Tuesday, November 10, 2020

सुक्यो गजाली . . .

पक्षीमित्र पेद्रु !

मध्यंतरी आबाक पेद्रुचो फोन इलो, ' आबा ! काय करतसय आज दुपारी ?'

' काय नाय, . .  आज माझो ऑफ . .साप्ताहिक सुट्टी !
 ख्येका रे ? '. . . आबा

' दुपारी जेवन खावन माझ्याकडे ये !' . . . पेद्रु

' ख्येका रे ?' . . . आबा

' पक्षांचे फोटो काढूक . . मी खळ्यात मातयेच्या भांड्यात पाणी ठेयतय रोज . . ता पिवक आणि भितुर न्हावक पक्षी येतत !' . . . पेद्रु

     आबा दुपारी कॅमेरो घेवन पेद्रुकडे हजर. पेद्रुच्या बेडरूमच्या खिडकेच्या एका कोपऱ्यात आबाचो कॅमेरो, तर दुसऱ्यात पेद्रुचो मोबाईल. दोघंय फिल्डिंग लावन बसले. बऱ्याच वेळान पेद्रु कुजबुजलो, ' इलो . . !'

   आबाक कायच दिसाक नाय. पेद्रुन क्लिक केल्याचो आवाज इलो. तितक्यात एक कुत्रो मात्र इलो. भांड्यातला पाणी लपाक, लपाक करीत दोन घोटात फस्त करून चलत रवलो !

' बघया फोटो !' . . . आबा
पेद्रून मोबाईल वरचो फोटो दाखयल्यान. एक कावळो पाण्यात चोच बुडय होतो !

उडाणटप्पू


No comments: