Wednesday, September 30, 2020

सुक्यो गजाली . . .

डुप्लिकेट !
           आता जरी उतारत्या वयात आबा कसोय ओबडधोबड दिसत आसलो, तरी शाळेत आसताना गोंडस होतो. कधी-कधी
आबा आपले जुने अल्बम काढून त्याकाळचे आपले फोटो बघीत बसता.

परवाच आबान बाळग्याचे, स्टुडिओत आयडेंटिटी कार्ड साईज् फोटो काढून आणल्यान. परीक्षेचो फॉर्म भरताना पुढच्या ॲडमिशनाक लागतले म्हणान.

घराकडे इल्यार बायलेक दाखयल्यान, बायलेन झिलाचा खूप कौतुक केल्यान,' राजस पोरगो माझो!'

' माझ्यार गेलोसा !' . . .आसा म्हणीत आबान अल्बमातलो आपलो दहावीत असतानाचो फोटो दाखयल्यान !

' सेम टू सेम महो! डुप्लिकेट कॉपी !' . . . बायल

' बघया, बघया !' . . . करीत बाळग्यान अल्बम काढून घेतल्यान.

' काय रे, काय झाला ?' . . .आबा

' शिरा मार ! . . . म्हंजे मोठो झालय काय मी तुमच्यावरी दिसतलय ! ओबडधोबड ?' . . . बाळगो पिरपिरलो.

उडाणटप्पू

Tuesday, September 29, 2020

सुक्यो गजाली . . .

 महाभूकंप . . .

             वॉटसॅप वरती इल्लो मेसेज, आबा बायलेक वाचून दाखय होतो. 'धा दिवसात मोट्ठो भूकंप होतलो आणि सगळा जग नष्ट होतला !' बाजूकच बसलल्या सातवीतल्या बाळग्यान ता आयकल्यान. रडाक लागलो.

'बाबा ! माका भय दिसता, काय तरी करा महो !'. . . बाळगो

'ते काय करतले ? त्येंका हयली खाट थय सरकया म्हतला,तर जमना नाय '. . .आवस करवादली.

'तू वगी रव गो ! बाळग्या,अरे सगळेच जातलो ' . . .आबा

तितक्यात बारावीचे ऑनलाईन क्लास आटपून बेबला इला.
'बाळगो सो रडता ?'. . .बेबला

'भूकंपाक भियालो '. . .आवस

'कसलो भूकंप ? खय झालो ?. . . बेबला

'जावचो आसा ! धा दिवसात ! सगळा जग नष्ट होतला !
सगळे मरतले ! ' . . .बाळगो हुंदके दिवक लागलो.

'म्हणजे बारावीची परीक्षा दिवक नको !
क्लासाचीय कटकट नाय !'. . .बेबला नाचाक लागला.

उडाणटप्पू

Monday, September 28, 2020

सुक्यो गजाली . . .


हॉटेल

परवा आमी एका हॉटेलात जेवक गेल्लो. आबा बांबार्डेकाराक चिकन खावची हुक्की इल्ली. 'मरान जवंदत पत्थ्या !'. . . असा म्हणीत आबा हॉटेलात घुसलो.

पेद्रु गोन्साल्विसान ऑर्डर दिली. 'दोन चिकन चिली एक तंदूरी!'

' सायेब भट्टी बंद आसा ! बटर चिकन दिव ?' . . . वेटर

' दी !' . . . नंदू इन्सुलकार

' चपाते किती ?' . . . वेटर

' चपाती नको. आठ रोटी !' . . . पेद्रु

' रोटी नाय सायेब. भट्टी बंद आसा !' . . .  वेटर

' ठीक आसा आण चपाते, बारा !' . . . नंदू

' पाणी साधा काय बिस्लेरी ?' . . . वेटर

' पाणी नको ! कोक आण !' . . . पेद्रु

' कोक नाय, थम्सप आणू ?' . . . वेटर

' अरे मित्रा !आमका जा होया, ता तुज्याकडे नाय, तर काय उपयोग? मालकाक बलय !' . . . आबा चिडलो

' मालक नाय आसत ! मॅनेजराक बलव ?' . . . वेटर

' फटकी रे येव तुज्या !' . . . आमी उठलो, चलाक लागलो !

उडाणटप्पू



Sunday, September 27, 2020

सुक्यो गजाली . . .


  कायय आण !

        गणपतीच्या वेळची गजाल ! सीमा खुले केल्लले !आबा बांबार्डेकाराक मुंबैकर भावाचो फोन इलो, ' माटी बांधून ठे ! सजावटीचा सामान घेवन येतसय !'
  
   आबाचो भाव दरवर्षी न चुकता गणपतीक येता. येताना फुगोट्यो, केपी असला कायमाय पोराटोरांसाठी, आबा आणि आबाच्या बायलेक कपडे आणि गणपतीच्या सजावटीचा सामान घेवन येता.
     
 आबान भावाक, 'ठीक आसा.' असा सांगल्यान.

' नरम सो ? बरा नाय काय रे ? . . . भाव

' बरा आसा ! ये तू !' . . . आबा

' तरी पण ?' . . . भाव

' काय नाय रे !'. . . आबा 

' तुका आणखी काय आणूक होया,
लाजा नको ! सांग तू !' . . .भाव

' कोरोना सोडून कायय आण !' . . . आबा

उडाणटप्पू


Saturday, September 26, 2020

सुक्यो गजाली . . .



