Friday, August 21, 2020

सुक्यो गजाली . . .

 


  

 . . . मम देव देव !


आबा बांबार्डेकर, नंदू इन्सुलकार, पेद्रु गोन्साल्वीस आणि मी गणेश दर्शनासाठी बाजारातसून फिरा होतो, निवडणुको तोंडार इल्ले. गणपती येवन विराजमान झाल्लो. चाकरमान्यांचोय ओघ ब-यापैकी होतो. तेंच्या स्वागताचे फलक, फ्लेक्स राजकारण्यांनी जयथय आपल्या पक्षातर्फे लायलले. गणपती बघता, बघता हे फलकय आम्ही वाची होतो. अर्थ लाय होतो, समजत नाय तेंचे अर्थ काढी होतो.

विशिष्ट संस्कृत भाषेतलो एक फलक मात्र सगळ्यांचो लक्ष आकर्षित करी होतो. तेच्यार असा कायतरी छापलला, 

          त्वमेव माता, पिता त्वमेव।

          त्वमेव बंधु, सखा त्वमेव।

          त्वमेव सर्वम, मम देव देव।

   आम्ही सगळे तेचो अर्थ आपापल्या परीन लाय होतो. तितक्यात पेद्रु आराडलो, 'थांबा, थांबा! मी सांगतय.'

   'मेल्या, संस्कृत आसा ता! तू काय डोंबाल सांगतलय?'. . . आबान बरो झापल्यान.

   'मगे, तू सांग तर!' . . . पेद्रुन चॅलेंज दितुकच आबाचे आवाज बंद.

   'बरा, सांग तर!' . . . आबान नांगी टाकली.

   'ह्या, चाकरमानी मतदारांका उद्देशून आसा! तुम्हीच आमचे मायबाप, भावंडा-मित्र पण तुम्हीच!' . . . पेद्रुचा भाषांतर.

   'ता कोणय सांगीत! फुडच्या ओळीचो अर्थ सांग!' . . . नंदू.

   'सांगतय, वायंच धीर धर!' . . . पेद्रु.

   'फाटदिशी सांग!' . . . आबा.

   'त्वमेव सर्वम म्हणजे तुमचा सगळा,  सोना-नाणा, संपत्ती मम देव देव म्हणजे माका दिया!' . . . पेद्रु.

   'पण, देव देव असा दोनदा ख्येका?' . . . माझी शंका.

   'जोर येवच्यासाठी! म्हणजे दियाच!' . . . पेद्रुचा स्पष्टिकरण.


उडाणटप्पू

   

   

          


No comments: