Tuesday, July 14, 2020

सुक्यो गजाली . . .




                   


'केआढुंमु !'

नावाप्रमाणेच सुरग्या दिसाक सुरेख, नाकी-डोळी नीटस. तेतूर मुंबैसून इल्ला, अख्ख्या कॉलेज सुरग्याच्या प्रेमात. भितूरच आबा बांबार्डेकारय नंबराक! सुरग्याच्या नजरेत येवच्यासाठी आबाचे काय ना कायतरी माकडचेष्टा सुरुच होते. सुरग्या मात्र कोणाकच भिक घाली नाय! मॉड सुरग्याक सगळेच गाववाले बावळट वाटत!

मध्यंतरी आबान नवीकोरी गॅबर्डीनची बेलबॉटम पॅंट आणि बॉस्कीचो शर्ट शिवल्यान. बरो दिसा होतो. दिवसभर सुरग्याच्या पुढ्यात परत, परत येय होतो. सुरग्याचो लक्ष वेधून घेवचो, जीव जायसर प्रयत्न करी होतो.

सुरग्याचो लक्ष एकदाचो आबाकडे गेलो. सुरग्या फुतुक्कन हसला, आबा लाचार हसलो. सुरग्या हळूच पुटपुटला, 'केआढुंमु!' . . . आबा खूष, सुरग्या कायतरी बोलला, जमला! . . . पण काय बोलला? . . . 'सौदागरा'तल्या ईलू-ईलू सारख्या? . . . आबाक मनातल्या मनात गुदगुले होय होते. 

'ये ईलू-ईलू क्या है?' च्या चालीर आबा जेका तेका इचारीत सुटलो, 'ये केआढुंमु क्या है?' . . . कोणाकच सांगूक येयना, आबा टेन्शनात! दोन दिवस सुरग्याय गायब. शेवटाक धीर करुन एकटोच सुरग्याच्या घराकडे गेलो. तितक्यात समोरसून सुरग्याचो धाकटो भाव येताना दिसलो. आबान तेका हटकल्यान, ' केआढुंमु म्हणजे काय रे? '

तोय सुरग्यासारखोच फुतुक्कन हसलो. म्हणालो, 'केलडा आपल्याच ढुंगणाक मुराडता!' आणि पळत सुटलो.

उडाणटप्पू