Tuesday, August 11, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

अर्धो कप चाय . . . !


मध्यंतरी आबा बांबार्डेकारान, आपली शाळा सुधारुची जबाबदारी खांद्यार घेतल्यान. जुने मित्र शोधून तेंच्याकडसून शाळेसाठी पैसे गोळा करण्याची मोहीमच उघडल्यान. जेका तेका आबा भेटा, मगे शाळेशी तेचो संबंध असो नायतर नसो. 

ऑफिसच्या कामासाठी मुंबैक गेलो तरी टकलेत कायम शाळेचो विषय. मुंबैतल्या अनेकांचे पत्ते आबाच्या मोबाईलात फीड केल्लेच होते. बहुतेकांनी चांगलो रिस्पॉन्सय दिलो. आबाचो एक जुनो शेजारी राजा सोन्सुरकार जवळच रवत असल्याचा आबाक कळला. राजा खरा तर नावाचोच राजा, बाकी स्वभावान कद्रुच ह्या आबाक ठावक होता, शिवाय तो शाळेचो कधी विद्यार्थीय नाय होतो. तरी आबा तेच्या घराक पोचलो.

आबाचा स्वागत राजान वरकरणी हसत केल्यान, बाकी नंतर फक्त आबाच एकटो बडबडा होतो, राजा नुसतो आयका होतो. आबाचा कीर्तन संपला. 'बाकी तू काय म्हणतय, तुझा कसा चल्लासा?' आबान इचारल्यान.

'चल्लासा ता बरा म्हणायचा! . . . बाकी तुका जेवक थांबाक सांगून तू थांबतलय थोडोच! चहाक विचारुचा तरी तू आयकाचय नाय . . .' अशा भाषेत राजा आपले प्रश्न आणि आबाची उत्तराय आपणच दिय होतो, तितक्यात आतसून चहाचो कप घेवन बायल इली, 'अगो, माका नाय आणूक चहा?' . . . राजा.

'तुमका होयो होतो? माका वाटला तुमका नको आसतलो!' . . . बायल.

'थांबा, थांबा वैनी! परत मुद्दाम करु नकात. ह्योच घेतो आम्ही अर्धो अर्धो!' असा म्हणीत आबान बशयेत ओतून दिल्ललो चहा, राजान फुर्र आवाज करीत पिल्यान. 

नंतर कोणीतरी आबाक सांगीतला, 'राजा-राणीचो ह्यो संवाद रोजचोच!'


उडाणटप्पू

No comments: