Friday, August 14, 2020

सुक्यो गजाली . . .



     

आबाचो श्रीगणेशा . . . !

आबा बांबार्डेकार अगदी बालपणापासूनच हूड! सबंध आवाठभर उंडगत रवा. पयलीत गेल्यार शाळेत तरी यवस्थित जायत मा, हेची आवशिक चिंता होती. सुदृढ बालक स्पर्धेत हमखास बक्षीस मिळयणारो आबा, आपल्या  देहयष्टिचो पुरेपुर वापर करी. रोज शेजा-या-पाजा-यांचे कळी हाडी. आज अमक्याक बडयल्यान, उद्या तमक्याक कोचल्यान. आवस लोकांची समजुत काढीसर हैराण जाय.

शेजारच्या पोरग्यांका गोळा करुन एकदा आबा व्हाळातल्या कोंडीत खेळत बसलो. कोणय पाण्यात बुडलो आसतो तर फुकटचा अपशराण ! . . आवस ज्याम भियाली. थापट, थापट थापटल्यान. बरो न्हावक घातल्यान आणि उपाशी बसवन ठेयल्यान. गब्दुल आबाक भूक सहन जाय नाय. रडकुंडीक परातलो. नाना घराक येवची वाट बघीत रवलो. कधी नाय ते नाना त्यादिवशी उशिरा इले. 

येतुकच आवशीन झिलाचे कागाळी बापाशिच्या कानार घातल्यान. नाना आधीच वैतागान इल्ले, तेनीय दोन फटके दिल्यानी, 'चल पाटी पेन्शिल घे! '

आबा पाटी पेन्सिल घेवन बसलो खरो, पण पाटयेर कायच गिरयना. नाना चिडले, ' श्री काढूक शिकयलसय मा मी तुका, मगे वगी कित्याक?' आबा गप. तितक्यात आवस रांधपातसून भायर इली, 'हाल्ली, पाटीच हातीत घेवक बघनासा नाय!'

'काय रे, श्री कित्याक काढूक बघनसय नाय? येतासा मा तुका . . ?' नाना करवादले.

'शिरी काढलय काय माका पुढे ग काढूक सांगतल्यात! . . मी नाय काढूचय!' . . . आळशी आबाचा लॉजिक.

उडाणटप्पू

No comments: