Thursday, September 24, 2020

सुक्यो गजाली . . .

    

वाघाच्या पंजांचे ठसे . . .
    

    आबा बांबार्डेकाराक ट्रेकिंग ची भलतीच आवड! आबाचो चुलत भाव अण्णा फॉरेष्टात नोकरेक. हत्तीच्या पाठी फिरान, फिरान डांबरासरखो करापललो अण्णा मध्यंतरी आबाकडे इल्लो. त्येनी खूपच आग्रह केलो म्हणान आम्ही त्येच्या वांगडा जंगल फिराक गेल्लो.


वाटेत तो आमका काय, माय दाखय होतो.कधी वाघाची विष्टा, कधी हत्तीच्या पायांचे ठसे, कधी एखादी दुर्मिळ वनौषधी, तर कधी स्वर्गीय नर्तकासारख्या पक्षाचा पिस!


ह्या सगळा बघून आणि त्येचे गजाली आयकान पेद्रु गोन्साल्विस हळूच सगळ्यांच्या मधी इलो. तो ज्याम भियाल्ललो. खय खासखुस झाला, काय ह्यो कलकाल्लो!


' गोन्साल्विस ! भियातास काय हो?' . . . अण्णा


' म्हंजे काय? झाडीतसून एखादरो काळो वाघ येवन उडी घेयत तर झालाच आमचा ! उद्या तुमीच कोणाकतरी दाखायतल्यात, हे गोन्साल्विसाच्या पावलाचे ठसे, म्हणान!' . . . पेद्रु थरथारलो


उडाणटप्पू

1 comment:

अरुण सौदागर said...

झकास रे आर्य! ! थेट अरविंदची शैली