हत्तीरोग
आबा आणि पेद्रु, आबाच्या घराकडे बसान गजाली मारी होते. आयतवार आसल्याकारणान आबाकय ऑफिस नाय होता. तितक्यात नंदू स्कूटरीन इलो. ज्याम घाबरो- घुबरो झाल्लो.
' आबा ! आमच्या पाटल्याराक याक केलडा मरान पडलासा'
' सोमता जाळून टाक, नायतर जमनीत गाडून टाक.'. . .आबा
' ती व्यवस्था करुनच इलय. पण माकडताप नाय मा होवचो?'
. . . नंदू
' नाय होवचो ! पण खबरदारीचो उपाय म्हणान डॉक्टरचो सल्लो घेतल्या बरो !' . . . आबा
' आबा, एक शंका म्हणान इचारतय !' . . . पेद्रु
' इचार !' . . . आबा
' माकडताप माकडांमुळे, लेप्टो, प्लेग उंदरांमुळे, स्वाईन फ्ल्यू डुकरांमुळे, बर्ड फ्ल्यू कोंबड्यांमुळे, मग हत्तीरोग हत्तींमुळे होता काय रे ?' . . . पेद्रु
उडाणटप्पू
1 comment:
हातीच्या.
Post a Comment