डावो-उजवो

    पेद्रु गोन्साल्विसाक ज्याम ताप येय होतो. सर्दी खोकल्यान हैराण झाल्लो! आबा बांबार्डेकार आणि नंद्या इन्सुलकारान त्येका रिक्षेत घालून थेट हॉस्पिटलात नेल्यान. वगीचच भानगड नको, कोरोना आसात तर? ह्येची त्येंका भीती! डॉक्टरान पेद्रुक तपासलो

' साधो फ्लू आसा, भियाक नको!' . . . डॉक्टर

' पण उपचार?' . . . आबा

' इंजेक्शन दितय!' . . . डॉक्टर

' खय दितल्यात ' . . . पेद्रु

 ' दंडाक! ' . . . डॉक्टर

' खयच्या ?' . . . पेद्रु

' उजव्या !' . . . डॉक्टर
         
         उजव्या आणि डाव्या म्हटला काय पेद्रुचो ज्याम गोंधळ उडता! पेद्रुन, घास घेवचो, हात तोंडाकडे नेवन उजवो हात कन्फर्म केल्यान! ता बघून डॉक्टर हसाक लागलो.

'अरे गोन्साल्विसा! मी डावो सांगललय तर तू काय वेगळी अँक्शन करून बगतलय आसतय काय रे?' . . . डॉक्टर

उडाणटप्पू

Friday, September 25, 2020

सुक्यो गजाली . . .



  गेट वे ऑफ गोवा


       पुतळ्याकडे उभे रवान आम्ही आबा येवची वाट बघी
होतो. मुंबई - गोवा रोड असल्याकारणान, बरेच मुंबैकर
गोव्याक जाय होते. 

        थय दिशादर्शक फलक नसल्याकारणान
जो येय तो आमच्या समोर गाडी थांबवन गोव्याचो
रस्तो इचारी. प्रत्येकाक रस्तो दाखवन दाखवन आम्हीय
वैतागललो. तितक्यात फॉरेनची एक उघडी जीप इली.
पाठोपाठ पाच-सहा मोटारसायकली! त्येंचोय ताफो
आमच्यासमोरच थांबलो.

'गोवा,...गोवा?' करूक लागले.

पेद्रुक काय सूचला कोणाक ठावक. त्येनी सरळ राजवाड्याच्या दरवाज्याकडे ब्वाॅट दाखयल्यान, 

'गोवा,...गोवा! गेट वे ऑफ गोवा!'

झाला! सगळे गाड्ये सूसाट राजवाड्यात घुसले.
आम्हीय आबाची वाट न बघता,थयसून सोमते गायब.

 उडाणटप्पू

Thursday, September 24, 2020

सुक्यो गजाली . . .

    

वाघाच्या पंजांचे ठसे . . .
    

    आबा बांबार्डेकाराक ट्रेकिंग ची भलतीच आवड! आबाचो चुलत भाव अण्णा फॉरेष्टात नोकरेक. हत्तीच्या पाठी फिरान, फिरान डांबरासरखो करापललो अण्णा मध्यंतरी आबाकडे इल्लो. त्येनी खूपच आग्रह केलो म्हणान आम्ही त्येच्या वांगडा जंगल फिराक गेल्लो.


वाटेत तो आमका काय, माय दाखय होतो.कधी वाघाची विष्टा, कधी हत्तीच्या पायांचे ठसे, कधी एखादी दुर्मिळ वनौषधी, तर कधी स्वर्गीय नर्तकासारख्या पक्षाचा पिस!


ह्या सगळा बघून आणि त्येचे गजाली आयकान पेद्रु गोन्साल्विस हळूच सगळ्यांच्या मधी इलो. तो ज्याम भियाल्ललो. खय खासखुस झाला, काय ह्यो कलकाल्लो!


' गोन्साल्विस ! भियातास काय हो?' . . . अण्णा


' म्हंजे काय? झाडीतसून एखादरो काळो वाघ येवन उडी घेयत तर झालाच आमचा ! उद्या तुमीच कोणाकतरी दाखायतल्यात, हे गोन्साल्विसाच्या पावलाचे ठसे, म्हणान!' . . . पेद्रु थरथारलो


उडाणटप्पू

Wednesday, September 23, 2020

सुक्यो गजाली . . .

   निगेटिव्ह

    आबा बांबर्डेकराच्या लग्नाचो पंचविसावो वाढदिवस परवा साजरो झालो.सगळी पाहुण्या-रवळ्या इल्लली.व्हिडिओ-फिल्म,फोटो घेना सुरू होता.
     

 आबाची बायल गोरीपान,आबा काळो ! बायलेचे केस काळे कुळकुळीत,आबाचा शॅरवाड ! आबा बायलेक शोभाच नाय होतो. फोटोग्राफर आबाचो दोस्तदार ! तो आबाक सांगी होतो, 
    
      
'आबानु हेरशी ठीक आसा, पण निदान आज कार्यक्रमाच्या निमित्तान तरी केसांका कलप नाय काय लावायचो ? 
 

'अरे आम्ही साधी माणसा ! ' . . .आबा


 'तसा न्हय हो, पण जोडा शोभाक नको ? फोटो बरोबर काढूक नाय म्हणान तुमी आमकाच गाळी मारतल्यात !'. . . फोटोग्राफर
 

तू असा कर  ह्येच्यात  निगेटिव्ह काढूची सोय आसामा ? तू आमचो निगेटिव्ह फोटो काढ ! . . .आबा
 

मगे काय जाताला ? . . .फोटोग्राफर
 

माझे केस काळे आणि बायलेचे पांढरे दिसतले. शिवाय मी युरोपियन आणि बायल निग्रो दिसतली ! . . .आबा


उडाणटप्पू