Wednesday, August 12, 2020

सुक्यो गजाली . . .

 

     

    

 बाजीक कळला, पण . . . ?


रिटायर झाल्यार पयलो म्हयनोभर भटाकण्यात आणि पेन्शनची कामा करण्यात गेलो. नंतर येळ जायना. असोच संध्याकाळी रोजच्यासारखो आंबा बांबार्डेकरावांगडा तळ्याच्या काठार बसलय आसतांना, आबाक इचारलय, 'आबा, कंटाळो इलो रिकामपणाचो! कायतरी कामधंदो सूचय!'


विचार करता, करता आबाचे डोळे चमाकले, 'बायलेच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणान काम कर! बायलेचो त्रास तरी कमी जायत!'


'आयडिया अगदीच काय वायट नाय, बघतय बायलेवांगडा बोलान!' . . .  असा सांगून घराक इलय. बायलेक सांगलय. बायल खूश.  म्हणाक लागली, 'मीय ह्याच सूचयतलय होतय.'


दुस-याच दिवशी अंदाज घेवच्यासाठी बायलेवांगडा गेलय. सगळे खेड्यातले पेशंट, आपणाक काय जाता ह्याय सांगूक न येणारे. औषध, गोळये दिल्यार खयची जेवच्या आधी, खयची नंतर, खयची पाण्यावांगडा, खयची मधावांगडा ता परत परत विचारणारे.  माझी करमणूक जाय होती. तितक्यात एका म्हाता-या बाजीचो नंबर इलो. 


तेका खूप काय माय जाय होता, पाय फोडा होते, पोटात चावरी होती, आंगात ताप होतो, नाक गळा होता. तेका चार पाच रंगीत गोळये दिवन, खयची गोळी खेच्यार ता बायलेन समजावन सांगल्यान, सगळा गुटाळून दरवाजापर्यंत गेल्लो बाजी परत इलो, 'खेच्यार काय ता माका समाजला, पण त्या गोळयेंका कोणी खय जावचा ता कसा कळताला?'


उडाणटप्पू

No comments: