Saturday, September 26, 2020

सुक्यो गजाली . . .



डावो-उजवो

    पेद्रु गोन्साल्विसाक ज्याम ताप येय होतो. सर्दी खोकल्यान हैराण झाल्लो! आबा बांबार्डेकार आणि नंद्या इन्सुलकारान त्येका रिक्षेत घालून थेट हॉस्पिटलात नेल्यान. वगीचच भानगड नको, कोरोना आसात तर? ह्येची त्येंका भीती! डॉक्टरान पेद्रुक तपासलो

' साधो फ्लू आसा, भियाक नको!' . . . डॉक्टर

' पण उपचार?' . . . आबा

' इंजेक्शन दितय!' . . . डॉक्टर

' खय दितल्यात ' . . . पेद्रु

 ' दंडाक! ' . . . डॉक्टर

' खयच्या ?' . . . पेद्रु

' उजव्या !' . . . डॉक्टर
         
         उजव्या आणि डाव्या म्हटला काय पेद्रुचो ज्याम गोंधळ उडता! पेद्रुन, घास घेवचो, हात तोंडाकडे नेवन उजवो हात कन्फर्म केल्यान! ता बघून डॉक्टर हसाक लागलो.

'अरे गोन्साल्विसा! मी डावो सांगललय तर तू काय वेगळी अँक्शन करून बगतलय आसतय काय रे?' . . . डॉक्टर

उडाणटप्पू

No comments: