Thursday, August 20, 2020

सुक्यो गजाली . . .

 


  

आम्का पचास, लिम्का पचास . . . !


अण्णांच्या भुसारी दुकानात, आबा वाणसामान आणूक गेल्लो. मापारी पुडये बांधी होतो आणि अण्णा चोपडेर हिशोब करी होते. तितक्यात पाच सहा वर्षाचा याक ल्हान पोरग्या, आबाच्या शेजाराक येवन उभ्या रवला. 


अण्णांचो तेच्याकडे लक्ष गेलो. आवाठातल्या गफाराचा चडू फातिमा, कायम येणारा. 'क्या गे फातू, क्या हूना तेरेकू?' अण्णा मुसलमानी भाषेत बोलाक लागले.


'आम्का पचास, लिम्का पचास!' . . . फातिमाची ऑर्डर.


'क्याsss?' . . . अण्णा किंचाळले. फातिमा भियाला.


'आमका पचास, लिमका पचास!' . . .  शांतपणे फातिमान परत सांगल्यान, तरी कोडा सुटाना! आबाय विचार करुक लागलो, पण तेचाय टकला चलाना. 


'अण्णा, तेका लिम्का म्हणजे कोल्ड्रिंक होया असतला!' . . . आबान अक्कल पाजळल्यान.


अण्णा गल्ल्यावरसून भायर इले, त्या पोरग्याच्या बखोटेक धरुन रस्त्याच्या मधी इले, 'वो देख नेवगीका कोल्ड्रिंक हाऊस, उधर लिम्का मिळेगा तेरेकू!'


'वो नय, तुम्हारे दुकानका हुना!' . . . फातिमाचो हट्ट कायम. तितक्यात चडवाक शोधीत, आवस इली. 


'काय मागतासा ह्या? आम्का, तुम्का, लिम्का करतासा!' . . . अण्णा.


'अचार, लोणचा हो! . . . आंब्याचा पन्नास ग्रॅम, लिंबाचा पन्नास ग्रॅम!' . . . फातिमाच्या आवशिचो खुलासो आयकान अण्णानी कपाळार हात मारुन घेतलो.


उडाणटप्पू 

No comments: