Sunday, August 2, 2020

सुक्यो गजाली . . .


          

रक्षाबंधन . . . !


आबा बांबार्डेकार जितको फटकळ तितकोच नंदू इन्सुलकार मुखदुर्बल! आबासारख्या आपणय बिनधास्त रवाचा, मुलींवांगडा बोलायचा असा तेका वाटा, पण ऐनवेळी वाचा बसा. आबाच्या पाटसून, पाटसून फिरा पण आबाचो एकय दुर्गुण नंद्यात उतराना! नंदू गोरोगोमटो असलो तरी थोबडा निर्विकार! कायम कोरो करकरीत, इस्त्री केल्लो चेहरो. बघूनच पोरगी कंटाळत.

मुली राखी बांधतीत म्हणून तेंका टाळूच्यासाठी आबा दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी कॉलेजाक हमखास दांडी मारी, तर नंदू आवर्जुन हजर रवा, त्या निमतान तरी कोणय बोलात, पण हेका राखी बांधूची पण कोणाक इच्छा होय नाय.

आपली ही खंत नंदून आबाक सांगितली. आबान तेका एक आयडिया सांगल्यान, 'नंद्या! तू यंदा राखीचो स्टॉल घाल'. कॉलेजच्या गेटभायर आबानच नंदूक एका मित्राचो बंद गाळो मिळवन दिल्यान. मुंबैसून मागयलल्या  एकसो एक राखयेनी नंद्यान गाळो सजयल्यान. 

रक्षाबंधन चार दिवसार इला आणि मुलींची गर्दी वाढाक लागली. नंद्याचो धीर बळावलो, चेह-यार तेजी इली. नंदू बोलाक शिकलो. रक्षाबंधनाच्या आधल्या दिवशी तुफान गर्दी. नंदू गोकुळातल्या कृष्णासारखो मुलींच्या गर्दीत गडप झालो. दुपारी गर्दी ओसारली. नंदूक थोडी फुरसत गावली. तितक्यात कॉलेजच्या गेटातसून सुरग्या येताना दिसला. नंदू खुष झालो. सुरग्या अपेक्षेप्रमाणेच सामक्या दुकानात इला, 'ये सुरेखा! दुकान तुझाच आसा!' . . . नंदू चेकाळलो.

सुरग्यान सगळे राखये व्यवस्थित बघल्यान आणि चाराण्याची गोंड्याची राखी घेतल्यान, 'ही कोणाक, आबाक?', नंदू आपल्या विनोदार आपणच हॅss हॅsss करुन हसलो.

सुरग्याय हसला, 'नाय, . . . तुका!', असा म्हणीत नंद्याकडली राखी नंद्याकच बांधल्यान!

उडाणटप्पू

No comments: