Saturday, October 31, 2020

सुक्यो गजाली . . .

अर्धमागधी

                
                  आम्ही शाळेत आसतानाची गजाल. संस्कृत कठीण वाटणाऱ्या विद्यार्थांसाठी तेव्हा अर्धमागधी नावाचो विषय होतो. आमी वीस-पंचवीस जाणांनी दहावी आणि अकरावीक तो विषय घेतललो. फक्त आमच्याच शाळेत तो शिकयत. पेद्रु गोन्साल्विस महाढोरगो ! त्येका, तोय विषय कधी समजाक नाय.

              
             एकदा त्या विषयाचो तास सुरू आसतानाच इन्स्पेक्टर तपासणीसाठी इले. आमच्या सरांका घाम फुटलो. इन्स्पेक्टरान नेमक्या पेद्रुकच उठयल्यानी. धडो वाचूक सांगल्यानी. ह्येच्याकडे पुस्तकय नाय होता. बाजूक आबा बांबार्डेकार बसललो. पेद्रुन त्येचा कसलातरी पुस्तक ओढल्यान आणि धडाधड कायमाय वेगळ्याच भाषेत बडबडाक सुरवात केल्यान.

      
   बिचारो इन्स्पेक्टर, त्येकाय अर्धमागधी ख्येच्यावांगडा खातत ता ठावक नाय होता.

   
' ठीक आसा ठीक आसा',म्हणीत तो वर्गातसून भायर पडलो!


उडाणटप्पू

No comments: