Tuesday, November 17, 2020

;

          

      २८ जून २०२० ला ' ब्लॉगर ' सारख्या डिजिटल माध्यमावर सुरू झालेल्या या ' सुक्यो गजालींमधील ', ' १११ ' वी गजाल काल लिहिली. बाबांनी सुमारे ४००० ते ५००० सुक्यो गजाली आजपर्यंत लिहिल्या ! त्यासमोर ' १११ ' हा आकडा नगण्यच !

  ' सुक्यो गजालींची ' व्याख्या बाबांनी खालीलप्रमाणे केलेली,
       
  ' गजालीन खाल्लो घो, आणि वासग्यान पळयली बायल !'
      ही म्हण ठावक नाय, असो मालवणी माणूस शोधून सापडाचो नाय !
             "मालवणी बायल माणसा काय आणि पुरुष काय, अंगमेहनतीचा काम करुक नको; गजाली मारण्यात पटाईत. ह्या गजालींच्या नादात मालवणी माणसान आपला प्रचंड नुकसान करून घेतलासा. 
        मालवणी माणूस गजालींच्या नादात स्वताक इसरान जाता. म्हणून ही म्हण पडली आसाक होयी. गजाली सोडून दिवन प्रत्यक्ष कृती जोपर्यंत तो करना नाय, तवसर मालवणी मुलखाचा काय खरा नाय !
            पण मालवणी माणसांचे हे गजाली आयकन्यासारखे आसतत. तेच हे ' सुक्यो गजाली '!!"
         
        सुक्यो गजाली रोज संध्याकाळी सात ते साडे सात या वेळेत बाबा मोबाईलवर लिहायचे. आठ वाजल्यानंतर मी ती वाचायचो आणि त्यानुसार चित्र काढायला घ्यायचो. चित्र १० ते १५ मिनटांत काढून ह्वायलाच हवं, असा बाबांचा सततचा आग्रह असायचा. मला मात्र अर्धा ते पाऊण तास काही केल्या लागायचाच !
              
       नंतर दहा ते साडे दहाच्या दरम्यान, चित्र अपलोड केलेली गजाल ते ड्राफ्टस मध्ये सेव्ह करून, बरोब्बर अकरा वाजता पोस्ट करायचे ! एका मिनिटाचा पण विलंब त्यांना आवडत नसायचा. त्यानंतर दोन ते तीन मिनटं, त्या गजालीची लिंक स्टेटसला ठेवण्यात व ओळखीच्यांना पाठवण्यात जायची.

    २२ ऑगस्ट ला ' . . .मम देव देव ! ' ही त्यांनी शेवटची, ५६ वी गजाल लिहिली.

      नंतर जवळपास एका महिन्याने, म्हणजेच २० सप्टेंबरला मला २००९ च्या, गजाली लिहिलेल्या तीन डायऱ्या कपाटात खासगी कागदपत्र शोधताना सापडल्या. २३ सप्टेंबरला मी त्यांतील 
' निगेटिव्ह ' ही गजाल ब्लॉगवर अपलोड केली. ती होती ५७ वी गजाल ! नंतर - नंतर हा आकडा ' ७५ ' पर्यंत पोहोचला. त्यानंतर '१००'!! व कालच ' १११' वर ! गजालींना वाचकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला.
 
            गेल्या दोन - अडीच महिन्यांत या गजाली माझ्या जीवनाचा एक भागच बनलेल्या. पण सांगायला दुःख होतं, की आज या गजाली लिहिणं मला थांबवावं लागतंय. कारण, येत्या २३ नोव्हेंबरला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. माझी पण शाळा सुरू होईल. त्यामुळे गजालींना पुरेसा वेळ देता येईल का, याबद्दल मनात संभ्रम आहे.

 . . .पण, माझी SSC ची परीक्षा झाल्यावर लगेचच मी सुक्यो गजाली लिहिणं परत सुरू करेन. तोपर्यंत हा अर्धविराम ;
   . . . . . . . . . . .
- आर्य अरविंद शिरसाट
   (१७/११/२०२०)
    

Monday, November 16, 2020

सुक्यो गजाली . . .

अर्थ

     रविवारी जुने पेपर काढून लायत बसललंय. बायलय मदत करी होती. ' ह्यो तुमचो लेख गाजललो नाय हो ? . . . आणि ह्यो फोटो मस्तच !' . . . अशे तिचे कॉमेंट सुरू होते.

     पेपरातली लेखाची कात्रणा कापता, कापता तिची बडबड आयका होतय.

' ही कात्रणा कापून घेतल्यार, उरलेल्या कागदांचा काय करतल्यात हो ?' . . . बायल

' जाळतलय ! . . रद्दीचो हिशोब घालीत बसा नको वगीचच !' . . . मी 

 बायल बिचारी पचको झाल्यासारखी वगी रवली. थोड्या येळान इसारली.

' काय हो ! . . गजालींचा पुस्तक कधी काढतल्यास ?' . . . ती

' प्रकाशक गावलो काय ?' . . . मी

' तो कित्याक होयो ?' . . . ती

' छापूक खर्च नाय ?' . . . मी

' आणि काय हो ? . .ह्या गजालीचो अर्थच माका कळाक
 नाय ! . . सांगा तरी !' . . . ती

' अगो ! . . ती गजाल मी लिल्लय, त्येवा तिचो अर्थ माका आणि परमेश्वराक ठावक होतो . . आता फक्त त्येकाच ठावक आसा !'

 उडाणटप्पू



Sunday, November 15, 2020

सुक्यो गजाली . . .

मॅगी !

       नंद्यान आग्रह करून आबाक सपत्निक आपल्या घराकडे जेवक बलयल्यान. आबा आयतवारी स्कुटरीन बायलेक घेवन नंद्याकडे गेलो. थय कुत्रो भुकाक लागलो. त्येका हाड, हाड करीत आबान घरात प्रवेश केल्यान. तितक्यात याक काळा कुळकुळीत मांजार येवन मॅव, मॅव करीत पायात घुटमाळाक लागला. तवसर नंदू आणि नंदूची बायल भायर इली.

' स्वागतम् . . स्वागतम् . . !' . . . नंदू

' स्वागताक कुत्रो, मांजार बरा ठेयलसय !' . . . आबा

' अरे ह्या मांजार परवाच ह्येच्या म्हायेरसून भॅट म्हणून इलासा !'
. . . नंदू

' नाव काय ठेयलसय ?' . . . आबाची बायल

' आजून बारसो करुक नाय त्येचो. पण सध्या मॅगी म्हणतो आमी त्येका !' . . . नंद्याची बायल

' आसला गे कसला नाव ? . . शाळेत आसताना आमची, एक मैत्रण होती. मेघा त्येचा नाव. आमी मॅगी म्हणू त्येका !' . . आबाची
बायल

' वा ! . . शाब्बास , . . नंद्याच्या त्या कुत्र्याचा नाव पॅडी आसा. पंढरी, पद्माकर नावाचो कोण मित्र नाय मा होतो तुजो ?' . . आबान बायलेचा माप काढल्यान.

उडाणटप्पू


Saturday, November 14, 2020

सुक्यो गजाली . . .

चावदिसाचो फराळ !

    चावदिवसाच्या निमतान पेद्रु गोन्साल्विसाक आबा बांबार्डेकार आणि नंदू इन्सुलकाराचा खास आमंत्रण होता.

सकाळीच पेद्रु बायल पोरांसकट पयल्यांदा आबा बांबार्डेकाराकडे गेलो. थय नंदूय हजर होतो. चकली, चिवडो, लाडू, नेवरे असला काय-माय खाल्ल्यान.

' पेद्र्या ! खावन घे ! हे सगळे पदार्थ आमी घरात करतो. तुमच्यासारखे बाजारातले हाडनो नाय !' . . . आबान फुशारकी मारल्यान.

  नंतर आबासकट सगळा लटांबर नंद्याकडे गेला. थयसरय पेद्रु फॅमिलीन परत लाडू, नेवरे, चकली, चिवड्यार हात मारल्यान.

' कसो वाटलो फराळ ?'. . . नंद्याच्या बायलेन पेद्रुच्या बायलेक इचारल्यान.

' बेस्टच ! पण एकत्र बसान केल्यात काय ?' . . . पेद्रुची बायल

' छा ! नाय, कित्याक ? . . . नंद्याची बायल

' चव सारखीच वाटली !' . . . पेद्रुची बायल

' आनंद भुवनात काल खूपच गर्दी होती, पदार्थ खरेदीसाठी !' . . . पेद्रुन माप काढल्यान.

उडाणटप्पू

Friday, November 13, 2020

सुक्यो गजाली . . .

सहकार !

      आबा बांबार्डेकाराक फोन कर, कर करून नंदू इन्सुलकार दमलो. आबा कसोच फोन उचलीना होतो. शेवटाक नंद्यान सरळ आबाचा घर गाठल्यान.

' आबा, ए आबा ! काय करतसय काय ? सकाळधरना फोन लायतसय. रिंग होतासा, उचलनसय नाय सो ?' . . . नंदू

 नंदूचो आवाज आयकान आबा भायर इलो.

' काय रे ! मधीच सो ?' . . . आबा

' जरा एक माहिती होयी होती, त्यासाठी फोन करी होतय !' . .
. . नंदू

' अरे ! जरा चिवडो करुक बायलेक मदत करी होतय !' . .  आबा

' असली बायलमानशी कामा कसली करतय ?' . . नंदू

 '  असो काय नंद्या ! आमी एकमेकाक मदत करीतच असतो.    संध्याकाळी माका चकली करूच्यासाठी, ती पीठ मळून
 दितलीसा !' . . . आबा

उडाणटप्पू

Thursday, November 12, 2020

सुक्यो गजाली . . .

आबाचा प्लॅनिंग!

     सुरग्याच्या चडवाच्या प्रेमात आपलो बाळगो पडल्याचा जेवा आबा बांबार्डेकाराच्या कानार इला, तेवा आबा मनातसून खूपच खुश झालो. कॉलेजात आसतानाच्या, आपल्या सुरग्यावयल्या एकतर्फी प्रेमाची त्येका आठवण झाली. त्याच आठवणीत तो त्या रात्री निजलो.

  स्वप्नात सुरग्या इला. आणि आबा खडबडान जागो झालो. भायर नंदू इन्सुलकार इल्लो तो हाक मारी होतो. त्वांड धुवन आबा भायर इलो. खुशीत होतो. नंद्यान हळूच इचारल्यान,

' आबा ! सुरग्या स्वप्नात इला काय रे ?'

' ऑं ! तुका कसा कळला !' . . . आबा

' कॉलेजात आसताना खुशीत दिसयस तसो दिसलय !' . . . नंदू.
आबान गालातल्या गालात लाजत शीळ घातल्यान.

' आबा ! सुरग्याचा चडू डॉक्टर झाला, दवाखानो घातल्यान. खोऱ्यान पैसो ओढता म्हणता !' . . . नंदू

' ओढूंदेत, ओढूंदेत . . जरा रव ! माझोय बाळगो इंजिनियर झालोसा . .मी त्येका जेसीबी घेवन दितलय . . . जेसीबीन पैसो ओढतलो तो . . शेवटाक काय ? . . जेसीबीय माझो आणि खोराय माझाच !' . . . आबा

' म्हंजे ?' . . . नंदू

' तुका नाय कळाचा ता !'. . . आबा परत गालात लाजलो. शीळ घालीत न्हावक गेलो.

उडाणटप्पू

Wednesday, November 11, 2020

सुक्यो गजाली . . .

गणिताचे मास्तर !

   शाळेत आसताना गणित चुकला म्हणून मास्तरांनी नंद्याक थापट, थापट , थापटल्यानी. वैतागललो नंदो दुपारी घराक इलो. जेवन खावन वायच निजतलो होतो तर आवशिन त्येका मार्किटात आंबे इकुक धाडल्यान,

' बाबांका जेवक पाठय.ते निजान उठान परत येयसर तू आंबे इक! तीनशे रुपये डझनाखाली इकू नको !' . . . आवस

  बिचारे नंदू मार्किटात आंबे इकित बसलो. तितक्यात मास्तर येताना दिसले. बाबा दुकानात नाय, त्येचा समाधान वाटला !
मास्तर थेट, त्येच्याकडे इले.

' बाळ नंदकिशोर !' . . . मास्तर लाडात इल्ले. नंदू भिरभिरलो.

' काय दिव मास्तर ?' . . . नंदू

' आंबे कशे लावलस ?' . . . मास्तर

' तीनशे रुपये डझन !' . . . नंदू

' महाग वाटतसत !' . . . मास्तर

' तुमका म्हणून दोनशाक आठ दितय,' असा म्हणीत नंदून मास्तरांच्या पिशयेत आंबे भरल्यान सुद्धा ! मास्तर खुशीत घराक गेले.

उडाणटप्पू
 

Tuesday, November 10, 2020

सुक्यो गजाली . . .

पक्षीमित्र पेद्रु !

मध्यंतरी आबाक पेद्रुचो फोन इलो, ' आबा ! काय करतसय आज दुपारी ?'

' काय नाय, . .  आज माझो ऑफ . .साप्ताहिक सुट्टी !
 ख्येका रे ? '. . . आबा

' दुपारी जेवन खावन माझ्याकडे ये !' . . . पेद्रु

' ख्येका रे ?' . . . आबा

' पक्षांचे फोटो काढूक . . मी खळ्यात मातयेच्या भांड्यात पाणी ठेयतय रोज . . ता पिवक आणि भितुर न्हावक पक्षी येतत !' . . . पेद्रु

     आबा दुपारी कॅमेरो घेवन पेद्रुकडे हजर. पेद्रुच्या बेडरूमच्या खिडकेच्या एका कोपऱ्यात आबाचो कॅमेरो, तर दुसऱ्यात पेद्रुचो मोबाईल. दोघंय फिल्डिंग लावन बसले. बऱ्याच वेळान पेद्रु कुजबुजलो, ' इलो . . !'

   आबाक कायच दिसाक नाय. पेद्रुन क्लिक केल्याचो आवाज इलो. तितक्यात एक कुत्रो मात्र इलो. भांड्यातला पाणी लपाक, लपाक करीत दोन घोटात फस्त करून चलत रवलो !

' बघया फोटो !' . . . आबा
पेद्रून मोबाईल वरचो फोटो दाखयल्यान. एक कावळो पाण्यात चोच बुडय होतो !

उडाणटप्पू


Monday, November 9, 2020

सुक्यो गजाली . . .


नि: श्वास

खयचाय लग्नासून इली काय आबाची बायल खूपच अस्वस्थ आणि भावनिक होय. चडू लग्नाचा झाल्याचो तो परिणाम होतो.

' चडवाचा लगीन बरेपणान पडासर, आवाशीबापाशीच्या जीवाक घोर आसता ! एकदा काय लगीन झाला काय त्येंका मोकळो श्वास घेवक गावता !' . . . आबाची बायल

' हू !' . . . आबा

' माझा लगीन झाला, त्याय पावटेक आमच्या घरात अशीच परिस्थिती होती ' . . . बायल

' हू ! ' . . . आबा

' बाबांका थार नाय होतो. हय तर. एकीकडे लाडात वाढलेला चडू दुसऱ्या घराक जातला म्हणान त्येंका जड झाला आणि दुसरीकडे जबाबदारी मोकळी जातली, ह्येचा समाधान होता !' . . . ती

' हू !' . . . आबा

' लगीन लागला, त्येवा त्येंच्यानी नि:श्वास सोडल्यानी !' आबाची बायल

' पण त्येवापासून आमचो श्वास हयसर अडकान पडलो त्येचा काय?' . . . आबा

उडाणटप्पू

'

Sunday, November 8, 2020

सुक्यो गजाली . . .

चकणो

मध्यंतरी आबाच्या पोटात खूप दुखा. नुस्तो वळवळा. कोण म्हणा मुतखडो आसतलो, तर कोण म्हणा ॲपेंडिक्स.

सगळे गावठी उपाय करून आबा थकलो; पण वळवाटे येवचे काय थांबानत. शेवटी आबाच्या चुलत्यान आबाक मुंबैक न्हेल्यान आणि तपासून घेतल्यान. त्येवा त्येका ॲपेंडिक्सचो त्रास असल्याचा कन्फर्म झाला.

मुंबैक ऑपरेशनाक खूप खर्च येतलो, ह्या भितीन आबा गावाक परतलो. साहजिक आबाक भेटाक नंदू आणि पेद्रु इले.

' आबा, सरकारी हॉस्पिटलात तो नवीन डॉक्टर इलोसा, त्येच्या कडसून ऑपरेशन करून घेयनय !' . . . पेद्रु

' तो ? . . . आबा किंचाळलो, ' बघता भज्यार आणि मागता
वडो . . तो ? . . नको रे बाबा ! .   ॲपेंडिक्सचा ऑपरेशन करूचा सोडून माजी किडनी काढून दियत !'


उडाणटप्पू

Saturday, November 7, 2020

सुक्यो गजाली . . .

  
  मच्छी फ्राय !

            आबाची बायल खेडवळ आसली तरी नवनवीन खाद्यपदार्थ तयार करुची खूप हौस. लगीन झाल्यापासून आबा ' गिनिपिग '. सुरवाती, सुरवातीक बायलेक काय लागात ता आबा आणून दिय. बरेचदा पदार्थ बिघडा, पण बिचारो आबा, न कुरकुरता तो जळान कुरकुरीत झाल्लो पदार्थ चवीन खाय ! वर्षभरानंतर मात्र नव्याची नवलाई संपली आणि आबाचे कॉमेंट सुरू झाले.

        बायलेची आवड बघून, लगीन झाल्या, झाल्या म्हयन्याभरातच आबान बायलेक तिच्या वाढदिवसाची भेट म्हणान मायक्रोवेव्ह ओव्हन घेवन दिल्यान. सुरवाती, सुरवातीक बायल पदार्थ तयार करून दिय आणि आबा ओव्हनात भाजूचा काम करी.

     एकदा आबान बायलेक सकाळीच पापलेटा आणून दिल्यान आणि आपण आपल्या ऑफिसात गेलो. दुपारी जेवक इलो तर जेवणात पापलेट दिसाना.

' काय गो ! . . पापलेटा रातच्या जेवणाक ठेयलय ?' . . . आबा

' काय सांगू तुम्का ? . .ह्यो बघा कोळसो झालो त्येंचो ओवनात ! . . म्हतला ओवनात भाजूची ! . . भितर ठेयलय आणि सुरू केलय, तर नाचाकच लागली न्हय ओ ती !'' . . . बायल

उडाणटप्पू

Friday, November 6, 2020

सुक्यो गजाली . . .

भारनियमन !

        मध्यंतरी वाडीत भारनियमन सुरू होता, त्येवाची गजाल ! आयतवार आसल्याकारणान अख्ख्या कुटुंबाक सुटी होती. बायलपोरांसकट आबान पिकनिकीक जावचा ठरयल्यान. सकाळीच उठान आबान कपड्यांका इस्त्री करुक घेतल्यान. बायलेन कातु-चिरुक घेतल्यान. साडेसाताक लायट जातली ह्येची भिती दोघांकाय होती. बायलेचा वाटाप लावचा होता.

' गो, सव्वासात वाजले. पटापट कात !' . . . आबा

' तुमची इस्तरी आटपा लवकर !' . . . बायल

तितक्यात फाककन लायट गेली.  आबान गाळ मारून दिल्यान,
' फटकेचो वाको इलो तो !'

' पंद्रा मिन्टा आसत महो आजून . . येयत दिसता परत !' 
. . . आबाची बायल आशेर होती.

' डोंबाल तुजा !' म्हणीत आबान वीज विभागाक फोन लायल्यान.
' लायट बेगीना शी काढल्यात ?' . . . आबा

' भारनियमन ! . . आजपासून सव्वासात . . !' . . . वीज कर्मचारी

' आजचोच मुहूर्त बरो गावलो तुमका ? आमका आज पिकनिकीक
जावचा होता . . इस्त्री रवली . . बायलेचा वाटाप रवला !'
 . . . आबा करवादलो

' पिकनिकीक आजचोच बरो मुहूर्त शोधल्यास ?' . . . पलिकडसून खाडदिशी फोन बंद झालो. आबाची गाळ घशातच अडाकली.

उडाणटप्पू

Thursday, November 5, 2020

सुक्यो गजाली . . .

आबाची तक्रार

    सकाळी सकाळीच आबा बांबार्डेकार घराकडे इल्लो. माज्या समोर येवन बसलो. तो काय बोलुच्या आतच,

' आबा, बरा झाला इलय तो ! आज शंभरावी गजाल लिव्हची आसा. पण कोणती लिव काय कळणा नाय. बग, आठय हल्ली तुझ्यावांगडा काय मजेशीर घडलला काय.'

' उंडग्या ! असा काय आसला, तरी सांगुचय नाय !' . . . आबा तणतणा होतो.

' ह्या बग ! मी उंडगो न्हय. बरा उडाणटप्पू नाव आसा माजा. आवशिन ठेयलासा. ' . . . मी

' आसानेत ! पण फुकटची आमची बदनामी करतस गजालीत त्येचा काय !' . . . आब

' पण काय झाला, काय सांगशीत काय नाय नीट !' . . . मी

' काय  सांगतलय ! खासगी भानगडी लिहितय आणि भांडणा लावन दितय. एकतर सुरग्या बोलाचा बंद झाला आणि घराकडे रात्रभर बायल भांडतासा.' . . . आबा चिडान

उडाणटप्पू

Wednesday, November 4, 2020

सुक्यो गजाली . . .


चडवाची खरेदी

      शाळेचा गॅदरिंग आसला काय आबा बांबार्डेकार खूपच चिंतेत पडता. आता चडू कितक्याक खड्डयात घालीत ह्येचो नेम नसता. चडवाचो कसलो तरी नाच होतो. त्येच्यासाठी चडवाक घेवन आबाची खरेदी सुरू होती. कापड दुकानात चडवान मस्त ओढणी खरेदी केली. आबान दुकानदाराक इचारल्यान, ' कशी ?'

' मस्त दिसता. शोभली चडवाक !' . . . दुकानदार

' पैशे इचारतसय मी !'. . . आबा

' किती, काय इचारा महो ! सत्तर द्या !' . . . दुकानदार
  
       थयसून चपलाच्या दुकानात गेलो. चडवान सँडल घेतल्यान. आबान दुकानदाराक इचारल्यान, ' किती ?'

' सहा नंबर. परफेक्ट आसा !' . . . दुकानदार

' नंबर न्हय हो. पैशे ?'. . . आबा

' भाव इचारा . . ! अडिचशे द्या !' . . . दुकानदार

       थयसून दोघाय कानातली घेवक गेली. चडवान कानातली पसंत केल्यान. आबान दुकानदाराक इचारल्यान,
' भाव ?'

' आज येवक नाय तो. बरा नाय त्येका . . घरातच थांबलोसा !'
 . . . दुकानदार

' भाव म्हंजे, तुमचो भाव न्हय हो ! कानातल्याचो दर इचारतसय !' . . . आबा

उडाणटप्पू





Tuesday, November 3, 2020

सुक्यो गजाली . . .

कवी मनाचो डॉक्टर !

' नंद्या, चल येतय डॉक्टरकडे माझ्यावांगडा ?' . . . आबा

' खयच्या डॉक्टरांकडे ? . . काय झाला तुका ?' . . .नंदू

' दाताच्या रे ! . . दाढ काढूची आसा !' . . . आबा

' नको रे ब्वाॅ, . . कविता कोण आयकतलो त्येचे ?' . . . नंदू

' आपण नंबर लावया आणि फिरान येवया !' . . . आबा

   दोघय दवाखान्यात गेले. डॉक्टर एका पेशंटचे दात साफ करी होतो; ता तसाच ठेवन आबाक दात काढूच्या खुर्चेर बसयल्यान, त्वांड उघडूक लायल्यान आणि ' ऑं ' केल्यार भितुर चिमटो बसवन टाकल्यान. त्वांड उघड्या अवस्थेत आबा खुर्चेर बसलो. डॉक्टरान हय सावकाश पेशंटचे रवलले दात साफ केल्यान आणि आबाकडे वळलो.

' आबा ! . . तुमका माझी नवी कोरी, ताजी फडफडीत कविता आयकतय !' . . . डॉक्टर

हय नंद्याची चुळबुळ सुरु झाली. दोन कविता जातुकच,

' चल ! आबा मी येतय तासाभरात !' . . . आसा सांगून नंदू सटाकलो. आबा बिचारो तासाभराक लटाकलो.

उडाणटप्पू

Monday, November 2, 2020

सुक्यो गजाली . . .


शार्प

      आबा बांबार्डेकाराचो बाळगो ल्हानपणापासूनच इद्वाटो.
बापाशिसारखोच उर्मट.

    तो बालवाडीत आसताना एकदा कसल्यातरी जयंती साठी शाळेच्या हेड-मास्तरानी आबाक प्रमुख पाव्हणो म्हणून बलयलला.

     कार्यक्रम आटापलो. मुला ग्राऊंडार खेळाक गेली. थोडी मुला स्टॉलार पेपरमिटा,बिस्कीटा घेय होती.

      एक लहान पोरगो बाजुकच चहाच्या स्टॉलार उभो रवान, मस्तपैकी एक हात कमरेर ठेवन दुसऱ्या हातीतल्या ग्लासातल्या चहाचे भुरके मारी होतो.

हेड मास्तरांचो थय लक्ष गेलो. त्येंच्यानी शिपायाक हाक मारल्यानी,
' सखाराम ! कोणाचो रे पोर तो, कितवीत आसा ?'

' ह्येंचोच, बांबार्डेकारांचोच झिल तो, बालवाडीत शिकता !' . . . सखाराम

' आसांदेत, आसांदेत ! . . . शार्प दिसता !' . . . हेडमास्तर

उडाणटप्पू

Sunday, November 1, 2020

सुक्यो गजाली . . .

अल्बम 
  
   दिवाळीच्या निमतान घराची साफसफाई सुरू होती. वाडवण मारता-मारता लॉफ्ट्वयले दोन जुने अल्बम आबाकडसून खाली पडले. आबाच्या बेबल्यान सोमती त्येंच्यार डावली मारल्यान. भितुरलो एक आबाच्या लग्नातलो.

' काय गे आई ! . .तुज्या लग्नाचो दिसतासा अल्बम !' . . . बेबला

' होय मगो !' . . . आवस

' आयस्क्रीम खातसत लोका !' . . . बेबला

' होय, गर्दी बघलय मा कितकी ती ?' . . . आवस

' पण गर्दीत मी आणि बाळगो खय दिसनसो नाय ते ?'. . . बेबला

' अगो, कशी दिसतल्यास ?. .जल्म खय झाल्लो तुमचो ?'
. . . आवस

' आणि काय गे, हयतो काळो कोट वालो हिरो कोण उभो आसा तुज्या वांगडा ?' . . . बेबला

' तुझे बाबा मगो ते !'. . . आवस

' काय सांगतय ? . . मगे हयते केसाचा शारवाड झाल्ले, फाटको लेंगो, गंजिफ्रॉक घालून रिक्यामी फिरत आसतत 
 ते ?' . . .बेबला

बिचारो आबा ! शिडयेवरसून वाडवणीसकट खाली पडाचोच बाकी होतो.

उडाणटप्पू