Saturday, August 15, 2020

सुक्यो गजाली . . .

 


     

इद्वाटो आबा आणि तेची वानरसेना . . . !


शाळेत गेल्यार आबा बांबार्डेकाराचो हूडपणा वाढतच गेलो. इलगो, पको, पसो, राणो, पबी, किशा असे आवाठान ओवाळून टाकलेले गण तेचे दोसदार! विटी- दांडू, लगोरी, गुट्टे, चोर- शिपाई हे तेंचे रोजचे मैदानी खेळ. उन्हाळ्याच्या सुटयेत पाकीटा आणि काजींनी खेळत. सक्का आणि मुक्काशिवाय गजाली नाय. नरेंद्र डोंगरार भर दुपारी जावन दगड मारुन आंबे पाडणा ह्यो आणखी एक उपदव्याप.


जरा मोठे झाल्यार क्रिकेट खेळाची हेंका हुक्की इली. कुल्यार फाटके पॅन्टी घालून शाळेत जाणा-या ह्या उंडग्यांका बॅटी आणि बॉलाक पैशे कोणाचो आवस-बापूस दितलो? 


आबाच्या टकलेत एक आयडीया इली. आवाठात एक लाकडाची गिरण होती. आबा आपली वानरसेना घेवन गिरणीर पोचलो. थेट मालकाक जावन भेटलो, 'आमका बॅट करुक एक फळी होयी!'


'फुकट? . . . बापाशिची पेंड आसा?' . . . मालकान हांबुडल्यान. आबाचो पचको झालो. गिरणीतसून भायर पडताना आबाक, वाटेत पडलोलो एक खिळो गावलो. तो हातात खेळयत आबा कंपाऊंडाकडे इलो. थय  याक फणसाचा ल्हान झाड होता. झाडाबुडचो धोंडो उचलून, आबान तो खिळो त्या झाडात ठोकून टाकल्यान.


'आबा, झाडार राग काढून काय फायदो?' . . . इलगो पिरांगलो. 


'अरे, मजा बघ! ह्या झाड मोठा झाला, सुकला काय तोडतले, ह्याच गिरणेर फळये पाडतले, तेवा ह्यो खिळो गिरणीच्या पात्याक अडाकतलो. पाता तुटताला. गिरणी मालकाचा लुकसान!' . . आबासकट आमचेय डोळे चमाकले.


उडाणटप्पू

No comments: