Wednesday, September 30, 2020

सुक्यो गजाली . . .

डुप्लिकेट !
           आता जरी उतारत्या वयात आबा कसोय ओबडधोबड दिसत आसलो, तरी शाळेत आसताना गोंडस होतो. कधी-कधी
आबा आपले जुने अल्बम काढून त्याकाळचे आपले फोटो बघीत बसता.

परवाच आबान बाळग्याचे, स्टुडिओत आयडेंटिटी कार्ड साईज् फोटो काढून आणल्यान. परीक्षेचो फॉर्म भरताना पुढच्या ॲडमिशनाक लागतले म्हणान.

घराकडे इल्यार बायलेक दाखयल्यान, बायलेन झिलाचा खूप कौतुक केल्यान,' राजस पोरगो माझो!'

' माझ्यार गेलोसा !' . . .आसा म्हणीत आबान अल्बमातलो आपलो दहावीत असतानाचो फोटो दाखयल्यान !

' सेम टू सेम महो! डुप्लिकेट कॉपी !' . . . बायल

' बघया, बघया !' . . . करीत बाळग्यान अल्बम काढून घेतल्यान.

' काय रे, काय झाला ?' . . .आबा

' शिरा मार ! . . . म्हंजे मोठो झालय काय मी तुमच्यावरी दिसतलय ! ओबडधोबड ?' . . . बाळगो पिरपिरलो.

उडाणटप्पू

No comments: