Tuesday, June 30, 2020

सुक्यो गजाली . . .

सुक्यो गजाली . . .

मारुतीची गदा !

आबा ल्हान आसतानाची गजाल. आजचो लोदी आबा त्यावेळीय सुदृढ बालक होतो. चिडलो काय दोघा चौघाक भारी पडा. रोज शाळेतसून कळी हाडी.

आबाक दशावतारी नाटका खूप आवडत. मारुती, भीम ही तेची आवडती पात्रा. तेंच्या त्या गदेर हेचो डोळो. गदेक हात लावक गावता म्हणान ह्यो विंगेत बसान नाटक बघी. भीमाकडे, मारुतीकडे
गदा मागी. एका दशावता-यान गदा दितय म्हणून सांगून आबाक टांग दिल्ल्यान.

एकदा म्हाप्रुसाकडे, 'सीताहरणा'चो प्रयोग होतो. आबा विंगेत मांडी घालून बसलो. आबाक फसयणारो तो कलाकार मारुती झाल्लो. आबाची नजर त्या गदेर होती. मारुती आपल्या एंट्रीची वाट बघी होतो, तर इकडे आबा गदेसाठी तेका सतय होतो. नाटक झाल्यार दितय म्हणून मारुती आबाची समजूत घाली होतो.

तिकडे सीता अशोकवृक्षाखाली बसान मारुतीच्या एंट्रीची वाट बघी होती. सूत्रधारान बाजापेटयेर म्युझिक बदलून मारुतीच्या एंट्रीचो इशारो दिल्यान. मारुतीन उडी मारुचो प्रयत्न केल्यान पण तेका हलाकच येयना, आबान तेची शेपटीच घट्ट पकडून ठेयल्यान.

'माका पयली गदा दी, नायतर शेपांडो सोडूचय नाय!' . . आबान दम दिल्यान, मारुती रडकुंडीक इलो. हय शेपटी तुटाची पाळी इली. शेवटाक मारुतीन एकदाची गदा आबाच्या स्वाधीन केल्यान आणि आपली सुटका करुन घेतल्यान. गदा हातीत गावतुकच आबान घराक धूम ठोकल्यान आणि बिचा-या मारुतीन गदेशिवाय वेळ मारुन नेल्यान!

उडाणटप्पू 

4 comments:

अरुण सौदागर said...

बिनशपडेपेक्षा बिनगदेचो मारुती परवाडलो.

Kamlesh Khanolkar said...

🤣🤣

प्रशांत मठकर said...

आबाची झाली आमटान ...प्रशांत..

Dattaprasad Gothoskar said...

कोणाचा काय तर कोणाचा काय