Sunday, October 11, 2020

सुक्यो गजाली . . .




ऐका दाजीबा !

आबा नटा होतो, तितक्यात त्येच्याकडे एक इसम इलो. घाटावयलो. हयच स्थायिक झाल्याकारणान तोडक्या, मोडक्या
मालवणीत बोला.

' बांबार्डेकर, आज खय ?' . . . तो

' मालवणाक . . मालवणी सम्मेलनाक !' . . .आबा

' अहो, सगळा ग्लोबल होतासा, आणि तुम्ही हय आजून मालवणीचो जप करतासात !' . . .तो

' आमका मालवणी ग्लोबल करूची आसा !' . . .आबा

' करा बापडे ! . .असली संम्मेलना भरवन तुमची मालवणी ग्लोबल जातली ?' . . .तो

' दाजीबा, देवगडचो हापूस जगभर जाता ! . . जाता मा ?'
. . .आबा

' होय, जाता !' . . .तो

' वेंगुर्ल्योची सुंगटा, . .काजी खावक लोक जीव घालयतत ! .
. . घालयतत मा ?' . . .आबा

' होय घालयतत !' . . .तो

' बांगड्याचा तिखला . . . खातास मा ?' . . .आबा

' होय, खातो !' . . . तो

     ' पाणी सुटला जिभेक ? . . . ह्या सगळा मालवणी आसा.
तशीच आमची भाषा ! . . . तुमी बोलतासच मा ? . .पुढे जग बोलात ! . ‌. . ही सुरुवात आसा !!' . . . आबा

उडाणटप्पू

No comments: