Tuesday, June 30, 2020

सुक्यो गजाली . . .

सुक्यो गजाली . . .

मारुतीची गदा !

आबा ल्हान आसतानाची गजाल. आजचो लोदी आबा त्यावेळीय सुदृढ बालक होतो. चिडलो काय दोघा चौघाक भारी पडा. रोज शाळेतसून कळी हाडी.

आबाक दशावतारी नाटका खूप आवडत. मारुती, भीम ही तेची आवडती पात्रा. तेंच्या त्या गदेर हेचो डोळो. गदेक हात लावक गावता म्हणान ह्यो विंगेत बसान नाटक बघी. भीमाकडे, मारुतीकडे
गदा मागी. एका दशावता-यान गदा दितय म्हणून सांगून आबाक टांग दिल्ल्यान.

एकदा म्हाप्रुसाकडे, 'सीताहरणा'चो प्रयोग होतो. आबा विंगेत मांडी घालून बसलो. आबाक फसयणारो तो कलाकार मारुती झाल्लो. आबाची नजर त्या गदेर होती. मारुती आपल्या एंट्रीची वाट बघी होतो, तर इकडे आबा गदेसाठी तेका सतय होतो. नाटक झाल्यार दितय म्हणून मारुती आबाची समजूत घाली होतो.

तिकडे सीता अशोकवृक्षाखाली बसान मारुतीच्या एंट्रीची वाट बघी होती. सूत्रधारान बाजापेटयेर म्युझिक बदलून मारुतीच्या एंट्रीचो इशारो दिल्यान. मारुतीन उडी मारुचो प्रयत्न केल्यान पण तेका हलाकच येयना, आबान तेची शेपटीच घट्ट पकडून ठेयल्यान.

'माका पयली गदा दी, नायतर शेपांडो सोडूचय नाय!' . . आबान दम दिल्यान, मारुती रडकुंडीक इलो. हय शेपटी तुटाची पाळी इली. शेवटाक मारुतीन एकदाची गदा आबाच्या स्वाधीन केल्यान आणि आपली सुटका करुन घेतल्यान. गदा हातीत गावतुकच आबान घराक धूम ठोकल्यान आणि बिचा-या मारुतीन गदेशिवाय वेळ मारुन नेल्यान!

उडाणटप्पू 

Monday, June 29, 2020

सुक्यो गजाली . . .

सुक्यो गजाली . . .

भिका-याची दया !

आबा इब्लिस तर तेची बायल एकदम साधीभोळी. मुखदुर्बल. स्वत:हून कधी कोणाक हटकीत तर शप्पत! लॉकडाऊन असल्याकारणान आबा घरात. किचनपासून मोरयेपर्यंत सगळ्याभर आबाची लुडबुड. वगीचच बायलेची कामा मात्र वाढय!

त्यादिवशी दुपारची जेवणा झाली. बायल आवराआवर करुन भायर इल्लल्या भिका-याक जेवाण घालूक गेली. पाठोपाठ आबा हजर.

'काय गो! गेलो आठवडोभर मी बघतसय, हेरशी कधी कोणाक गरीबाक फुटी चाय न दिणारा तू बायलमाणूस, हयत्या फाटक्या, दाढयेचे खुंट खराखरा खाजयणा-या बुरशा भिका-यार इतक्या सा मेहेरबान?' आबान बायलेक फैलार घेतल्यान.

'माका दया येता हो तेची!' . . बायलेचो खुलासो.

'इतकी कसली दया?' . . . आबाची शंका.

'तो थोडो थोडो तुमच्यासारखो दिसता!' . . बायल.

'काsssय?' . . . आबा किंचाळलोच.

उडाणटप्पू

Sunday, June 28, 2020

सुक्यो गजाली


टमरेल!


आबा बांबार्डेकर दररोज फाटफटेक, फटफटेन बांद्यासून  वाडीक येय. वाटेत इन्सुलेत रवणा-या नंदू इन्सुलकाराच्या घराकडे थांबान तेकाय वांगडाक घेवन वाडीक  पुढे निघा.


एकदा तो असोच येय होतो, झुंजुमुंजू होता, बांदा- इन्सुली दरम्यान रस्त्याच्या कडेक बरेचजण बसलेले दिसत. आबाक तेंचो खूप राग येय. आबान अशाच एकाचो टमरेल लाथ मारुन उडवन दिल्यान.


नंद्याकडे येतुकच आबान तेका आपलो पराक्रम सांगल्यान. दोघय खो, खो हसत सुटले. नंद्याच्या आवशीन चहाचो कप आणून आबाच्या हातात ठेयल्यान. तितक्यात भायरसून नंद्याचे बाबा इले, ' काय हो, बेगीना कशे? ' . . . नंद्याच्या आवशीन इचारल्यान.


'हरामी मेलो, माझो टमरेल लाथेन उडवन कोणतरी टगो, मवाली फटफटेन पळालो, सगळा पाणी ओतला! सगळो मूडच गेलो, तसोच इलय!' नंद्याच्या बापाशीन खुलासो केल्यान, आबान गिळललो चहा घशातच अडाकलो . . .


उडाणटप्पू