Thursday, August 6, 2020

सुक्यो गजाली . . .



     

बेरकी म्हातारो . . . !

आयतवार होतो. आबा बांबार्डेकर गोव्याक जावच्यासाठी वाडीक स्टॅंडार इलो. त्याकाळी फक्त दोडामार्ग मार्गेच एस. टी. जायत. स्टॅंडार खूप दिवसांनी 'बाई, पायजे का सोबत' फेम, म्हातारो हेरेकार दिसलो. हातात पेपर नाय होते. थकललो दिसा होतो. आबान हटकल्यान, 'आजोबा, पेपर विक्री बंद? सोबत बंद झालो?'

हेरेकार खजील हसलो, 'गेले ते दिन गेले!' . . . आबाकय वायट दिसला, 'आज खय दौरो? गोयाक?'

'होय! म्हापशाक पावण्यागेर जातय!' . . . हेरेकार. 

 तितक्यात बस लागली. गर्दीत घुसान आबान सीट अडयल्यान. आबाची नजर हेरेकाराक शोधूक लागली. बघता तर काय! हेरेकार आधीच घुसान डावीकडली विंडोसीट अडवन बसललो.

गाडी सुटली. वाटेत प्रत्येक स्टॉपार गाडी भरतच गेली. बांदा गेला, डेगव्या पास झाला. कळणा पाठी पडला. दोडामार्गात बरेच प्रवासी उतारले. मोकळा, मोकळा वाटला. म्हातारो हेरेकार गाढ झोपललो. कंडक्टराचो अचानक तेच्याकडे लक्ष गेलो. कंडक्टरान तेका हलयल्यान, 'आजोबा उठा! डेगव्याक उतराचा होता मा तुमका?'

बिचारो म्हातारो खडबडान जागो झालो, 'ऑं, खय इली गाडी? अरे बाप-रे! अस्नोडा इला? आता मी पाठी डेगव्याक परत जाव कसो?'

'हय उतरा अस्नोड्यात आणि परतीच्या बशीत बसा!' . . . कंडक्टराचो सल्लो.

'छा! असा कसा, माका डेगव्यात उठवक नाय कशाक? परतीच्या तिकटाक माझ्यार पैसे नाय, तूच माका आता परतीच्या तिकटाचे पैसे दी!' . . हेरेकरान कंडक्टरावांगडा हुज्जत घालूक सुरवात केल्यान.

'वा रे व्वा! मी खयसून दिव? तुमचो गोयात कोण पावणो आसलो तर तेच्याकडसून घेया पैसे!' . . . कंडक्टर.

'ठिक आसा, माका आता म्हापशात तरी उतर!' . . . हेरेकराच्या सूचनेनुसार कंडक्टरान ब्याद म्हापशाक उतरल्यान. कंडक्टराच्या नावान बडबडत उतारता, उतारता म्हाता-यान आबाकडे बघून हळूच डोळो मारल्यान . . . !

उडाणटप्पू

No comments: