Monday, September 28, 2020

सुक्यो गजाली . . .


हॉटेल

परवा आमी एका हॉटेलात जेवक गेल्लो. आबा बांबार्डेकाराक चिकन खावची हुक्की इल्ली. 'मरान जवंदत पत्थ्या !'. . . असा म्हणीत आबा हॉटेलात घुसलो.

पेद्रु गोन्साल्विसान ऑर्डर दिली. 'दोन चिकन चिली एक तंदूरी!'

' सायेब भट्टी बंद आसा ! बटर चिकन दिव ?' . . . वेटर

' दी !' . . . नंदू इन्सुलकार

' चपाते किती ?' . . . वेटर

' चपाती नको. आठ रोटी !' . . . पेद्रु

' रोटी नाय सायेब. भट्टी बंद आसा !' . . .  वेटर

' ठीक आसा आण चपाते, बारा !' . . . नंदू

' पाणी साधा काय बिस्लेरी ?' . . . वेटर

' पाणी नको ! कोक आण !' . . . पेद्रु

' कोक नाय, थम्सप आणू ?' . . . वेटर

' अरे मित्रा !आमका जा होया, ता तुज्याकडे नाय, तर काय उपयोग? मालकाक बलय !' . . . आबा चिडलो

' मालक नाय आसत ! मॅनेजराक बलव ?' . . . वेटर

' फटकी रे येव तुज्या !' . . . आमी उठलो, चलाक लागलो !

उडाणटप्पू



No comments: