला, काय मवाली रिक्षावाल्यांचे कूकारे सुरु जायत. जन्या गाळी घालून तेंका प्रत्युत्तर दिय, चप्पलय मारुक काढी.


जन्या मॅड नाय होता. नववारी पातळातला गोरापान जना चांगल्या घराण्यातला. पण फाटक्या तोंडाचा. उमर-वय साठी पार. जन्या कूक ह्यो गावभर परवलीचो शब्द झाल्लो. जन्याच्या ब-यामागत्या कोणीतरी एकदा ह्या रिक्षावाल्यांका समजायला. तेंकाय ता पटला. 


रोजच्यासारख्या जना भायर पडला. सगळ्याभर शांतता. कोणच जन्याची कळ काढीना. रिक्षा स्टॅंड जवळ इलो. आता आरड पडली काय चप्पल काढूच्या आणि गाळी मारुच्या तयारीत असलेल्या जन्याक धक्कोच बसलो. सगळे रिक्षावाले शांत. जन्याक ही शांतता सहन जायना. ता थयच उभ्या रवला आणि रिक्षावाल्यांकडे बघून मोठ्यान आराडला, 'आज मेले काय रे सगळे?' आणि एकच हुयेल पडली, 'कूक, कूक, कूक . . . जन्या कूक, जन्या कूक!'


एका वेगळ्याच समाधानात, जन्या गालातल्या गालात हसत मार्गाक लागला!


उडाणटप्पू

Saturday, August 15, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

इद्वाटो आबा आणि तेची वानरसेना . . . !


शाळेत गेल्यार आबा बांबार्डेकाराचो हूडपणा वाढतच गेलो. इलगो, पको, पसो, राणो, पबी, किशा असे आवाठान ओवाळून टाकलेले गण तेचे दोसदार! विटी- दांडू, लगोरी, गुट्टे, चोर- शिपाई हे तेंचे रोजचे मैदानी खेळ. उन्हाळ्याच्या सुटयेत पाकीटा आणि काजींनी खेळत. सक्का आणि मुक्काशिवाय गजाली नाय. नरेंद्र डोंगरार भर दुपारी जावन दगड मारुन आंबे पाडणा ह्यो आणखी एक उपदव्याप.


जरा मोठे झाल्यार क्रिकेट खेळाची हेंका हुक्की इली. कुल्यार फाटके पॅन्टी घालून शाळेत जाणा-या ह्या उंडग्यांका बॅटी आणि बॉलाक पैशे कोणाचो आवस-बापूस दितलो? 


आबाच्या टकलेत एक आयडीया इली. आवाठात एक लाकडाची गिरण होती. आबा आपली वानरसेना घेवन गिरणीर पोचलो. थेट मालकाक जावन भेटलो, 'आमका बॅट करुक एक फळी होयी!'


'फुकट? . . . बापाशिची पेंड आसा?' . . . मालकान हांबुडल्यान. आबाचो पचको झालो. गिरणीतसून भायर पडताना आबाक, वाटेत पडलोलो एक खिळो गावलो. तो हातात खेळयत आबा कंपाऊंडाकडे इलो. थय  याक फणसाचा ल्हान झाड होता. झाडाबुडचो धोंडो उचलून, आबान तो खिळो त्या झाडात ठोकून टाकल्यान.


'आबा, झाडार राग काढून काय फायदो?' . . . इलगो पिरांगलो. 


'अरे, मजा बघ! ह्या झाड मोठा झाला, सुकला काय तोडतले, ह्याच गिरणेर फळये पाडतले, तेवा ह्यो खिळो गिरणीच्या पात्याक अडाकतलो. पाता तुटताला. गिरणी मालकाचा लुकसान!' . . आबासकट आमचेय डोळे चमाकले.


उडाणटप्पू

Friday, August 14, 2020

सुक्यो गजाली . . .



     

आबाचो श्रीगणेशा . . . !

आबा बांबार्डेकार अगदी बालपणापासूनच हूड! सबंध आवाठभर उंडगत रवा. पयलीत गेल्यार शाळेत तरी यवस्थित जायत मा, हेची आवशिक चिंता होती. सुदृढ बालक स्पर्धेत हमखास बक्षीस मिळयणारो आबा, आपल्या  देहयष्टिचो पुरेपुर वापर करी. रोज शेजा-या-पाजा-यांचे कळी हाडी. आज अमक्याक बडयल्यान, उद्या तमक्याक कोचल्यान. आवस लोकांची समजुत काढीसर हैराण जाय.

शेजारच्या पोरग्यांका गोळा करुन एकदा आबा व्हाळातल्या कोंडीत खेळत बसलो. कोणय पाण्यात बुडलो आसतो तर फुकटचा अपशराण ! . . आवस ज्याम भियाली. थापट, थापट थापटल्यान. बरो न्हावक घातल्यान आणि उपाशी बसवन ठेयल्यान. गब्दुल आबाक भूक सहन जाय नाय. रडकुंडीक परातलो. नाना घराक येवची वाट बघीत रवलो. कधी नाय ते नाना त्यादिवशी उशिरा इले. 

येतुकच आवशीन झिलाचे कागाळी बापाशिच्या कानार घातल्यान. नाना आधीच वैतागान इल्ले, तेनीय दोन फटके दिल्यानी, 'चल पाटी पेन्शिल घे! '

आबा पाटी पेन्सिल घेवन बसलो खरो, पण पाटयेर कायच गिरयना. नाना चिडले, ' श्री काढूक शिकयलसय मा मी तुका, मगे वगी कित्याक?' आबा गप. तितक्यात आवस रांधपातसून भायर इली, 'हाल्ली, पाटीच हातीत घेवक बघनासा नाय!'

'काय रे, श्री कित्याक काढूक बघनसय नाय? येतासा मा तुका . . ?' नाना करवादले.

'शिरी काढलय काय माका पुढे ग काढूक सांगतल्यात! . . मी नाय काढूचय!' . . . आळशी आबाचा लॉजिक.

उडाणटप्पू

Thursday, August 13, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

तिरडी डॅन्स . . . !


नंद्या इन्सुलकराचो चुलतो, गंपो वारलो. मी, आबा बांबार्डेकार आणि पेद्रु गोन्साल्विस सोमते नंद्याकडे हजर. तवसर थय बरेच लोक जमलले. नंद्याचो ह्यो चुलतो एकशिवडी, नाजूक. आवाठाच्या नाटकांत, स्त्री-पार्ट करी. चलना बोलना जीत बायलमाणूस. हेरशीसुद्धा तो मुरडतच चला!


कोल्हापूरसून गंप्याचो झिल, सून येवची होती. तवसर सगळे तिष्ठत थांबलले. भायर धो-धो पावस ओता होतो. गंप्याच्या झिलाचो फोनय लागा नाय होतो. पोचवची सगळी तयारी झाल्ली. तिरडीय शधून तयार होती. पावस वखाळलो तसे सगळे पोचवची घाय करुक लागले. झिल येयसर गंप्याक न्हावक घालूचा ठरला. 


प्रेत भायर आणला. नंद्यानच पयलो ताबयो ओतल्यान. प्रेत तिरडेय ठेयताना सगळ्या पै -पावण्यांच्या हातीत गंगाजल दिला. ता प्रेताच्या मुखात सोडूचा आसता, पण पेद्रुक ता ठावक नाय, तेनी तीर्थ समजान ता आपल्याच मुखाक लायल्यान. तशाय अवस्थेत आमका हसा आवराना.


गंप्याचो झिल पावसाक खयतरी अडाकलो आसतलो, असा समजान तिरडी उचलूची ठरली. आम्ही खांदो दिवक पुढे. तिरडी खांद्यार ठेयतलो इतक्यात ,आबाच्या खिशातलो मोबाईल वाजलो, 'ही चाल तुरु तुरु, उडते केस भुरु भुरु . . . !'  . . . लोकांच्या नजरेसमोर गंप्याची ती फेमस चाल उभी रवली आणि अक्खी प्रेतयात्रा हसत सुटली!


उडाणटप्पू

Wednesday, August 12, 2020

सुक्यो गजाली . . .

 

     

    

 बाजीक कळला, पण . . . ?


रिटायर झाल्यार पयलो म्हयनोभर भटाकण्यात आणि पेन्शनची कामा करण्यात गेलो. नंतर येळ जायना. असोच संध्याकाळी रोजच्यासारखो आंबा बांबार्डेकरावांगडा तळ्याच्या काठार बसलय आसतांना, आबाक इचारलय, 'आबा, कंटाळो इलो रिकामपणाचो! कायतरी कामधंदो सूचय!'


विचार करता, करता आबाचे डोळे चमाकले, 'बायलेच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणान काम कर! बायलेचो त्रास तरी कमी जायत!'


'आयडिया अगदीच काय वायट नाय, बघतय बायलेवांगडा बोलान!' . . .  असा सांगून घराक इलय. बायलेक सांगलय. बायल खूश.  म्हणाक लागली, 'मीय ह्याच सूचयतलय होतय.'


दुस-याच दिवशी अंदाज घेवच्यासाठी बायलेवांगडा गेलय. सगळे खेड्यातले पेशंट, आपणाक काय जाता ह्याय सांगूक न येणारे. औषध, गोळये दिल्यार खयची जेवच्या आधी, खयची नंतर, खयची पाण्यावांगडा, खयची मधावांगडा ता परत परत विचारणारे.  माझी करमणूक जाय होती. तितक्यात एका म्हाता-या बाजीचो नंबर इलो. 


तेका खूप काय माय जाय होता, पाय फोडा होते, पोटात चावरी होती, आंगात ताप होतो, नाक गळा होता. तेका चार पाच रंगीत गोळये दिवन, खयची गोळी खेच्यार ता बायलेन समजावन सांगल्यान, सगळा गुटाळून दरवाजापर्यंत गेल्लो बाजी परत इलो, 'खेच्यार काय ता माका समाजला, पण त्या गोळयेंका कोणी खय जावचा ता कसा कळताला?'


उडाणटप्पू

Tuesday, August 11, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

अर्धो कप चाय . . . !


मध्यंतरी आबा बांबार्डेकारान, आपली शाळा सुधारुची जबाबदारी खांद्यार घेतल्यान. जुने मित्र शोधून तेंच्याकडसून शाळेसाठी पैसे गोळा करण्याची मोहीमच उघडल्यान. जेका तेका आबा भेटा, मगे शाळेशी तेचो संबंध असो नायतर नसो. 

ऑफिसच्या कामासाठी मुंबैक गेलो तरी टकलेत कायम शाळेचो विषय. मुंबैतल्या अनेकांचे पत्ते आबाच्या मोबाईलात फीड केल्लेच होते. बहुतेकांनी चांगलो रिस्पॉन्सय दिलो. आबाचो एक जुनो शेजारी राजा सोन्सुरकार जवळच रवत असल्याचा आबाक कळला. राजा खरा तर नावाचोच राजा, बाकी स्वभावान कद्रुच ह्या आबाक ठावक होता, शिवाय तो शाळेचो कधी विद्यार्थीय नाय होतो. तरी आबा तेच्या घराक पोचलो.

आबाचा स्वागत राजान वरकरणी हसत केल्यान, बाकी नंतर फक्त आबाच एकटो बडबडा होतो, राजा नुसतो आयका होतो. आबाचा कीर्तन संपला. 'बाकी तू काय म्हणतय, तुझा कसा चल्लासा?' आबान इचारल्यान.

'चल्लासा ता बरा म्हणायचा! . . . बाकी तुका जेवक थांबाक सांगून तू थांबतलय थोडोच! चहाक विचारुचा तरी तू आयकाचय नाय . . .' अशा भाषेत राजा आपले प्रश्न आणि आबाची उत्तराय आपणच दिय होतो, तितक्यात आतसून चहाचो कप घेवन बायल इली, 'अगो, माका नाय आणूक चहा?' . . . राजा.

'तुमका होयो होतो? माका वाटला तुमका नको आसतलो!' . . . बायल.

'थांबा, थांबा वैनी! परत मुद्दाम करु नकात. ह्योच घेतो आम्ही अर्धो अर्धो!' असा म्हणीत आबान बशयेत ओतून दिल्ललो चहा, राजान फुर्र आवाज करीत पिल्यान. 

नंतर कोणीतरी आबाक सांगीतला, 'राजा-राणीचो ह्यो संवाद रोजचोच!'


उडाणटप्पू

Monday, August 10, 2020

सुक्यो गजाली

 

     

स्वर्गत . . . !

असोच फिरत फिरत नंदू इन्सुलकरासकट आबा बांबार्डेकाराच्या ऑफिसात गेलय. संध्याकाळचे चार वाजान गेल्ले. चहाची मस्त तलफ इल्ली. मी दोनदा दिल्लली जांभय आबाच्या ध्यानात इली.


 'मेल्या, ताकाक जावन भांडा कित्याक लपयतय? सरळ चहा मागय म्हणान सांग मरे!' . . . आबान थेट मुद्याकच हात घातल्यान. फोन उचलल्यान आणि तीन कडक चहाची ऑर्डर दिल्यान. 


दहाव्या मिनटाक शेजारच्या टपरीवजा हॉटेलातलो गुटगुटीत प्रौढ नोकर, पोटाचो नगारो सांभाळीत चहा घेवन इलो. आम्ही चहा पियसर तो सांगकाम्यासारखो समोर उभो. 


आबान चहा पिता पिता तेची ओळख करुन दिल्यान, 'ह्यो गोपाळ. यंदा कर्तव्य आहे. पोरग्या आसला तर सांगा!' गोपाळ गोड लाजलो.


'काय वयाची होई? . . . अपेक्षा काय?' . . . नंद्यान इचारल्यान. साठीक पोचलेल्या गोपाळाक, चडू कोण दितलो हेचो अंदाज येयना.


'गोपाळ, वय काय तुमचा?' . . . माझो प्रश्न. 


गोपाळ लाजान चूर झालो. हळूच पुटपुटलो, ' अठराव्या लागला! '


आम्ही हिशोब घातलो. तितक्यात आबान इचारल्यान, 'गोपाळ, व्हकाल काय वयाची होयी?'


गोपाळाक धीर इलो, 'सोळा? सोळा तरी होईच नाय?'


'सोळाची नायच गावली तर आठ आठ वर्षाचे दोन चलतीत?' . . आबान इचारल्यान. गोपाळ हसलो आणि पळत सुटलो.


उडाणटप्पू

Sunday, August 9, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

झब्बू ते थेट रमी. . . ?


परवा संध्याकाळी आबा बांबार्डेकार दमान भागान घराकडे इलो. बघता तर बायल इसपिका घेवन एकटीच खेळतासा. आबा भिरभिरलो, साधो झब्बू गाढव खेळताना सुद्धा हमखास गाढवपणा करणारी बायल चक्क पेशन्स खेळतासा की काय! ह्या शंकेन आबा भिरभिरलो.


'ऑफिसातसून इल्या, इल्या रोजच्या सारख्या चा-पाणी इचारुचा सोडून तू पत्ते खेळत बसलसय? कमाल आसा तुझी!' . . आबा.


'नाय हो, असाच येळ घालय होतय चित्रा बघीत!', असा म्हणीत ती उठली आणि आबाक  खरवस दिल्यान. आबा खूष! खरवस आबाचो वीक पॉईंट!


'तुका काय होयासा काय गो?' . . . आबाचो सावध प्रश्न.


'माका पत्ते खेळाक शिकया! . . . रमी शिकया.' . . . बायलेची मागणी आयकान आबा फूटभर उडालो. . . . ' रमीsss! बरा आसय मा?' . . . आबान बायलेच्या गळ्याक उलटो हात लावन बघल्यान.


'मस्करी नको हो, रमी शिकया महो!' . . . बायल हट्टाक पेटली.


'अगो, डायरेक्ट रमी? . . . गुलामचोर खेळ, साताठ नायतर पाच, तीन , दोन ठिक, अगदी मेंढीकोट पण चलात पण रमी? नको गो!' . . . आबान नांगी टाकल्यान, 'आणि रमी जुगाराचो खेळ, शिवाय एकापेक्षा जास्त खेळाडू लागतत खेळाक!'


'मी ऑनलाईन खेळतलय, माका ते सकाळपासून बलयतसत खेळाक! खूप पैसेय गावतत खेळल्यार म्हणतत!' . . . बायलेन आबासमोर मोबाईल नाचयल्यान. रमी सर्कलची ती परत परत झळकणारी जायरात बघून आबान कपाळार हात मारुन घेतल्यान.


उडाणटप्पू

Saturday, August 8, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

कुत्र्यांक  माणूसकी . . ?

श्रावणातलो पावस ह्यो असोच, मधीच ऊन मधीच पावस! ल्हान आसतांना ऊन-पावसाचो खेळ सुरु झालो, काय आम्ही सगळे पोर मोठ्ठ्यान आरडत नाचू, 'ऊन आणि पावस, कोल्याचा लगीन!' मात्र आजपर्यंत माका तेचो अर्थ कळाक नाय, मीय कधी कोणाक ईचारुक नाय.


परवा मस्त ऊन पडलला, बरेच दिवस चलाक गावाक नाय होता. म्हणून संध्याकाळी तळ्याक राऊंड मारुक भायर पडलय. राजवाड्याच्या लेस्टर गेटकडे इलय आणि जोरदार सर इली. मी धावतच त्या गेटखाली आसरो घेतलय. थय कोप-यात एका सायडीक एक बाजी कांबळा गुंडाळून बसललो.


पावस थांबाची चिन्हा दिसानत. तवसर पावसातसून भिजतच याक भटक्या कुत्रा थय इला. माज्या आणि बाजीच्या मधी येवन उभ्या रवला. फाड-फाड करुन आंग झटकल्यान. ता पाणी आंगार पडात ह्या भितीन मी आधीच बाजूक सराकलय. बाजीन दखलच घेवक नाय.


पावस वखाळतुकच त्या कुत्र्यान, बाजीक दगड समजान ढॅंग वर केल्यान. बाजीक ता जाणावला, बाजीन तोंडावरचा कांबळा बाजूक करुन, 'हाssड, हाsssड' करतुकच कुत्रा पळाला. बाजीची नजर माझ्याकडे गेली. बिचारो ओशाळलो, म्हणालो, 'हाल्लीच्या कुत्र्यांका माणूसकीच शिल्लक नाय रवलीहा!'


उडाणटप्पू

आठवणी: काही कटू काही गोड . . .

 

जॉर्ज फर्नांडिसांची ती मुलाखत . . . !


बहुधा २० जानेवारी १९९५. या दिवशी कोल्हापूरच्या 'सकाळ'ने कोकण रेल्वेवर एक पुरवणी केली होती. त्यात माझे काही लेख व छायाचित्रे होती. या संपूर्ण मार्गाचा मी आणि माझे एक वरीष्ठ वृत्तसंपादक संजय पाटोळे यांनी दौरा केला होता. रेल्वेच्या सगळ्या प्रमुख अधिका-यांशी चर्चा केली होती. माझ्याकडे जॉर्ज फर्नांडिस यांच्या विशेष मुलाखतीची जबाबदारी होती. त्यासाठी गरज भासल्यास दिल्लीला विमानाने जाण्याच्याही सूचना होत्या. पण त्याच काळात जॉर्ज मुंबईत एका कामगार मेळाव्यासाठी येणार असल्याचे समजले. मी आधीच एक दिवस मुंबईत पोहचलो. 


मुंबई सकाळ कार्यालयात जाऊन जॉर्ज च्या दौ-याचा तपशिल मिळवला. त्यानुसार जॉर्ज रात्रीच मुंबई कौन्सिल कामगार युनियनचे नेते शरद राव यांच्या फ्लॅटवर येऊन मुक्काम करणार असल्याचे कळले. मुंबई सकाळचे तेव्हाचे संपादक राधाकृष्ण नार्वेकरांनी, मला सोबत त्यांच्या एका नव्या स्टाफ रिपोर्टरला, नेण्यास सांगीतले. त्याने फक्त सोबत थांबावे व ऐकावे, अशा त्याला सूचना होत्या.


ठरल्याप्रमाणे मी व तो पत्रकार सकाळीच शरद रावांचा फ्लॅट असलेल्या इमारतीखाली भेटलो. शरद रावांचा फोन नंबर आधीच मिळवला होता, त्यांना कॉल केला. जॉर्ज मिटिंगमध्ये असल्याचे त्यांनी सांगीतले. पुन्हा थोड्या वेळाने केला, पुन्हा तेच उत्तर. तिस-यांदाही तोच अनुभव. मग मी वेगळी युक्ती केली. जॉर्जनी जुन्या समाजवादी मंडळींशी फारकत घेतली होती. तरीही दंडवतेंशी त्यांचे संबंध बरे असणार अशी माझी अपेक्षा होती. मी पुन्हा फोन केला आणि जॉर्जना दंडवतेंचा निरोप द्यायचा आहे, असे ठोकून दिले. मात्रा बरोबर लागू पडली. शरद राव जॉर्जशी बोलले असावेत. मला लगेच भेटायला यायला सांगीतले.


मी दुस-या मिनिटाला शरद रावांच्या ब्लॉकमध्ये. आत खरीच मिटिंग होती. मात्र ती आटोपली होती. जॉर्ज समोर आले, मी त्यांना कुडाळमधील त्यांच्या व दंडवतेंसोबतच्या माझ्या चर्चेची आठवण करुन दिली. त्यांनी ओळखले असावे, 'बोल, काय निरोप आहे नानांचा?' . . . त्यांचा थेट प्रश्न. मी म्हटलं, ' काहीच नाही. 'सकाळ' दैनिकाच्या कोकण रेल्वेवरील पुरवणीसाठी तुमची मुलाखत हवी आहे! फक्त दहा मिनिटे द्या!' 


ते हसले. ठिक आहे म्हणाले. मी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एका कॉटवर आमनेसामने बसून ही मुलाखत सुरु होती. त्यांची सटासट उत्तरे येत होती. अचानक ते 'स्टॉप' म्हणाले. मी चकीत! म्हणाले, 'झाली दहा मिनिटे, वेळ संपली!' मी हिरमुसला झालो. जॉर्ज उठले, मी उठलो. मला फारसे काही हाती लागले नव्हते. मी दरवाजापर्यंत गेलो. तेवढ्यात जॉर्ज नी मला परत बोलावले, म्हणाले, ' मित्रा! अशी दहा मिनिटे कधी कोणा राजकारण्याकडे मागू नकोस.  दहा मिनिटात मुलाखत घेऊन 'हा' मुलाखतीला न्याय कसा देणार, अशी भावना निर्माण होते. आम्हा राजकारण्यांना प्रसिद्धी हवीच असते. मुलाखतीसाठी तासभर वेळ माग. राजकारणी खूश होतील!' जॉर्जनी मला एक नवा मंत्रच दिला. नंतर जवळपास तासभर त्यांनी मला भरभरुन मुलाखत दिली. मी प्रश्न न विचारता देखील त्यांनी रेल्वेसंदर्भातील अनेक रहस्यांचा भेद केला. अनेकांना उघडे पाडले. नंतर ही मोठी मुलाखत 'सकाळ'च्या त्या पुरवणीत पहिल्या पानावर सविस्तर प्रसिद्ध झाली.


माझ्यासोबतचा तो रिपोर्टर चकीत झाला होता. जॉर्जनाही माझी युक्ती भावली होती. 


अरविंद शिरसाट


Friday, August 7, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

गजाल एका हाफ चड्डेची !


गरीबीतसून स्वत:च्या जीवार वर इल्ललो आबा बांबार्डेकार, खूप उधळो. तेवक्ता, 'गरीबीत दिवस काढले, आज चार पैशे मिळयतसो मा, मगे खर्च करुक मागेपुढे बघायचा नाय', ह्या तेचा तत्व! सगळे हायफाय वस्तू खरेदी करी.


 पेद्रु गोन्साल्विस, तेव्हा गोयात अधिकारी होतो, तेका फिराक गाडी, रवाक घर होता. दरवर्षी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीक आम्ही गोव्यात. पेद्रु रेस्ट हाऊस बूक करी. दोन दिवस आम्ही ' किंग मोमो' चो खा-प्या-मजा करा, ह्यो कार्निवल चो संदेश आधीच अंमलात आणू!


एका वर्षी आमका समुद्र किना-यावरचा रेस्ट हाऊस ऐनवेळी गावलला. समुद्रार कुदाचा आसल्याकारणान, हाफ चड्डे खरेदी करुसाठी आम्ही पयले म्हापसा मार्किटात घुसलो. पन्नास रुपयांत हाफ चड्डी! आबा आयकाना, 'फालतू, फूटपाथवरचे चड्डे माका नको. मी दुकानात घेतलय!'


आबा पणजेत एका, रेडिमेड कपड्यांच्या दुकानात घुसलो, पाठोपाठ आम्ही. दुकानातल्या नोकरान हेका शंभर रुपयेवाली हाफ पॅन्ट दाखयल्यान. 'छट, भारीतली दाखया!' . . . आबाची ऑर्डर. तो नोकर आत गेलो, तीनशे रुपये किंमत आसललो खोको आणल्यान. आबाक चड्डी पसंत. 


संध्याकाळी समुद्रार जाताना, आम्ही पन्नासवाल्या तर आबा तीनशे वाल्या चड्डेत. जवळपास सारखेच चड्डे. पेद्रु खो-खो हसत सुटलो, 'आबा, नुसतो पैसो आसलो म्हणान काय उपयोग, तू फसलय! हेंची फूटपाथवरची चड्डी दुकानात हाफ पॅन्ट बनता आणि तीच बॉक्सात गेली काय शॉर्ट म्हणून तुझ्या सारख्या अतीशाण्याच्या गळ्यात पडता!'


'म्हणजे ती शंभरवाली मी नाकारलेली पॅंट, त्या नोकरान आतल्या खोलयेत नेवन बॉक्सात भरुन आणल्यान आणि तीनशेक माझ्या गळ्यात मारल्यान?' . . . आबान कपाळार हात मारुन घेतल्यान.


उडाणटप्पू



Thursday, August 6, 2020

सुक्यो गजाली . . .



     

बेरकी म्हातारो . . . !

आयतवार होतो. आबा बांबार्डेकर गोव्याक जावच्यासाठी वाडीक स्टॅंडार इलो. त्याकाळी फक्त दोडामार्ग मार्गेच एस. टी. जायत. स्टॅंडार खूप दिवसांनी 'बाई, पायजे का सोबत' फेम, म्हातारो हेरेकार दिसलो. हातात पेपर नाय होते. थकललो दिसा होतो. आबान हटकल्यान, 'आजोबा, पेपर विक्री बंद? सोबत बंद झालो?'

हेरेकार खजील हसलो, 'गेले ते दिन गेले!' . . . आबाकय वायट दिसला, 'आज खय दौरो? गोयाक?'

'होय! म्हापशाक पावण्यागेर जातय!' . . . हेरेकार. 

 तितक्यात बस लागली. गर्दीत घुसान आबान सीट अडयल्यान. आबाची नजर हेरेकाराक शोधूक लागली. बघता तर काय! हेरेकार आधीच घुसान डावीकडली विंडोसीट अडवन बसललो.

गाडी सुटली. वाटेत प्रत्येक स्टॉपार गाडी भरतच गेली. बांदा गेला, डेगव्या पास झाला. कळणा पाठी पडला. दोडामार्गात बरेच प्रवासी उतारले. मोकळा, मोकळा वाटला. म्हातारो हेरेकार गाढ झोपललो. कंडक्टराचो अचानक तेच्याकडे लक्ष गेलो. कंडक्टरान तेका हलयल्यान, 'आजोबा उठा! डेगव्याक उतराचा होता मा तुमका?'

बिचारो म्हातारो खडबडान जागो झालो, 'ऑं, खय इली गाडी? अरे बाप-रे! अस्नोडा इला? आता मी पाठी डेगव्याक परत जाव कसो?'

'हय उतरा अस्नोड्यात आणि परतीच्या बशीत बसा!' . . . कंडक्टराचो सल्लो.

'छा! असा कसा, माका डेगव्यात उठवक नाय कशाक? परतीच्या तिकटाक माझ्यार पैसे नाय, तूच माका आता परतीच्या तिकटाचे पैसे दी!' . . हेरेकरान कंडक्टरावांगडा हुज्जत घालूक सुरवात केल्यान.

'वा रे व्वा! मी खयसून दिव? तुमचो गोयात कोण पावणो आसलो तर तेच्याकडसून घेया पैसे!' . . . कंडक्टर.

'ठिक आसा, माका आता म्हापशात तरी उतर!' . . . हेरेकराच्या सूचनेनुसार कंडक्टरान ब्याद म्हापशाक उतरल्यान. कंडक्टराच्या नावान बडबडत उतारता, उतारता म्हाता-यान आबाकडे बघून हळूच डोळो मारल्यान . . . !

उडाणटप्पू

Wednesday, August 5, 2020

सुक्यो गजाली . . .



       
              
बाई, पायजे का सोबत ?

हिंदी सिनेनट ओमप्रकाशवरी दिसणारो वयस्क हेरेकार वाडीत पूर्वी आरडान पेपर विकी. महा बिलंदर आणि बेरकी. पेपर इकता, इकता लोकांचे कळीय काढी. वयाकडे बघून लोक वगी रवत. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी तो हमखास स्टॅंडार दिसा. 

एकदा रविवारी, मी आणि आबा बाबार्डेकार एस्टीन कोल्हापुराक जाय होतो. त्यावेळी फाटेक सहा वाजता पयली बस होती. बस सुटाच्या बेतात आसतांना ह्यो म्हातारो खिडकेकडे आरडत इलो, 'रविवार लोकसत्ता घ्या, सकाळ घ्या, पुढारी घ्या . . . !'

आबा खिडकेकडे बसललो, आबान रुपयो दिवन लोकसत्ता घेतल्यान. तितक्यात गाडी सुटली. तिकीट काढून झाल्यार आबाकडल्या लोकसत्ताची पुरवणी मी वाचूक घेतलय. लेख वाचलले वाटाक लागले. पुरवणी चुकान जुनी इली की काय, म्हणून  तारीख बघलय तर गेल्या रविवारची.

'आबा! लोकसत्तावाले खुळावले काय रे? गेल्या रविवारचीच पुरवणी आज परत टाकल्यानी चुकान!' मी आबाक पुरवणी दाखयलय. 

'लोकसत्तावाले नाय, आम्हीच मॅड झालो! त्या म्हाता-या हेरेकारान आमका बनयल्यान! गेल्या रविवारचो अख्खो लोकसत्ता गळ्यात मारल्यान. म्हतला पयल्या पानार जुने बातमे कशे, आता तारीख बघलय, तर गेल्या रविवारची!' . . आबा वैतागलो.

कोल्हापूरचा काम लवकर आटापला. परत वाडीक येयसर रात्रीचे आठ वाजले. हेरेकार खय दिसता काय आम्ही बघी होतो. लांब खयतरी आवाज आयकाक इलो, ' बाई, पायजे का सोबत?' . . . खयच्या तरी बाईच्या गळ्यात 'साप्ताहिक सोबत' मारता मारता  ह्यो खवट म्हातारो चावटपणा  करी होतो.

उडाणटप्पू

Tuesday, August 4, 2020

सुक्यो गजाली . . .


          

चपलांचो ढीग . . . !

टीसी च्या तावडीतसून आबा सही सलामत सुटलो तरी बाबीकाकाच्या तावडीतसून आबाची सुटका नाय होती. बाबीकाकान आबाक दम दिल्यान, 'आता माका घरापर्यंतचो रस्तो तू दाखवायचो, मी तुझ्या पाठसून चलतलय!'

बिचारो आबा! पण आबाचा नशिब जोरार होता. समोर बाबीकाकाच्या शेजारणीचा चडू चला होता. तेच्या पाठसून आबा चलत रवलो. आबान न चुकता घर बरोबर कसा गाठल्यान, हेचा कोडा शेवटपर्यंत बाबीकाकाक सुटाक नाय. 

घराकडे आते पोरग्यांका घेवन इल्ली. आबाचीच वाट बघी होती. बाबीकाकाच्या जाचातसून सुटल्या कारणान आबा खुश होतो. आतेन बराच कायमाय खावक आणलल्यान. चलान दमललो आबा रात्री लवकर निजलो. आतेन पायाच्या जखमांका मलम लायल्यान.

सकाळीच आते आबाक आपल्या घराक घेवन गेली. संध्याकाळी आतेच्या घोवान आबाक चुलत चुलत्याकडे नेल्यान. तोय बाबी काकाक गाळी मारी होतो. आबाच्या चपलांची गजाल आयकान तो हसतच सुटलो. तेचाय बाबी काकावांगडा पटा नाय.

थयसून भायर पडतांना आबाची नजर जीन्याखाली साठवन ठेयलल्या जुन्या, फाटक्या चपलारनी गेली. 'काय हो काका, इतकी जुती साठवन शी ठेयल्यासात, आरलेच्या वेतोबाच्या देवळावरी?'

'तुझ्या बाबीकाकासाठीच ती, गेली धा वर्षा साठयलसय. हाताक गावलो काय प्रत्येक जुता काढून मारतलय! माका शेंडी लायता काय?' . . . चुलतो करवादलो.

उडाणटप्पू

Monday, August 3, 2020

सुक्यो गजाली . . .

          

          

विदाऊट तिकीट . . . !

दादरच्या फूटपाथावरची बाबीकाकान घेवन दिल्लली चपला पायात मिरयत आबा अख्ख्या दादर फिरलो, शिवाजी पार्क, सेना भवन, शिवाजी मंदिर, कबुतरखाना सगळा फिरासर आबाचे कवळे पाय ज्याम दुखा होते. तेतूरच ता प्लॅस्टिकचा चप्पल जय थय चावा होता. 

तशाच अवस्थेत आबा बाबीकाकावांगडा रेल्वे स्टेशनार इलो. थय घे म्हणान गर्दी. चुकलय तर कर्माक मेलय, ह्या भितीपोटी आबा बाबीकाकाक नजरेआड होवक दिय नाय होतो. बाराणे खर्च झाले म्हणान बाबीकाकाय मनात वैतागललो आसाक होयो.

रेल्वे इली. गर्दीत आबा चिराडलो, पण बाबीकाकान तेका आत ढकलल्यान आणि आपणय घुसलो. आत बसाक जागाच नाय होती. बाबीकाका बोरीवलेक रवा. शेवटपर्यंत दोघय उभे. उतारतांना परत रेटारेटी. बाबीन आबाक ढकलीतच खाली उतरल्यान. चप्पल लागान पायाक इल्ललो फोड ह्या चेंगराचेंगरीत फुटलो. आबाचो पाय जखमेमुळे खूपच दुखा होतो.

 आबा वाकडो वाकडो चला होतो, ता बघून बाबीकाका आणखीनच करवादलो, 'सरळ चलत रव, माका चिकटान चला नको. मी गडबडीत तुझा तिकिट काढूक इसारलसय, ब्रीजार टीसी आसतलो, हय थय बघीत चल्लय तर तेका संशय येतलो. पाठी पाठी माझ्याकडे बघीत चला नको. माझो पास आसा.'

आबाच्या पोटात भितीन गोळो इलो. पण करता काय, बिचारो एका सायडीन, टीसीकडे न बघता चलत रवलो. 

उडाणटप्पू

Sunday, August 2, 2020

सुक्यो गजाली . . .


          

रक्षाबंधन . . . !


आबा बांबार्डेकार जितको फटकळ तितकोच नंदू इन्सुलकार मुखदुर्बल! आबासारख्या आपणय बिनधास्त रवाचा, मुलींवांगडा बोलायचा असा तेका वाटा, पण ऐनवेळी वाचा बसा. आबाच्या पाटसून, पाटसून फिरा पण आबाचो एकय दुर्गुण नंद्यात उतराना! नंदू गोरोगोमटो असलो तरी थोबडा निर्विकार! कायम कोरो करकरीत, इस्त्री केल्लो चेहरो. बघूनच पोरगी कंटाळत.

मुली राखी बांधतीत म्हणून तेंका टाळूच्यासाठी आबा दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी कॉलेजाक हमखास दांडी मारी, तर नंदू आवर्जुन हजर रवा, त्या निमतान तरी कोणय बोलात, पण हेका राखी बांधूची पण कोणाक इच्छा होय नाय.

आपली ही खंत नंदून आबाक सांगितली. आबान तेका एक आयडिया सांगल्यान, 'नंद्या! तू यंदा राखीचो स्टॉल घाल'. कॉलेजच्या गेटभायर आबानच नंदूक एका मित्राचो बंद गाळो मिळवन दिल्यान. मुंबैसून मागयलल्या  एकसो एक राखयेनी नंद्यान गाळो सजयल्यान. 

रक्षाबंधन चार दिवसार इला आणि मुलींची गर्दी वाढाक लागली. नंद्याचो धीर बळावलो, चेह-यार तेजी इली. नंदू बोलाक शिकलो. रक्षाबंधनाच्या आधल्या दिवशी तुफान गर्दी. नंदू गोकुळातल्या कृष्णासारखो मुलींच्या गर्दीत गडप झालो. दुपारी गर्दी ओसारली. नंदूक थोडी फुरसत गावली. तितक्यात कॉलेजच्या गेटातसून सुरग्या येताना दिसला. नंदू खुष झालो. सुरग्या अपेक्षेप्रमाणेच सामक्या दुकानात इला, 'ये सुरेखा! दुकान तुझाच आसा!' . . . नंदू चेकाळलो.

सुरग्यान सगळे राखये व्यवस्थित बघल्यान आणि चाराण्याची गोंड्याची राखी घेतल्यान, 'ही कोणाक, आबाक?', नंदू आपल्या विनोदार आपणच हॅss हॅsss करुन हसलो.

सुरग्याय हसला, 'नाय, . . . तुका!', असा म्हणीत नंद्याकडली राखी नंद्याकच बांधल्यान!

उडाणटप्पू

Saturday, August 1, 2020

सुक्यो गजाली . . .



          


आढ्याक, मढ्याक काय कंदीलाक ?


बाबल्या-बेबल्याच्या हट्टाक लागान, आबा बांबार्डेकारान दीपवाळेक, बांबूचो जुन्या पद्धतीचो आकाशकंदील करुक घेल्यान, पण प्रयत्न आंगलट इलो. ढोंगापोंगा इली आणि ओबडधोबड झालो. नाद सोडून दिल्यान आणि बाजारातसून प्लॅस्टिकचो कंदील आणून दिवाळी साजरी केल्यान.

पुढल्या वर्षी कानाक खडो. आधीच चतुर्थेच्या काळात आबान, आकाशकंदील स्पेशालिस्ट रघू चौकेकाराक ऑर्डर दिवन ठेयल्यान. आबा निर्धास्त होतो, तरीपण अदसूनमधसून आबा वाटेरच घर आसलल्या रघूक हटकीत रवा. 'आसा, आसा लक्षात आसा!' . . . रघूचा आश्र्वासन.

दिवाळी तोंडार इली. दसरो आटापललो. आबा सकाळीच बाजारातसून सामान घेवन स्कूटरीन घराक परता होतो. चढतेर समोरसून रघू खांद्यार माणगो घेवन येय होतो. आबा खूष! थाबलो, 'रघू माकाच मा?'

भिरकेत रघल्यान होकारार्थी टकला हलयल्यान, पण पटकन भानार इलो, 'छा, छा! तुमका न्हय तो! . . . पबीक तो!' . . . रघू.

आबा करवादलो, 'असा कसा? माकाच होयो, मी कधीच सांगलसय!'

रघल्यान तोंडातलो गूटको पचाक्कन थुकल्यान, ' अहो आबा! पबी सावत फाटेक ढकाललो, तेच्या तिरडेचो तो!'

उडाणटप्पू