Tuesday, October 13, 2020

सुक्यो गजाली . . .

ऑर्डर

            आबाचा नुकताच लगीन झाल्ला. बायल खेड्यातली. कमी शिकलली. लग्नानंतर रोज, रोज दुशिकडल्या पावण्यांकडे वरणभात खावन कंटाळललो. आबा बायलेक घेवन थेट एका चायनीज रेस्टॉरंटात गेलो.

        आबान स्टायलित वेटराक बलयल्यान. वेटर इलो.पाणी ठेयल्यान आणि ऑर्डर घेवची चोपडी हातीत धरल्यान. आबान काय- काय आसा ता इचारतुकच, वेटरान चायनीज पदार्थांची यादी सुरू केल्यान, 
       ' चिकन चिली, चिकन मंचुरियन, चिकन च्याव- च्याव, चायनीज म्याव- म्याव . . .'

' पुरे, पुरे, पुरे ! . . . तुमच्याकडे माणसान खावचे पदार्थ कायच नाय ?' . . . आबाच्या बायलेन वेटराक थांबायल.

' म्हणजे ?' . . . वेटर चकीत

' म्हणजे . . . वरणभात, डाळीचा सांभारा , वालिची भाजी, वाटाण्याची उसळ,  रव , कुळथाची पिठी , पिठला, भाकरी ,
किमान पेज तरी . .?' . . .आबाची बायल

उडाणटप्पू

1 comment:

Unknown said...

सोलाची कडी?