Tuesday, August 4, 2020

सुक्यो गजाली . . .


          

चपलांचो ढीग . . . !

टीसी च्या तावडीतसून आबा सही सलामत सुटलो तरी बाबीकाकाच्या तावडीतसून आबाची सुटका नाय होती. बाबीकाकान आबाक दम दिल्यान, 'आता माका घरापर्यंतचो रस्तो तू दाखवायचो, मी तुझ्या पाठसून चलतलय!'

बिचारो आबा! पण आबाचा नशिब जोरार होता. समोर बाबीकाकाच्या शेजारणीचा चडू चला होता. तेच्या पाठसून आबा चलत रवलो. आबान न चुकता घर बरोबर कसा गाठल्यान, हेचा कोडा शेवटपर्यंत बाबीकाकाक सुटाक नाय. 

घराकडे आते पोरग्यांका घेवन इल्ली. आबाचीच वाट बघी होती. बाबीकाकाच्या जाचातसून सुटल्या कारणान आबा खुश होतो. आतेन बराच कायमाय खावक आणलल्यान. चलान दमललो आबा रात्री लवकर निजलो. आतेन पायाच्या जखमांका मलम लायल्यान.

सकाळीच आते आबाक आपल्या घराक घेवन गेली. संध्याकाळी आतेच्या घोवान आबाक चुलत चुलत्याकडे नेल्यान. तोय बाबी काकाक गाळी मारी होतो. आबाच्या चपलांची गजाल आयकान तो हसतच सुटलो. तेचाय बाबी काकावांगडा पटा नाय.

थयसून भायर पडतांना आबाची नजर जीन्याखाली साठवन ठेयलल्या जुन्या, फाटक्या चपलारनी गेली. 'काय हो काका, इतकी जुती साठवन शी ठेयल्यासात, आरलेच्या वेतोबाच्या देवळावरी?'

'तुझ्या बाबीकाकासाठीच ती, गेली धा वर्षा साठयलसय. हाताक गावलो काय प्रत्येक जुता काढून मारतलय! माका शेंडी लायता काय?' . . . चुलतो करवादलो.

उडाणटप्पू

No comments: