Friday, July 31, 2020

सुक्यो गजाली . . .


          

म्हातारेचो बूट ते प्लॅस्टिक चपला !

ठरल्याप्रमाणे बाबी काका इलो आणि सुटयेत कंटाळलेल्या आबाक घेवन मुंबैक गेलो. बाबीकाका म्हणजे इरसाल आणि चिकटो मुंबैकार! आबा पयलोच मुंबैक गेल्लो. बाबी काकान तेका म्हातारेच्या बूटापासून, सत्तावीस मजली उषाकिरण बिल्डिंगपर्यंत सगळा फिरवन दाखयल्यान, 'आबा, आता तू कॉलेजात शिकतलय. लांब पॅंटीर बूट घालूचे आसतत, म्हायत आसा मा? . . . चल बूट घेवया तुका!'

आबा ज्याम खूष झालो! दोघय बाटाच्या शो-रुमात घुसले. बूटांचे दर साडेसात रुपयांपासून वीस रुपयांपर्यंत बघून बाबीकाकान आंग काढून घेतल्यान. चपलांचे दर विचारुक सुरवात केल्यान. तीन रुपयांपासून सात रुपयांपर्यंत चपलांचे दर. 

'एका बूटाच्या किंमतीत चपलांचे तीन जोड येतले, नाय रे आबा?' . . . काकाचा गणित आयकान आबाचा पडलाला त्वॉंड परत खुलला! 'आबा हिच चपला दादराक स्वस्त गावतत,' असा सांगून बाबी काका आबासकट दुकानातसून भायर पडलो.

दोघय फिरत फिरत दादरच्या फूटपाथवर इले. थय रबरी, प्लॅस्टिक, चामड्याच्या चपलांचे ढिग लागलले. थय बाबीकाकान दर काढूक सुरवात केल्यान, 'मी काय म्हणतय आबा, नायतरी आता पावसाळो सुरु जातलो. बूट, चामड्याची चपला टिकाची नाय, खराब जातली. दिवाळेच्या  सुटयेत परत मुंबैक ये, तेवक्ता तुका बाटाचे बूट घेवया!' असा पटयत बाबी काकान बाराण्याची प्लॅस्टिकची चपला आबाक बहाल केल्यान!

बिचारो आबा! सकाळी म्हातारेच्या बूटात खेळलो आणि संध्याकाळी प्लॅस्टिकची चपला मिरयत घराक परातलो!

उडाणटप्पू

Thursday, July 30, 2020

सुक्यो गजाली . . .


         

मुकेशचा भूत आणि आबा !

आबा बांबार्डेकार मुळातच नास्तिक. देव मानी नाय आणि भुतांकाय फाट्यार मारी. उमेदवारीच्या काळात आबान थोडे दिवस वर्तमानपत्रातय रात्रपाळी केल्यान. नवीनच दैनिक सुरू झाल्ला. आबा उपसंपादक! कोणीतरी एक भूतबंगलो पेपरवाल्याच्या गळ्यात मारललो. 

त्या बंगल्याच्या मालकाक मुकेशची दर्दभरी गाणी गावची आवड होती. तेनी स्वत:चो आर्केस्ट्राय तयार केल्लो. लगीन न्हावक नाय होतो. एकटोच रवा त्या जुन्या बंगल्यात. नंतर कधीतरी तेंनी नैराश्यातसून आत्महत्या केल्यान. पंख्याक लटाकलो. आबानय दुस-या दिवशी ता दृष्य बगलल्यान. नंतर त्या बंगल्यातसून रात्री अपरात्री गाणी आयकाक येतत असा, शेजारी पाजारी, थयसून जाणारे लोक सांगीत.

पेपर मालकान ती खोली बंदच ठेवचो निर्णय घेतलल्यान. पण आबान हट्टान ती मागून घेतल्यान, आणि आपण थय बसाक लागलो. पेपर नवीनच आसल्याकारणान, टेलिप्रिंटरची सोय नाय होती, रेडिओवरचे बातमे आयकान पेपरात छापूचे लागत. मालकान पूश बटणवालो ट्रांझिस्टर घेवन दिल्ल्यान.

एकदा रात्री सगळा काम आटपून आबा आपली खोली बंद करुन घराक गेलो. मध्यरात्री आबाचो फोन वाजलो. ऑफिसातसून फोन होतो, 'लगेच या!' आबा सोमतो गेलो. बघता तर सगळे कामगार भायर रस्त्यार उभे.

'काय रे, काय लफडा?' . . . आबा.

'तुमच्या खोलयेत भुताटकी आसा, मुकेशची गाणी आयकाक येतसत.' . . .  कामगार. आबाय चराकलो, पण डेअरींग करुन खोली उघडल्यान. लायट लायल्यान. आवाज त्या पंख्याखालच्या टेबलाकडसून येय होतो. आबान टेबलाचो बॉक्स उघडल्यान. आतलो ट्रान्झिस्टर आडवो पडललो. तेचो पूश बटण दाबलो जावन गाणी सुरु झाल्ली!

उडाणटप्पू

Wednesday, July 29, 2020

सुक्यो गजाली . . .


          

इंग्रजीच्या आवशीचो घो . . . !

आबा बांबार्डेकर अकरावी एस एस सी च्या शेवटच्या बॅचचो विद्यार्थी. मराठी मिडियम. आबाचे बाबा, नाना बांबार्डेकर शेतकरी असले तरी तेंचा इंग्रजी उत्तम! इंग्रजी कादंबरे, पेपर वाचीत. आबाचो शाळेचो इंग्रजीचो अभ्यासय नानांनीच घेतललो. आबाक सगळेच पेपर बरे गेल्ले. पास जावची फुल्ल गॅरेंटी आसल्याकारणान आबाचो हुरूपय वाढललो!

'नाना! आता दोन म्हयने सुट्टी, मी काय करु? वेळ कसो घालव?' . . आबा.

'बाबीकाका बलयतासा मा तुका मुंबैक? पंधरवडोभर तेच्याकडे जा, मुंबै फिर!' . . . नानांचो सल्लो.

'मुंबैक जावक वेळ आसा. काका येतलो आणि माका न्हेतलो म्हणासर मे उजाडतलो. तवसर काय करु?' . . . आबाची चिंता.

'असा कर, तुझा इंग्रजी पयल्यांदा सुधार! तेच्यासाठी वाचन कर. रोज टाइम्स वाच. सध्या ही कादंबरी वाचून काढ. वाचताना सोबत डिक्शनरी ठेय, शब्दाचो अर्थ नाय कळलो तर भितर शोध!' . . नाना.

नानानी दिल्लली कादंबरी घेवन रात्री जेवन आबा वाचूक बसलो. आबाक पयलोच शब्द अडलो. आबान सोमती डिक्शनरी काढल्यान, भितर शोध शोध शोधल्यान, शब्दच गावाक तयार नाय! आबा हैराण! वैतागलो आणि घुसमाट मारुन निजान दिल्यान. 

सकाळीच नानानी उठवन घातलो. आबा नर्व्हस! 'आवाडली काय रे कादंबरी?' . . . आबा गप! . . . 'वाचलय तरी?' . . . तरी आबा त्वॉंड उघडीना. . . 'किती पाना वाचून झाली? . . . रात्री बसललय मा वाचूक? . . . याक तरी पान वाचलय?' . . . नाना वैतागले.

आबान नकारार्थी मान हलयल्यान, ' पयलोच शब्द अडलो! डिक्शनरीतय खय गावाना!' . . .आबाची कबुली. 

नानानी कादंबरी काढून घेतल्यानी, पयला पान उघडल्यानी आणि कपळार हात मारुन घेतल्यानी, 'अरे खुळ्या आबल्या! ह्यो शब्द तुका डिक्शनरीत कसो गावतलो? अरे इंग्लंडमधल्या एका गावाचा नाव आसा ता!'

उडाणटप्पू

Tuesday, July 28, 2020

सुक्यो गजाली . . .


          




खुट्याक केलडा . . . !

शाळेतले आम्ही जुने मित्र-मैत्रिणी ४५ वर्षांनी भेटाचे होतो. ती आता काय करते, हेचा रहस्यय उलगडताला होता. मुंबै, पुणा, गोवा असे सगळीकडे विखुरलेले बालमित्र आज म्हातारपणाच्या उंबरठ्यार एकमेकांक भेटाचे आसल्याकारणान, सगळ्यांच्याच मनात हुरहूर वाढलली. 

गेट टूगेदरासाठी चौकूळ फायनल झाल्ला, आयोजनाची जबाबदारी आमच्यार होती. काचसामानाचो ठेको अर्थातच आबा बांबार्डेकरान हौशेन उचललेल्यान! आपली गाडीय तैनात ठेयलल्यान. ती रेल्वे स्टेशनार मुंबैकरांका आणूक जावची होती.

सकाळीच आबाचो फोन, 'नवाच्या ठोक्याक पुतळ्याकडे ये!' पडत्या फळाची आज्ञा मानून मी नवाक पाच मिनिटा असतांनाच पुतळ्याकडे हजर. आबा बरोब्बर नवाक इलो. एक मोठी पिशवी माझ्या हातीत दिल्यान, 'तवसर ह्या काच सामायन सांभाळ, मी चकणा घेवन पाच मिनटात येतय.'

आबा पट्टीचो घेवपी कलाकार आसलो तरी घरात घेना नाय, गाडयेत ड्रायवर आसतांना सोरो बाळगणा नाय ह्या माका ठावक होता. पाच मिनटात येणारो आबा अर्धो तास गायब म्हतल्यार, माका घामटा फुटला. मी नेमको सी सी टिव्हीच्या सामको. पुढ्यात माझी बॅग आणि आबाची पिशवी. पोलिसांका संशय इलो तर मी बाराच्या भावाक! हल्लीच चोरयांड्या दारु वाहतुकीक पोलिसांचो आशीर्वाद, असो लेख लिहिललय. पोलीस डूख धरुन होतेच.

माझा अक्षरश: खुट्याक केलडा झाल्ला. पिशवी सोडूनय जावक येय नाय होता. तितक्यात आबाची गाडी इली, आबा ऐटीत पुढे बसललो. आबाक ठेवणीतले गाळी दिलय मारुन, 'बळी दिवक मीच बरो बकरो गावलय?'

'तुझ्याशिवाय आणखी योग्य इसम कोण? . . तू पत्रकार, तुका कोण पकडतलो?. . शिवाय तू प्रामाणिक, कायय झाला तरी बाटलेची पिशवी नजरेआड करुचय नाय . . आणि तू दारुय पिणय नाय, म्हतल्यार, एखादरी बाटलीय अंदर करुचो प्रश्न नाय!' . . आबाचा तत्वज्ञान आयकान गाडयेतली सगळी बायलमाणसा सुद्धा फिदीफिदी हसली.

उडाणटप्पू

Monday, July 27, 2020

आठवणी: काही कटू काही गोड . . .

अतीवृष्टी आणि त्या दोन रात्री (१९९४ ऑगष्ट)

ऑगष्ट १९९४! सालईवाड्यातील जिल्हापरिषद शाळा क्र. ३ समोर असलेल्या छोट्या खोलीतील सकाळ दैनिकाचे माझे कार्यालय, आम्ही पाडगावकर बिल्डिंग (आता तिथे हॉटेल मॅंगो आहे) मध्ये शिफ्ट केले. त्याचवेळी दैनिकाचे कामही सुरुच होते. बातम्या कव्हर करणे, त्या लिहिणे, जिल्ह्यातून येणा-या इतर बातमीदारांच्या बातम्या संपादित करणे, संगणकावर टाइप करुन घेणे, प्रुफ वाचणे, अधूनमधून संपादकांशी चर्चा, असे दैनंदिन व्यवहारही सुरुच होते. टेलिफोन शिफ्टिंगसह तत्सम महत्वाची कामे ओळखीमुळे चुटकीसरशी पार पडली. रात्री दहाला माझी कामे आटोपून घरी गेलो.

 तेव्हा आम्ही जुनाबाजार रोडवर बालोद्यानासमोर, पूजा बार शेजारी, ख्रिश्चनच्या घरात राहत होतो. घर खूप जुने, मातीच्या भिंती व जमीन, कौलारु छप्पर असे होते. दिलीप प्रभावळकरना ते आवडायचे, ते अनेकदा त्या घरी यायचे.

तर त्यादिवशी दिवसभर पाऊस कोसळतच होता, रात्री जोर अधिकच वाढला. घरी जेवलो. दिवसभरच्या कामांनी खूप दमलो होतो. मी मुख्य खोलीत खाली जमिनीवर रस्त्याकडच्या भिंतीकडे पाय करुन झोपायचो. पायाकडे असलेल्या कॉटवर आपा (माझे वडील) तर माझ्या डोक्याकडे थोड्या दूर असलेल्या कॉटवर आई झोपायची. आपा झोपायचे त्या भिंतीपलिकडे सखल भागात एका मुस्लिम फॅमिलीचे असेच जुने चंद्रमौळी घर. त्यापलिकडे तो जुन्या बाजारात जाणारा रस्ता.

झोपण्यासाठी अंथरुणावर आडवा झालो, लक्ष साहजिकच छपराकडे गेले. समोरच्या भिंतीला असलेली चिर थोडी रुदावलेली दिसली. तिचे भेगेत रुपांतर झाले होते. शंका आली. आपांना दाखवलं, तेही चिंतेत पडले, आई उठून बसली. आमची गडबड ऐकून प्रदीप (मोठा भाऊ)
आतल्या त्याच्या खोलीतून बाहेर आला. भेग अधिकच वाढली.

 आपांनी त्यांच्या कॉटवरचे साहित्य, शेजारीच असलेला टिव्ही उचलला, तोवर मी अणि प्रदीप, त्याच्या शिरोडा नाक्यावरील घराचे बांधकाम करणा-या, म्हापणकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या, जेलजवळ असलेल्या घरी निघालो. तो भेटला. कामगाराना घेऊन येतो म्हणाला.

आम्ही घरी परतलो. सर्वत्र काळोख. बॅटरीच्या उजेडात घरातले सगळे बाहेर दिसले. धावतच पुढे गेलो. रस्त्याच्या दिशेची ती अवाढव्य भिंत शेजारच्या घरावर कोसळली होती. पण वेळीच आपांनी त्या कुटुंबाला सावध केल्याने, त्यांचा जीव वाचला. तशाही स्थितीत मी घरात घुसलो. आपा झोपत त्या कॉटवर छप्पराची तुळई छपरासह कोसळली होती. अर्धे छप्पर तग धरुन होते. घरात पावसामुळे चिखल झाला होता. पाऊस अविरत कोसळतच होता. उर्वरीत रात्र शेजारच्या दुस-या घराच्या ओसरीवर काढली.

सकाळी उजाडल्यावर घरभर फिरलो. घर राहण्याच्या लायकीचे राहिले नव्हते, शोकेस आतील सामानासह चिखलात मिसळली होती.  माझी गणिताची पुस्तके, माझी लेखांची कात्रणे, वर्तमान पत्रासाठी सतत लागणारी संदर्भ पुस्तके, कॅसेटसचाही चिखल झाला होता. वाचलेले व सुके राहिलेले साहित्य, शेजारच्या त्या दुस-या घरात हालविले. नगरपालिका, तहसिलदार कार्यालयाचे अधिकारी न कळवताच येऊन पंचनामा करुन गेले. 

पाऊस थोडा कमी झाला होता. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो. दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला. रात्रभराच्या जागरणाने डोळे चुरचुरत होते. जिल्हाभरातून पावसाच्या बातम्यांचा पाऊस पडत होता, फोटोंचा खच पडत होता. फॅक्स आणि कॉम्प्युटरला उसंतच नव्हती. संध्याकाळी उशिरा प्रदीपचा फोन आला, 'आम्ही नवीन घरी जात आहोत. आवश्यक साहित्य हालविले आहे, तू काम आटोपल्यावर थेट तिकडेच ये.'  मला विचार करायलाही वेळ नव्हता, तरीही रात्री लवकर म्हणजे नऊ वाजेपर्यंत काम आवरले.

 माझी तेव्हा कायनेटिक होंडा होती. चुकून जुन्याच घराच्या दिशेने वळली, विट्ठल मंदिरच्या रस्त्याला वळतांनाच भानावर आलो. अबाऊट टर्न केले आणि सालईवाड्याच्या दिशेने निघालो. पाऊस वाढतच होता. मिलाग्रीसजवळ आलो आणि चाक पंक्चर. समोर गजा नाटेकर रहायचा, तो धावतच आला. त्याच्या मदतीने चाक बदलले. रेनकोट असूनही नखशिखान्त भिजलो होतो.

जुन्या शिरोडा नाक्याच्या पुढे आलो. प्रदीपच्या (आताचे सर्वोदय नगर/शिक्षक कॉलनी) घराच्या रस्त्याला वळलो. रस्ता कच्चा होता, (आमदार विजय सावंत माझे खास मित्र, त्यांच्या आमदार फंडातून मी नंतर तो डांबरी करुन घेतला) त्या भागात आज शेकडो बंगले उभे राहिलेत, पण तेव्हा मध्ये मध्ये असे दोन चार पूर्ण झाले होते, काहींची कामे सुरु होती. खोजाली (ख्वाजा अली) बाग या नावाने ओळखल्या जाणा-या त्या भागात वीज नव्हती. (ती देखील वीजमंत्र्यांचा दबाव आणून मी गणेशोत्सवाआधी त्या भागात आणली.) त्या कच्च्या रस्त्यावर पुढे डबर (मोठे दगड) पसरलेले होते. त्यावरुन मी कसाबसा स्कूटर हाकत होतो.

 जवळपास दोनशे मीटर अंतर कापले असेस नसेल, अचानक माझी स्कूटर त्या दगडांमधल्या खड्ड्यात फसली आणि बंद पडली. सगळीकडे मिट्ट काळोख, काहीच दिसत नव्हते त्यात आभाळ फाटल्याप्रमाणे धो- धो पाऊस ओततच होता. प्रदीपचे घर किती अंतरावर आहे, त्याचा त्या काळोखात काहीच अंदाज येत नव्हता. 
 
मी मोठमोठ्याने प्रदीपच्या नावाने हाका मारु लागलो, पण पावसाच्या आवाजापुढे माझा आवाज फारच क्षीण वाटत होता. स्कूटर ढकलायला माझी ताकद अपुरी पडत होती. मी ओरडून ओरडून थकलो. गाडी तशीच सोडून जाताही येत नव्हते. तितक्यात अंधारातून कोणीतरी आला. त्याने स्कूटर खड्ड्यातून बाहेर काढून दिली. मी चालू करण्याच प्रयत्न केला. थोड्याशा प्रयत्नाने ती सुरु झाली. मी कसाबसा प्रदीपच्या घरी पोहचलो. तिथेही वीज नव्हतीच. नंतरचा आठवडाभर काळोखात, इमर्जन्सी लाईट, मेणबत्त्यांच्या उजेडात काढला.

दुस-या दिवशी सकाळी पुन्हा ऑफिसला निघालो तेव्हा रात्री मी कुठे अडकलो, त्याचा अंदाज घेतला आणि काळजाचा ठोकाच चुकला. तिथे पाणी जाण्याची वाट होती आणि त्याचे छोट्या ओढ्यात रुपांतर झाले होते. मला स्कूटर खड्ड्यातून काढून देणारा तो कोण होता? तिथे कोणाचे घरही नव्हते, दूर कामगारांची झोपडी मात्र दिसत होती.

अरविंद शिरसाट

सुक्यो गजाली . . .

          



बाबा गेलो पंढरीक . . . !

नंदू इन्सुलकार रिटायर झालो. बरे पाच पन्नास लाख गावले. ते आता खय गुंतवचे तेची चिंता तेका पडलली, पेद्रु गोन्साल्विसान शेअरात गुंतवचो सल्लो दिल्यान, तर मी जमिनीत. आबाचा म्हणणा होता तेनी सोन्यात गुंतवचे. 'नायतरी चडू आणखी चार पाच वर्षांनी लग्नाचा होतला. तवसर सोना आणखी म्हाग जातला, लग्नात आयते दागीने गावतले. प्रेम करुन लगीन केल्यान तरी सोना काय फुकट जावचा नाय!'

आबाचा लॉजिक आमका सगळ्यांकाच पटला. पेद्रु आराडलो, ' होय रे होय! गाजराची पुंगी, वाजली तर वाजली! . . नायतर मोडून खाल्ली!!'

 आबा करवादलो, 'पुंगी बंद कर आधी तुझी. बाबा गेलो पंढरीक, इलो तरी वडे! नाय इलो तरी वडे!'

'म्हणजे?' आमका अर्थच कळाक नाय, आबाच्या म्हणण्याचो.

'अरे गजाल जुनी आसा! त्याकाळी वारकरी चलत पंढरपुराक जायत. वाटेत थोडेजण आटपतय. पंढरपूरसून बरेपणी परत इलेच तर येतांना पंढरीच्या प्रसादाचे वडे आणित आणि समजा नायच इले, वाटेतच आटापले तर बाराव्याचे म्हाळाचे वडे आसतच. थोडक्यात वडे चुकाचे नाय! तसाच सोन्यात गुंतयललो पैसो वाया जावचो नाय!' . . आबान आपला तत्वज्ञान पाजळल्यान.

'मेल्या, वड्यांसाठी बापाशिक कित्याक पोचयतय?' . . . नंद्यान सोन्यातली गुंतवणूय सोमती कॅन्सल केल्यान!

उडाणटप्पू

Sunday, July 26, 2020

सुक्यो गजाली . . .

             



गण्याचो पावस !

आयतवार आसल्याकारणान आबा बांबार्डेकार वायच आळसावललो, अंथरुणात लोळा होतो. भायर पावसाची पिरपिर सुरू होती. आजुनय तासभर घुसमाट मारुन निजाचो आबाचो विचार होतो. तितक्यात लॅंडलाईनची रिंग वाजली. झक मारीत उठाचा लागला.

'हॅलोss! आबा बांबार्डेकर हियर . . !' . . आबान आळस दिल्यान.

'सकाळीच इंग्लिश कुत्रो चावलो काय रे तुका? . . मी शांतु बोलतय मांजरेकार!' . . . समोरसून हास्याचो गडगडाट.

'बोल, शांतूदादा! . . खूप दिवसानी?' . . आबा.

'अरे, माका सांग सध्या कोरोनाची काय स्थिती? आणि पावस आसा काय?' . . . शांतू.

'चवथेक येवचा येवजीत आसशित, तर अजिबात येवच्या भानगडीत पडा नको! कोरोना तर वाढतासाच, शिवाय पावसय वखाळनासा नाय!' . . . आबा.

'किती इंच झालो आतापर्यंत?' . . शांतू.

'सेंच्युरी मारुन झाली इतक्या नक्की!' . . आबान म्हायती दिल्यान.

'अरे, ह्यो कसलो पावस? पूर्वी वाडीत अडीच-तीनशे इंच पडा!' . . शांतू.

'बंडल! शक्यच नाय!' . . . आबा करवादलो.

'पर्जन्यमापक तेवा हॉस्पिटलाच्या आवारात ठेयत. गणो वाडकार रोज थयसूनच शाळेत ये-जा करी. तो आपली कर्मा करी! . . . एकदा वॉर्डबॉयन पकडल्यान. डॉक्टरच्या पुढ्यात उभो केल्यान. डॉक्टरान तापयतुकच सांगल्यान, . . . चेरापुंजीक चारशे इंच पडता, मगे आमच्याकडे कमी ख्येका?' . . . शांतून गण्याचा लॉजिक सांगल्यान.

'तरी म्हतल्या, वाडीच्या पावसाक गण्याचो पावस ख्येका म्हणतत!' . . आबा.

उडाणटप्पू

Saturday, July 25, 2020

सुक्यो गजाली . . .

        


फाssट . . . ढूमsss !

गंगाराम तुळपुळे ह्यो आबा बांबार्डेकराचो शेजारी. आबाच्या बापाशीच्या वयाचो. गंगारामाचे गजाली आयकण्यासारखे, धमाल! तेनी तरुणपणात काय काय दिवे लायले आसतले हेचो अंदाज त्या गजालींवरसून येय. तेचे शिकारकथा अख्ख्या आवाठात ठावक होते.

गंगारामाचा चडू दिसाक सुंदर, आबाक ता तसा भिक घाली नाय, पण 'वायच टायमपास' म्हणून आबा गंगारामाकडे घुटमळा! मध्यंतरी माका, पेद्रुक आणि नंदू इन्सुलकाराक घेवन आबा, गंगारामाक खाजवक गेलो.

'काका! तुमची ती सुप्रसिध्द बंदूक बघूची होती जरा पेद्रुक!' . . . आबान विषयाक हात घातल्यान. गंगारामान एअरगन भायर काढल्यान, 'आधी ह्या एअरगनची गजाल आयक!' गंगारामाची रेकॉर्ड सुरु झाली.

'साठातली गजाल आसा ही! सशाच्या शिकारीसाठी रानात गेल्लय. ससो गमाक नाय, पण एका झाडार कवडो दिसलो, म्हतला कवडो तर कवडो! पोझिशन घेतलय आणि चाप ओढतलय इतक्यात पायाकडे कायतरी सरसरला. मान न हलयता नजर खाली केलय, बघतय तर काय, ससो! माझी झाली पंचायत! कवडो पाडूचो, तर ससो पळतलो आणि सशाक गुळी घालूची तर आवाजान कवडो उडतलो! . . . ' गंगारामान पॉज घेतलो.

'मगे?' . . . आम्ही चौघय उत्सुक. 

'मगे काय? क्षणभर विचार केलय. पोझिशन कायम ठेयलय. कवड्यार नेम धरललोच होतो, हळूच पाय वर उचललय आणि फाssट-ढूमsss. एकाचवेळी पायाखाली फाटदिशी ससो चिरडलय आणि कवड्यार ढूमदिशी बंदूक चलयलय!' . . . गंगाराम.

उडाणटप्पू

Friday, July 24, 2020

सुक्यो गजाली . . .

         



ना -गडे !

आबा बांबार्डेकराचो झिल बाबलो एकदम शामळू सखाराम. अगदी आवशिर गेलो. मुखदुर्बल! मागे, मागे रवा, चारचौघात मिसळा नाय. बायलमाणसारखो सतत रांधपात, आवशिचो पदर धरुन. आबा तेका खूप करवादा, पण अजिबात फरक नाय. तेच्याउलट बेबला, आबाचा चडू! अगदी बापूस. नायथयला आगाऊ, फटकळ, भांडखोर!

'बघलय मा? ह्यो मिडियम चो फरक! इंग्लिश मिडियम ची मुला चमाकतत, धीटपणा येता तेंका, चारचौघात बोलाक शिकतत. बेबला बघ, मोठेपणी कलेक्टर जातला!' आबा चडवाचे गूण गाय होतो.

'बाबल्याक कमी समजा नकात, तो समजुतदार आसा, नम्र आसाक होया माणसान. बेबला वाचाळ, शोभना नाय ता बायलमाणसाच्या जातीक!' बायलेन झिलाची बाजू मांडल्यान. तितक्यात हॉर्न वाजलो. व्हॅन थांबली.

बेबला पाठिक मारलला दफ्तार सांभाळीत धावतच घरात घुसला. दफ्तार दिल्यान टाकून आणि नाचतच सुटला, 'नागडे . . . नागडे . . . नागडे . . . !'

पयल्यांदा आबा चपापलो, लुंगी जाग्यार होती! 'अगो बेबल्या, वायच थांब! कोण नागडे? कोणाक बघलय तू?' तरी बेबला नाचाचा थांबाना. 'उद्या नाग-डे, सुट्टी . . . सुट्टी . . . सुट्टी . . !' . . . . बेबल्यान ब्रेक लायलो.

'अगो स्नेक-डे १६ तारखेक आसता, उद्या कशी सुट्टी? आणि स्नेक-डे ची सुट्टी कधीपासून दिवक लागले?' . . . आबा चक्रावलो.

'खुळे काय शाणे हो तुम्ही? इंग्लिश मॅडियमचो परिणाम तो! अहो नाग-डे म्हंजे नागपंचमी! उद्या नागपंचमी महो, तेची सुट्टी ती! कर्म आणि दशा!' . . . आबाची बायल घोवाची अक्कल काढूक गावल्याच्या समाधानान खो . . खो हसतच सुटली!

उडाणटप्पू

Thursday, July 23, 2020

सुक्यो गजाली . . .

         



झाडपिके आंबे . . . !

यंदाच्या सिझनात आबाच्या बागेतली गारफा ब-यापैकी धरली. यंदा पैसे मिळवक चान्स इलो म्हणून आबा खूष होतो. पण कोरोनान धमाटो दिल्यान. माल भायर पाठवक गावाना आणि गावात इकुचो तर लॉक डाऊन! आबा शाप हरमाळलो. खिशात पैसोय नाय. रस्त्यार हडगेत भरुन बसाचीय लाज.

आबाकडे बारिकसारिक कामाक येणा-या शेवत्याकय काम नाय होता. आबान तेका कोंबार काढल्यान. ता तयार झाला. आबान सगळे आंबे रिक्शात भरल्यान आणि त्याचदिवशी सुरु झाल्लल्या वाडीच्या बाजारात इलो.

 शेवत्याक टोपले, हडगे लावन दिल्यान आणि आपण लांब जावन उभो रवलो. गिरायकांची गर्दी झाली काय आबा आपणय गिरायक बनान गर्देत घुसा, वगीचच दर केल्याचा नाटक करी, 'आंबे मस्तच आसत, परत गावाचे नाय! दी बाये दोन डझन!', असा मोठ्यान म्हणीत स्वत:च खरेदी करी. लोकांचे मगे आंब्यार उडये पडत. गर्दी कमी झाली काय हळूच येवन आधी वगीचच घेतलले आंबे परत टोपलेत ओती.

दोन तीन दिवस आबान ही आयडिया वापरुन बरोचसो माल इकून काढल्यान. असोच गर्दीत रवान आबा अळयाबळयाचो दर करीत आसताना बाजूकच उभो आसललो माणूस आबाच्या कानात मोठ्या आवाजात पुटपुटलो, 'झाडपिके आसत ते!' बाकीच्या गिरायकांच्या ता कानात पडला, आणि गिरायका पांगली.

आबाचा टाळक्या सणाकला, ' कोण सांगता झाडपिके? मी सोत्ता गडी चढवन खोबल्यान उतरवन घेतलसय! '

'म्हणजे? तुम्हीय माझ्या सारखेच?' . . . म्हतल्यान आणि त्या ईसमान सायट मारल्यान!

उडाणटप्पू

Wednesday, July 22, 2020

सुक्यो गजाली . . .

         



कानगोष्ट . . . !

आबा बाबार्डेकराच्या डिपार्टमेंटाक नवीन सायब हजर झालो. एकटोच पुढे इलो, घरकारणीक आणूक नाय. साहजिकच हाताखालचे आबासारखे कर्मचारी, सायबाक खूष ठेवच्यासाठी दुपारच्या जेवणाचा आमंत्रण दिवक लागले. आबा तर प्रमोशनाक ड्यू होतो. आबानय बायलेच्या संमतीन सायबाक जेवक बलयल्यान. आयतवार होतो, पोरगीय घरात होती. 

आबाक याकच टेन्शन होता. सायबाच्या फाटक्या कानाबद्दल चडू सायबाक थेट कायतरी इचारीत, नायतर हसात तर प्रमोशनार पाणी सोडूची पाळी. आबान चडवाक बलयल्यान, 'ह्या बघ बेबल्या, तुका आधीच सागून ठेयतसय, आज आमच्याकडे माझे मोठे सायेब येतलेसत. तेंचो कान फाटको आसा. तू तेंका हसा बिसा नको, कानाबद्दल काय विचारुय नको. गप्प बसायचा. हाताची घडी तोंडार बोट!'

बेबल्यान कबूल केल्यान. आबाचो जीव भांड्यात पडलो. दुपारी सायब हजर. आबान स्वागत केल्यान. सायेब घरात इले. आबाच्या झिलान, बाबल्यान पाण्याचा ग्लास दिल्यान आणि तो आवशिक मदत करुक रांधपात गेलो. 

आबा आणि सायेब गजाली मारीत जेयत बसले आसतांनाच, बेबला येवन समोरच जमिनीर फतकल मारुन बसला. हाताची घडी, तोंडार बोट आणि नजर सायबाच्या फाटक्या कानार. सायेब अस्वस्थ! तिकडे आबाचीय चुळबुळ वाढली. 

आबान नजरेनच बेबल्याक दबकायल्यान, आत जावची खुणा केल्यान! डोळे मोठे करुन चडवाकडे रागान बघल्यान. बेबला वैतागला, 'बाबानू, डोळे कित्याक वटारतासात, मी हसलय खय तेंच्या फाटक्या कानाकडे बघून?'

उडाणटप्पू

Tuesday, July 21, 2020

सुक्यो गजाली . . .


       

थापाट . . . !

मोटरसायकलीन कुणकेश्वराक जावचा ठरलला. मी सकाळीच आबा बांबार्डेकाराकडे हजर झालय! आबा बेसीनवरच्या आरशासमोर उभो रवान दाढी करी होतो. तो गालातल्या गालात हसतासा, ह्या माका आरशात स्पष्ट दिसा होता. दाढी आटापली, तयारी करुन आबा भायर इलो.

पयल्याच कीकीक आबाची बुलेट धडधडली. मी पाठी मांड टाकलय. गाडयेन वेग घेतलो.  मालवणाक पोचल्यार नाश्तो करुक थांबलो. 'सकाळी दाढी करताना हसा सो होतय? सुरग्या स्वप्नात इल्ला काय रे?' मी थेट मुद्याकच हात घातलय! आबाय वाटच बघी होतो.

'सुरग्या न्हय, मेल्या तूच स्वप्नात इलय!' . . . आबा.

'मी? . . मी कसो काय?' . . . मी चक्रावलय.

'अरे, गंमतच झाली. आजची तयारी करुन नीजासर रात्री उशीर झालो. नाना खाटीच्या बाजूकच खाली जमिनीर नीजलले. फाटेक कधीतरी माका स्वप्न पडला. तू आणि मी आत्मेश्वराक प्रदक्षिणा घालतसो. देवळाच्या सायडीक माका घाण दिसली. ती बघून मी थुंकतलय होतय. तुझ्या ता लक्षात इला, तू माका थांबयलय. हयसून देवाच तीर्थ जाता, हय थुका नको, लांब त्वॉंड करून थुंक, असो सल्लो दिलय. मी तुझा आयकान लांब त्वॉंड करुन थुंकलय!' . . . स्वप्न सांगता सांगता पॉज घेवन आबा हसाक लागलो.

'पुढे?' . . . माझी आतुरता बघून आबा हसाचो थांबलो. 

'पुढे, खाडकन माझ्या कानाखाली कोणीतरी आवाज काढलो. मी खडबडान जागो झालय. बघतय तर काय! खाली नीजलले नाना उठान बसलले. माका गाळी मारता, मारता पांघरुणान आपला त्वॉंड फुशी होते!' . . . गाल चोळीतच आबान सांगल्यान.


उडाणटप्पू

Monday, July 20, 2020

सुक्यो गजाली . . .

         



बार बार देखो . . . !

पेद्रु गोन्साल्विसाच्या चुलत्याच्या हॉटेलार धाड पडली. परवानो नसतानाय सोरो इकता, म्हणून गुन्हो दाखल झालो. पोलिसांनी तेका अटक केल्यानी. तेका सोडवन आणूच्यासाठी, तसोच दर्दी वकील होयो होतो. पेद्रु आबा बांबार्डेकराकडे गेलो. आबान तेका गुरग्याकडे न्हेल्यान. गुरग्याचो भाव नामी वकील, पण दारुचा व्यसन. गुरग्यान भावाक कोर्टात भेटाक सांगल्यान.

दोघय कोर्टात पोचले. थय वकिलाचो कारकून गावलो, 'आबा, खय रे?'

'बरा झाला, तू गावलय तो! गुरग्यान पाठयल्यान, सायेब खय आसत?' . . . आबा.

'बारात! आणखी खय असतले?' . . . कारकून हसलो. आबाक काय सायबाक, ता मात्र कळाक नाय. त्या गडबडीत 'खयच्या बारात' ता इचारुचा डेअरिंग होवक नाय.

आबा आणि पेद्रुन वाडीतले सगळे बार पालथे घातले, पण वकील सायबाचो पत्तो लागाना. आता दुसरो वकील बघायचो काय, अशा विचारातच परत कोर्टात इले. हेंका बघून कारकूनान हाक मारल्यान, 'गावले मा?'

'नाय, सगळे बार शोधले. खयच नाय. परत सगळ्याभर फिरलो, पण पत्तो नाय!' . . . पेद्रु रडकुंडीक.

'म्याड मरे तुम्ही, हय या! हयते बघा थय खिडकेकडे बसलेसत फायल वाचीत!' . . . कारकून.

'पण, तुम्ही तर मघाशी आमका बारात बसले म्हणून सांगीतल्यात!' . . . आबा वैतागलो.

'बरोबर! ह्योच बार, वकिलांची चेंबर! केस लागासर हयच बसतत सगळे वकील. हेकाच बार म्हणतत, तुम्ही खुळ्यावरी ते बार धुंडाळीत बसताल्यात ता कोणाक ठावक?' . . . कारकूनान कपाळार हात मारुन घेतल्यान!

उडाणटप्पू

Sunday, July 19, 2020

सुक्यो गजाली . . .

              



गटारी . . .!

गटारीचो प्रोग्राम आटापल्यार आबा बांबार्डेकार आणि नंदू इन्सुलकार एकमेकाच्या आधारान, घराच्या दिशेन चलत जाय होते. तितक्यात पाठसून एक जीप भरधाव ईली. ड्रायव्हरान कचकचावन ब्रेक मारल्यान.
आबाक वाटला आपल्याच डिपार्टमेंटची जीप! आबा जागच्या जाग्यार तोल सावरीत उभो रवलो. ड्रायव्हरान त्वॉंड भायर काढल्यान.

'अरे, पांडू तू? माका वाटला, आमचे सायेब जीपीन ईले. तू इतक्या रात्रीचो खय चल्लय?' . . . आबान ड्रायव्हराक ओळाखल्यान.

'आबा! तुमका आमचे सायेब गमलले?' . . . ड्रायव्हर.

'होय, मघाशी बारात होते खरे, पण लवकर उठान गेले. आमच्या आधीपासूनच बसलले!' . . . आबान सांगल्यान.

'आता खय सोधतलय ह्या सोरेकाराक? घरात निक्तो पाटार बसललय, तर सायबाची बायल हजर. माका जेवणावरसून उठवन घालयल्यान घोवाक सोधूक! . . . तुमका काय आयडिया आसली तर सांगा!' . . . ड्रायव्हर.

'असा कर! गाडी हयच लाय. हयसून स्टॅंडापर्यत चलत जा आणि चलत ये. जाताना डाव्या सायडीचे आणि येताना उजव्या सायडीचे गटार शोध. नायतरी आज गटारीच आसा, हमखास गावतले बघ!' . . . आबान होलम दिल्यान.

उडाणटप्पू

Saturday, July 18, 2020

सुक्यो गजाली . . .

       



हांव मनवेल डिकॉस्टा . . !

कॉलेजात आसतानाची गजाल! गॅदरींग लागी इल्ला, आमच्या ग्रुपचा नाटक होता. आबा बांबार्डेकार हिरो, सुरग्या हिरॉईन! आबा तेजीत. नाटक ऐतिहासिक! वेशभुषा, रंगभुषा आणि नेपत्थ्याची जबाबदारी वर्दमांकडे सोपवच्यासाठी आबा एस्टीन कुडाळाक जाय होतो. 

वाडीच्या स्टॅंडार नाय थयली गर्दी, तरी आबा पयलोच गाडयेत घुसलो. डावीकडची विंडोसिट अडयता, अडयता आबाचो लक्ष खिडकेभायर गेलो. थय गर्दीत सुरग्याचो बापूस झगाडताना दिसलो. आबान सोमती आपल्या शेजारची सीट राखून ठेयल्यान.

सुरग्याचो बाबा गाडयेत चढलो, आबान तेंका खुणयल्यान, ते खुश. हेरशी आमकाय कोणाक विंडो सीट न दिणारो आबा उदार झालो. सुरग्याचो बाबा विंडो सिटीर विराजमान झालो. आबाचे आभार मानल्यान, 'तुम्ही माका ओळखतास?'

'म्हणजे काय? ह्या काय विचारणा झाला?' . . . आबा.

'अरे व्वा! कशे काय बुवा?' . . . सुरग्याचे बाबा.

'तुमचा चडू आमच्याच वर्गात, आमच्या नाटकातय आसा!' . . . आबा.

'कोण? मारीया काय ॲना?' . . . तो इसम.

'तुमचा आडनाव?' . . . आबा भिरभिरलो.

'हांव डिकॉस्टा . . . मनवेल डिकॉस्टा!' . . . जेम्स बॉंडच्या स्टायलीत तेनी हात पुढे केल्यान, आबाचा त्वॉंड मक्याचा ब्वॉंड खाल्ल्यासारख्या वाकडा झाला.

उडाणटप्पू 




Friday, July 17, 2020

सुक्यो गजाली . . .

                  



धूम 4

बूडाखाली बुलेट आसली काय आबा बांबार्डेकार हवेर स्वार होय. अशावेळी आबाच्या पाठी बसाचा म्हणजे जिवार उदार होना. विमो काढललो आसाकच होयो!

मध्यंतरी आबावांगडा गोयाक जावची एकदा पाळी इली. गाडी हळू चलवची अट घालूनच आबाच्या पाठी बसलय. आबान अट पाळल्यान, गजाली मारीत रमत गमत चलललो. हाय-वे वरती इलो तरी आबाचो वेग वाढाक नाय, हेचा समाधान होता. तितक्यात पाठसून नवी कोरी हिरो होंडा मोटरसायकल चलयत एक सरदारजी इलो. आमका पास करुन जाता जाता आबाकडे बघीत आराडलो, ' क्या कभी होंडा चलाई है क्या?'

आबाक चॅलेंज? आबाचो स्पीड वाढलो. आबान क्षणार्धात सरदारजीक पाठी काढल्यान. परत पाठसून सरदारजी वेगात इलो, आबाक पास करतांना परत आराडलो, 'क्या कभी हिरो होंडा चलाई है क्या?'

आबाचा सणाकला, आबा धूम स्टायलीत झापकन पुढे गेलो. शर्यतच लागली. शेवटी भितीन मीच आरडलय तसो आबान नाद सोडल्यान. थोड्या अंतरार गेलो न गेलो, तोच बघतो तर काय! सरदारजीची ढेंगा वरती! एका बाजूक हिरो होंडा पडलली. आबान बुलेट सायडीक लायल्यान, धावतच आम्ही सरदाजीकडे गेलो, सरदारजी ब्वॉब मारी होतो. 

'ऐसे कैसे हुवा सरदारजी? बहुत अकड रहे थे, हिरो होंडा चलाकर बुलेट को चॅलेंज कर रहे थे!' . . . आबान हिंदी पाजळल्यान.

'वही तो, अरे भाईसाब मै पहिली बार हिरो होंडा चला रहा था, इसलीये इसका ब्रेक किधर है ये पुछ रहा था . . . ' . . . सरदारजी रडकुंडीक!

उडाणटप्पू

Thursday, July 16, 2020

सुक्यो गजाली . . .



                           

देव दिता . . . !


आबाचे बाबा, नाना बांबार्डेकर म्हणजे अजब रसायन, भांडखोरय तितकेच. स्वत:ची चूक कबूल करुची सवयच नाय. शेजाराकच रवणा-या सख्ख्या भावावांगडा हेंचो उभो दावो. जमीन आणि प्रॉपर्टीवरसून  टोकाचे वाद! पण आबाचो काकार खूप जीव.

सकाळी सकाळीच आबा आपणाक न सांगता, गाडी घेवन खय गेलो, हेचा नानांका कोडा होता. भायर हॉर्न वाजलो, नाना घाय घायत खाटीवरसून उठले. भायरसून येणा-या आबाच्या आंगारच आपाटतले होते. 'काय हो, पडतसात शे?' . . . आबा.

'डावो डोळो दुखतासा! ता जावंदेत. तू सकाळीच खय गेल्लय?' . . . नाना.

'अहो, सकाळी तातूकाका हुंब-याक अडखळान खळ्यात पडले. टकलेक खोच पडलीसा. तेंका मलमपट्टी करुक आरोग्य केंद्रात नेवन आणलय, सकाळपासून कमी दिसतासा, चष्मो बदलूक होयो म्हणा होते!' . . . आबा.

'काय बदलूची गरज नाय. साफ आंधळो जातलो तो!' . . . नाना.

'भविष्य सांगतासात?' . . . आबा कुत्सित हसलो.

'हसा नको! मी सांगतय तसाच जातला! रात्री स्वप्नात देव इल्लो, वर माग म्हणाक लागलो. मात्र अटय घातल्यान, तू मागशित ता तुका दितलय पण, तेच्या दुप्पट तातूक दितलय!' . . . नाना.

'मगे, काय मागल्यात तुम्ही देवाकडे?' . . . आबाची उत्सुकता चाळावली.

' खूप विचार केलय आणि देवाक सांगलय, माझो एक डोळो फोडून टाक!' . . . नानांची मागणी आयकान आबा उडालोच. 

उडाणटप्पू

Wednesday, July 15, 2020

सुक्यो गजाली . . .




                   
                

आबल्याचा बेबला !


आबा बांबार्डैकराचा चडू ज्याम पिरपिरा. वास्तविक आबान पोरग्यांका लाडात वाढयल्यान. तोंडातसून शब्द भायर पडाची फुरसत, आबान तो झेलुकच होयो! तरीय ता पिरंग्या, आवशीसारख्या!

आबा हुशार, बेरकी तर बायल खुळी, बावळट! आबा बायलेर वैतागत रवा. 'असा काय गो तू? तुझ्या कायच कसा ध्यानात येना नाय?' . . असा आबा करवादा.

हिशोबावरसून आबा बायलेवांगडा हुज्जत घाली होतो, तितक्यात चडू शाळेतसून पिरंगत इला. 'काय गो बेबल्या, आता आणखी तुजा काय झाला?' . . . आबान चडवाक हटकल्यान.

'सामाईत नपास झालय!' . . . बेबला पिरपिरला.

'आवशिचे गूण घेतलस, तीय तिसरीत उडावलली!' . . . आबाचो गौप्यस्फोट.

'माका पावलो दिया!' . . . बेबला.

'नापास झालय तेचा बक्षीस?' . . . आबा.

'नाय! माका चिरमुले खावचे आसत!' . . . बेबला.

'चिरमुरे खावन अक्कल येता?' . . .आबा.

'होय! आमच्या वर्गातला गुलब्या रोज मधल्या सुटयेत चाराण्याचे चिरमुले खाता! तेचो पयलो लंबर ईलो!' . . . बेबला.

'धर, ह्यो घे रुपयो!' . . .आबा.

'रुप्यो नको, पावलोच होयो!' . . . बेबला.

'अगो, पावल्याचे तू खा! आणि रवलल्या बाराण्याचे आवशिक दी!' . . .. आबा खेकासलो.

उडाणटप्पू

Tuesday, July 14, 2020

सुक्यो गजाली . . .




                   


'केआढुंमु !'

नावाप्रमाणेच सुरग्या दिसाक सुरेख, नाकी-डोळी नीटस. तेतूर मुंबैसून इल्ला, अख्ख्या कॉलेज सुरग्याच्या प्रेमात. भितूरच आबा बांबार्डेकारय नंबराक! सुरग्याच्या नजरेत येवच्यासाठी आबाचे काय ना कायतरी माकडचेष्टा सुरुच होते. सुरग्या मात्र कोणाकच भिक घाली नाय! मॉड सुरग्याक सगळेच गाववाले बावळट वाटत!

मध्यंतरी आबान नवीकोरी गॅबर्डीनची बेलबॉटम पॅंट आणि बॉस्कीचो शर्ट शिवल्यान. बरो दिसा होतो. दिवसभर सुरग्याच्या पुढ्यात परत, परत येय होतो. सुरग्याचो लक्ष वेधून घेवचो, जीव जायसर प्रयत्न करी होतो.

सुरग्याचो लक्ष एकदाचो आबाकडे गेलो. सुरग्या फुतुक्कन हसला, आबा लाचार हसलो. सुरग्या हळूच पुटपुटला, 'केआढुंमु!' . . . आबा खूष, सुरग्या कायतरी बोलला, जमला! . . . पण काय बोलला? . . . 'सौदागरा'तल्या ईलू-ईलू सारख्या? . . . आबाक मनातल्या मनात गुदगुले होय होते. 

'ये ईलू-ईलू क्या है?' च्या चालीर आबा जेका तेका इचारीत सुटलो, 'ये केआढुंमु क्या है?' . . . कोणाकच सांगूक येयना, आबा टेन्शनात! दोन दिवस सुरग्याय गायब. शेवटाक धीर करुन एकटोच सुरग्याच्या घराकडे गेलो. तितक्यात समोरसून सुरग्याचो धाकटो भाव येताना दिसलो. आबान तेका हटकल्यान, ' केआढुंमु म्हणजे काय रे? '

तोय सुरग्यासारखोच फुतुक्कन हसलो. म्हणालो, 'केलडा आपल्याच ढुंगणाक मुराडता!' आणि पळत सुटलो.

उडाणटप्पू

Monday, July 13, 2020

सुक्यो गजाली . . .

        
                   


कुत्रं सुटलं . . . !

आबा बांबार्डेकराचा गणित उत्तम. सरकारी नोकरी लागाच्या आधी दोन तीन वर्षा आबान शाळेत मास्तरकीय केल्लयान. सातवी आठवीक गणित शिकय. नववीची गणितची बाई बाळंतपणाच्या रजेर गेली आणि नववीचाय गणित आबाच्या गळ्यात पडला. पोर्शन पुरो करुच्यासाठी आबा आयतवारचे ज्यादा तास घेय.

नववीच्या त्या वर्गासमोरच शिपाई रवा. तेचो एक कुत्रो होतो. तो खुळावललो. दोघा चौघांचो बरो रवको काढलल्यान. सगळे विद्यार्थी आणि मास्तरय तेका टरकान होते. तसो तो साखळेन बांधललो असा.

रविवारी नववीचो ज्यादा तास सुरू आसतांना, आबाचो दारातसून, तर विद्यार्थ्यांचो खिडकेतसून सतत त्या कुत्र्याकडेच लक्ष होतो. न जाणो साखळी तोडून कुत्रो येयत तर?

आबान बोर्डार, पोरग्यांका गणित घातल्यान, पोरग्यांचो लक्ष भायर, तेंका ता सोडवक येयना. शेवटी आबान स्वत:च  सोडवक घेतल्यान. म्हणाक लागलो, 'मला सांगा, आता इथे कुत्रं सुटलं वापरणार?' . . .  'कुत्रं सुटलं ' हे शब्द कानात पडतुकच सगळ्या पोरांनी भियान आपापल्या बाकड्यारनी उडी मारल्यानी. आबाय भांबावलो.  तोय खुर्चेर चढान थरथराक लागलो, ' सूत्रं कुठलं वापरणार असा विचारुचा, ता चुकान कुत्रं सुटलं वापरणार?' असा विचारलय, ह्याच तेच्या ध्यानात येवक नाय.

उडाणटप्पू

Sunday, July 12, 2020

सुक्यो गजाली . . .


           
   

मधु खीर-वडे आणि बोकड !

आबा बांबार्डेकर जितको  बुद्धिमान तितकोच विक्षिप्त! आबाचा वाचन प्रचंड. रोज तासनतास लायब्ररीत वाचीत बसा. वाचूक कायय चला तेका. शाळेत असतांना भूता बघूच्यासाठी माका एकदा स्मशानात घेवन गेलो, तीनसान जातूकच मी भियान थयसून पळालय. ह्यो रात्रभर थयच थांबलो.

त्याकाळी वाडीत, देवाक बकरो सोडूची प्रथा होती. ह्यो बकरो गावभर उंडगत असा, लोकांका ढुशी मारी, भाजी मार्किटात घुसान, भाजीवाल्यांची बिनधास्त भाजी खाय. देवाक सोडललो म्हणान कोण दगड, काठी मारी नाय. घाण कुबट वास येय तेका.

वाडीत तेव्हा मधु नावाचो इसम असोच गावभर फिरा. कोणाच्याय लग्नात हजर रवान जेवणार ताव मारी. खीर-वडे तेका खूप आवडत. लोक तर तेका 'मधू खीर-वडे' म्हणूनच ओळखत. ह्या मधूक त्या बोकडार बसवची आबाची खूप ईच्छा होती, पण मधू आणि तो बोकड कधीच एकावेळी दिसत नाय.

आबाची अकरावी एस एस सी ची परीक्षा होती. शेवटचो सिव्हिक्सचो पेपर होतो. आबाक वर्गातसून भायरचो रस्तो दिसा होतो. पेपर सुरु झालो. जेमतेम अर्धो तास झालो असात नसात, तितक्यात तो ओळखीचो, घाण कुबट वास येवक लागलो. आबाचो लक्ष भायर गेलो, रस्त्यार तो बोकड आणि मधू खीर-वडे एकाचवेळी आबाक दिसले. 

आबा सोमतो उठलो. पेपर सुपरवायझराच्या हातीत कोंबल्यान आणि गज नसलेल्या त्या खिडकेतसून उडी मारुन रस्त्यार धावलो, मधूक घापकन उचलल्यान आणि बोकडाच्या पाठीर बसयल्यान. आनंदान तेचे डोळे चमकाक लागले. 

म्हयनाभरान रिझल्ट लागलो. बाकी विषयांत अव्वल असणारो आबा सिव्हिक्सात उडावललो. अक्ख्या वर्ष वाया गेल्ला, बापाशिन थापट, थापट, थापटल्यान . . . !

उडाणटप्पू

Saturday, July 11, 2020

सुक्यो गजाली . . .


                 

चकणो आबा !

आबा बांबार्डेकार दिसाक वायट नसलो तरी ब-यापैकी चकणो. नेमको खय बघता ताच कळा नाय. परवा हॉटेलचो वेटर विचारी होतो,  'काय हो तुमचो तो दोस्तदार खय आज?'

'कोण? बांबार्डेकार, गोन्साल्विस काय इन्सुलकार?' . . . मी.

'तो जाडो, रेटलोबा; बघता भज्यार . . मागता वडो, तो!' . . वेटर.

एकदा गांधी चौकात तर मजाच झाली. आबा स्कूटरीन घाय घायत घराक जाय होतो, तितक्यात समोरसून अचानक चौकुळचो बाजी आडवो इलो, आबाच्या नजरेवरसून बाजीक आबा खय वळतलो तेचो अंदाज येयना, दोघय समोरासमोर येवक लागले.

आबा वैतागलो, 'काय बाजी! हुतूतू खेळतसय?'

बाजीय करवादलो, 'तू बघतय खय, वळतय खय ताच कळाना!'

'बरा, बरा' म्हतल्यान आणि आबान सायट मारल्यान.

उडाणटप्पू

Friday, July 10, 2020

सुक्यो गजाली . . .

            




ठिबक सिंचन !

बेकारीच्या काळात आबा बांबार्डेकार बापाशिवांगडा शेतात राबा. शेती बागायतीची आबाक आवड. खरा तर तेका कृषि पदवीधर होवचा होता, पण दापोलीक पाठवक आवस तयार नाय. आबा शेती-बागायती, ॲग्रोवन सारखी नियतकालिका वाची, कृषि प्रदर्शना, टिव्हीवयले शेतीविषयक कार्यक्रम न चुकता बघी. आबाक आपला कौलारु शेतघर खूप आवडा. पावसाळ्यात सगळीच थय रवत.

त्यादिवशी आबा दिवसभर कुडाळात रवान कृषिप्रदर्शन बघून इल्लो. शेतीचे नवे पद्धती, सिंचनाचे प्रकार, नवनवीन यंत्रा हेंची माहिती, भाषणा आयकान इल्लो. रात्री बापाशिक सगळा समजावन सांगी होतो.

दिवसभर स्कूटरचो प्रवास, प्रदर्शनात फिरान थकलल्या आबाचो पटकन डोळो लागलो. रात्रभर धो-धो पावस लागा होतो. 

 आबाच्या बडबडण्यान बाबा जागो झालो. उठान लायट लायल्यान. बघता तर काय! फुटक्या नळ्यातसून थेंब थेंब पाणी आबाच्या आंगार गळा होता. चादर, अंथरुण शाप भिजलला, तोंडार पडणा-या पाण्यानय तेका जाग नाय होती. तो झोपेतच बडबडा होतो, ' हेकाच म्हणतत ठिबक सिंचन!'

उडाणटप्पू


Thursday, July 9, 2020

सुक्यो गजाली . . .


GOT RUM ?

आबा बांबार्डेकाराचा कुलदैवत गोव्यात असल्याचा आबाक कोणीतरी सांगीतला. गोया लागी आसल्याकारणान हेरशी आबा काचसामायन आणूक स्कूटरीनच थय जाय. मध्यंतरी असोच तो गोयात फिरा होतो. थय याक जुना देऊळ दिसला. चौकशी केल्यार आपण शोधीत आसलला आपला कुलदैवत ह्याच आसाक होया, हेची तेका खात्री पटली.

आबा देवळात गेलो, थय म्हातारो गावकार देवकार्य करी होतो, देवाक प्रसाद लाय होतो, नवस फेडी होतो, गा-हाणी घाली होतो. तो मोकळो जातुकच आबा तेच्याजवळ गेलो. आपली शंका इचारल्यान. 

गावकार आबाच्या कानात पुटपुटलो, ' गॉट रम?'

आबाचे डोळे चमाकले, ' यस, यस! गॉट रम! स्कूटरीत आसा, आणतय!' म्हणीत आबा स्कूटरीकडे धावलो, डिकी उघडल्यान आणि भितरली नुकतीच खरेदी केल्ली, रम ची बाटली काढल्यान.

इकडे गावकार आबाची धावपळ बघतासा. आबान दाबात बाटली गावकाराच्या हातात दिल्यान. 

'सोरो दिता रे? पिसो काय किदे?' . . . गावकार करवादलो. 

'गॉट रम?, असा इचारल्यात मा तुम्ही?' . . . आबा.

'सामको पिसो मरे तू! मी गोत्रम इचारला रे तुझा!' . . गावकार.

उडाणटप्पू

Wednesday, July 8, 2020

सुक्यो गजाली . . .


बेबला काय बाबलो ?

आबा बांबार्डेकार सैरभर अवस्थेत, हॉस्पिटलाच्या वळयत येरझारे घाली होतो. आज तो चडवाचो बापूस होवचो होतो. रडण्याचो आवाज आयकासाठी तेचे कान आतुर झाल्ले. आतसून चडू केकाटला आणि आबाचो जीव भांड्यात पडलो.

अर्ध्या तासान वॉर्डबॉयन आबाक साद घातल्यान, 'बाबार्डेकरानू, या आता आत!'

आबा आत गेलो, बायल स्पेशल रुमात खाटीर लवांडलली.  तितक्यात नर्स बाळाक गुंडाळून घेवन इली, 'ह्यो घ्या तुमचो झिल, अभिनंदन!'

'झिssल? . . . अगो तू तर म्हणा होतय, चडू जातला असा डॉक्टरनीन सांगल्यान म्हणान!' . . . आबा चकीत.

'माका तसाच सांगी ती. प्रत्येक पावटिक तपासणिक येय तेव्हा!' . . . आबाची बायल करवादली.

' काय सांगीत मॅडम?' . . . नर्सय भिरभिरली.

'ह्याच! बेबी बरी आहे, बेबीचे हालचाली बरे आहेत, बेबी परातला, बेबी हेल्दी आसा . . . !' . . . आबाच्या बायलेचो खुलासो आयकान नर्शीन कपळार हात मारुन घेतल्यान, 'अगे वैनी, आता सोनोग्राफीक बंदी आसा. चडू काय झिल ता आदी समाजना नाय. आपण मुल म्हणतो, तसा डॉक्टरांच्या इंग्रजी भाषेत 'बेबी' म्हणतत.

'ताच म्हतला! बेबला सांगल्यान आणि बाबलो कसो झालो?' . . . आबाची बायल गालातल्या गालात लाजली!

उडाणटप्पू

Tuesday, July 7, 2020

सुक्यो गजाली . . .


'बायपास !'


आबा बांबार्डेकराची बायपास सर्जरी यशस्वी पार पडली. आबाक घराक आणलो. आबा थोडक्यात वाचलो. आबाचा ऑपरेशन व्यवस्थित पार पडाच्यासाठी आबाच्या बायलेन, वेतोबाक नवस केल्ल्यान. तो फेडूच्यासाठी दोघाय, पोरग्यांसकट वेतोबाच्या देवळात इली.

देवळात गुरव होतोच. आबाच्या बायलेन नवसाचा वांगडाच आणलला सामान, तांदूळ, केळीचो फणो, सव्वाशे रुपये पिशवेतसून काढून तामाणात ठेयल्यान.

'नवस केल्लो, फेडूचो आसा!' बायलेन गुरवाक सांगल्यान.

'काय सांगणा केल्ल्यात?' . . . गुरव.

'बायपास यवस्थित जावच्यासाठी!' . . आबा.

सगळ्यांनी हात जोडले. गुरवान गा-हाणा सुरु केल्यान, ' बाss देवा महाराजा! आज ह्या लेकरु तुझ्यासमोर सांगणा फेडूक इलासा, नवस केल्यापरमाणा हेचा बाय यवस्थित पास झालासा. असाच दरवर्षा हेचा बाय पास जावंदेत . . . '

'थांबा, थांबा गुरवानु! दरवर्षी बायपास करुन माका पोचयतास काय? अहो बायपास म्हणजे माझा हृदयाचा ऑपरेशन झाला, तेचो ह्यो नवस, चडू तिसरीत आसा माझा . . !' . . . बिचारो आबा आधीच एका ऑपरेशनाच्या खर्चान मेटाकुटिक इल्लो!

उडाणटप्पू

Monday, July 6, 2020

सुक्यो गजाली . . .

बायल आणि मो-बायल  !


गावंढळ आसली तरी आबाची बायल तशी हौशी. काय नाय समाजला तरी शिकाची आवड. आबाय बायलेची हौस मौज पुरय. बायलेक आबासारखो मोबाईल होयो होतो. दिवाळेकडे बोनस गावतुकच आबान बायलेक नवो कोरो मोबाईल घेवन दिल्यान. ती भुरकाटली. दिवसभर फोन कुरवाळीत बसली.

आबान कामार जाताना बायलेक मोबाईलार गाणी लावन दिल्यान आणि तो ऑफिसात जावक गेलो. ऑफिसात पोचता म्हणासर आबाचो फोन वाजलो, बायलेचोच होतो.

'काय गो, काय झाला?' . . .आबा.

'आयका तरी, ता मुजिक लावन दिल्यात ता थाबणासाच नाय महो! कसा बंद करु? माका न्हावक जावचा आसा!' . . . बायल करवादली.

' भिया नको, सोप्प्या आसा! मी सांगतय तसा करीत जा!' . . आबा.

'बरा, बोला! सांगा काय करु?' . . बायल.

' विंडो ओपन कर! '

' एक मिनिट हा, . . केलय!'

'आता गॅलरीत जा!'

'वायच रवा हा, जातय, हूंss गेलय!'

'म्युझिक दिसला?'

'हय कोण उघड्यार ठेयतलो तुमचा मुजिक? हॉलातच आसा महो ता!'

'तू खयच्या गॅलरीत गेलय?'

'बेडरुम शेजारच्या . . !'

'कर्म माझा!' . . आबान खाडकन फोन आपटल्यान.

उडाणटप्पू

Sunday, July 5, 2020

सुक्यो गजाली . . .



सोरो प्या, दारु प्या !

पेद्रु गोन्साल्विसाच्या आग्रहाक लागान, आम्हीं सगळे दोस्तदार नाताळच्या सुटयेत जीवाचो गोवा करुक गेलो. रात्री पार्टी आणि दिवसभर बीचार उंडागना, हिप्पींका बघणा, बाजारात फिरणा, खाणा, पिणा, मजा करणा, असाच सुरु होता.

त्यादिवशी आम्ही मडगावच्या मार्केटात फिरा होतो, हाफ पॅंटी, टी शर्टा असा कायमाय खरेदी करी होतो. फेरीवाले मोठमोठ्यान आरडान वस्तू, कपडे, भाजी, फळा, सरबता इकी होते.

तितक्यात दुस-या टोकासून आवाज ईलो, 'दारु प्या, दारु प्या, दारु प्या!sss'

आबाची नजर चाळावली, दारुवाल्याचो शोध घेवक लागली. तितक्यात जवळ दुसरो फेरीवालो आरडाक लागलो, ' सोssरो प्या, सोsssरो प्या, सोssssरो प्या!'

'पेद्रु! काय ह्यो प्रकार, राजरोस दिवसाढवळ्या . . ?' . . आबाची शंका.

पेद्रु हसान मेलो, आमका घेवन फेरीवाल्यांकडे गेलो. ते दोघय, केळी विकी होते, दरांची स्पर्धा करी होते. एकाचो दर दहा रुपये, तर दुस-याचो सहा रुपये डझन होतो. दहा रुपये वालो, 'धा रुपयान' तर सहा रुपये वालो, 'स रुपयान' असा आरडा होतो. गोयच्या कोकणीन घोळ केलो, आबाचो घसो कोरडो पडलो!

उडाणटप्पू


Saturday, July 4, 2020

सुक्यो गजाली . . .







 कॉट ॲंड 'बोल्ड' !


कॉलेजात असताना आबा बांबार्डेकार ब-यापैकी चावट होतो. मुलींचे कळी काढी पण लांबसून. आबा सेकंड ईयराक आसताना याक सुंदर, गोरागोमटा पोरग्या कॉलेजात इला. आबा पाघाळलो. ता एकटाच येय, एकटाच जाय. एकमार्गी. नाव, गाव कायच कळाना. आबा कासावीस.

'नंद्या! ओळख कशी काढू? कायतरी उपाय सांग ब्वॉ!' . . . आबा.

'डायरेक्ट इचार!' . . . नंद्याचो सल्लो.

'मा-याक घालतय काय? . . . शॅन्डल बघलय मा? . . . उंच टाचेचे आसत, कमीत कमी चार तरी टाके पडतले!' . . . आबा टराकलो.

'किती वाजले काय इचार!' . . . नंदू उवाच.

'ह्या ठिक आसा!' . . . आबाक नंदूचो सल्लो पटलो.

दुस-याच दिवशी आबा तेच्या येवच्या वाटेर थांबान रवलो. बरोब्बर मुन्शिपाल्टीसमोर दोघाय आमने सामने इली. आबा हसलो, ताय हसला. आबा खुश. आबाचो धीर बळावलो, 'वाजले किती?'

आबा थांबलो, ताय थांबला, ' ह्या बघ, ह्यो मवालीपणा जुनो झालो! ह्या माझा घड्याळ माका टायम बघुच्यासाठी, माझ्या बापाशिन दिलासा, टग्यांका टायम सांगूच्यासाठी न्हय. तुमच्यासाठी मुन्शिपाल्टिन येदोमोठो टॉवर बांधलोसा, तेतूर बघ! परत माज्या वार्तेक येव नको!'

बिचारो आबा त्वॉंड उघडा टाकून बघीतच रवलो.

उडाणटप्पू

Friday, July 3, 2020

सुक्यो गजाली . . .

 हम्मा, हम्मा sss 

नंदू इन्सुलकाराच्या आग्रहाखातर आम्ही सगळे दोस्तदार तेच्या आजोळाक मामाकडे जावचा ठरयला. पेद्रु गोन्साल्विसाच्या चुलत्याची जुनी मोटार तयार होतीच. आबा बांबार्डेकार तेवा सरकारी गुराच्या दवाखान्यात कंपावंडर म्हणान टेम्परवारी कामाक लागललो. कामावरसून तो डायरेक्ट नंद्याकडे इलो आणि आमचा लटांबर नंद्याच्या आजोळाक निघाला.

मामाचा ता गाव एकदम खेडा, तेतूर धो-धो पावस. सगळ्याभर चिखल. पेद्रुच्या खटा-याची गुळगुळीत चाका चिखलात जाग्यारच फिराक लागली. तिनसान झाल्ली. गाडी थयच सायटिक उभी करुन आम्ही लंबे लंबे मामाच्या घराक पोचलो. थोडे गजाली, चा-पाणी झाला.

'चांगल्या कामाक येळ खेका?' म्हणीत आबान काचसामान टेबलार मांडल्यान. गजाली ऐन रंगात इले, तितक्यात शेजारच्या घरात आरड आयकाक इली. शेजारणीचो नातू तापान फणफणललो. गावात डॉक्टर नाय, शहर लांब, गाडीय नाय कोणाची. तितक्यात नंदूच आराडलो, ' अरे, आबा आसा तो काय डॉक्टर!' 

शेजारीण आबाच्या हातापाया पडाक लागली. ' अगे, मी गुराचो डॉक्टर!' . .आबान सांगूचो प्रयत्न केल्यान, पण शेजारीण हट्टाक पेटली. आबाच्या बोचक्यात तापाचा औषध होता पण सिरिंज गुरांची होती. तरी आबान डेअरिंग केल्यान.

रात्री आबाक निज लागाना, घेतलला सगळा उतारला. आबा फाटेक लवकर उठलो. दार किलकिला करुन भायर डोकावलो. पावस थांबललो, शेजारची म्हातारी खळ्यात साचलला पाणी झाडून टाकी होती. आबाच्या जिवात जीव इलो, ' आजये! नातू?' . . . आबान धीर करुन इचारल्यान.

'आसा, आसा! बरो आसा आता! फक्त हम्माsss हम्माsss असो हंबारतासा सकाळधरना . . .! . . . म्हातारेन म्हायती दिल्यान.

 
उडाणटप्पू

Thursday, July 2, 2020

सुक्यो गजाली . . .


आबाचो बाबा !


 आबा बांबार्डेकाराक दशावतारी नाटका आवडत तर तेच्या बापाशिक सामाजिक. गावातल्या नाटकांत ते हिरोची भूमिका करीत. गोयातसून नटी आणित.

आबा ल्हान, शाळकरी पोर. आवस आबाक घेवन रात्री नाटक बघूक गेली. नाटक दशावतारी नसल्या कारणान आबा कंटाळलो. कीटकीट करुक लागलो, पण घोवाच्या कौतुकात रमलली आबाची आवस, तेका थारवन धरी होती, 'बाबा बघ मरे' म्हणी होती.

तसा नाटक संपत इल्ला पण आबा खूपच कळीक इलो. शेवटाक रवलला नाटक उभ्या उभ्याच बघीत ती घराक इली. अंथरुणा घालता म्हणासर दाराची कडी वाजली. आबाचो बाबा इल्लो, बायलेन दार उघडल्यान.  'कसा झाला नाटक, आबाक आवाडला  काय नाय?'. . .आबाच्या बाबान इचारल्यान.

तितक्यात रडतच आबा उठलो, दारापाठली कपडे सुकत घालूची काठी घेतल्यान आणि बापाशिक बडवक सुरवात केल्यान, चार सणसणीत गाळीय मारल्यान, ' माका दुसरी आई नको, ती बाई ईली तर पेटून काढतलय, दोघांकाय घरात घेवचय नाय!'

उडाणटप्पू

Wednesday, July 1, 2020

सुक्यो गजाली . . .


सुक्यो गजाली . . .


कौरवांची कॉलनी !


बालपणीचो गुटगुटीतपणा आबा बांबार्डेकरान तरुणपणातय राखल्यान. तशीच बालपणीची दशावतारी नाटकांची आवडय जपल्यान. पाटबंधारे खात्यात नोकरी करणा-या आबाचो मोठो ग्रुप होतो. दरवर्षी दिवाळेकडे हेंचो ग्रुप नाटक करी. गोव्यासून नटी आणत.



यंदा द्रौपदी वस्त्रहरण करुचा नक्की झाल्ला. पात्रा निवडूच्यासाठी रात्री 'बसाचा' ठरला. सगळे आलेमाव-कोलेमाव जमले. काचसामायन इला. आबाचो देह बघून आबाक भिम करुचो ठरलो, पण आबाक दु:शासन करुची हुक्की इली, आणखीय दोघतीघजाण आपणाकच दु:शासनाची भूमिका होई म्हणान हट्टाक पेटले. जोरदार वादावादी झाली.



'भिमाची, दुर्योधनाची, कृष्णाची महत्वाची भूमिका सोडून दु:शासनाची किरकोळ भूमिका करुचो हट्ट सो?' . . . . बाकीचे चक्रावले. तितक्यात हातात मोबायल नाचयत नंदू इन्सुलकार इलो.



'आबा, वगीचच लाळ टाकू नकात, ह्यो बघ मेसेज इलो, यंदा गोव्यातली नटी येणासा नाय, पेद्रु गोन्साल्विसाक लुगडा नेसवचा लागतला!  . . . नंदू इन्सुलकार केकाटलो.



उडाणटप्पू