Tuesday, September 29, 2020

सुक्यो गजाली . . .

 महाभूकंप . . .

             वॉटसॅप वरती इल्लो मेसेज, आबा बायलेक वाचून दाखय होतो. 'धा दिवसात मोट्ठो भूकंप होतलो आणि सगळा जग नष्ट होतला !' बाजूकच बसलल्या सातवीतल्या बाळग्यान ता आयकल्यान. रडाक लागलो.

'बाबा ! माका भय दिसता, काय तरी करा महो !'. . . बाळगो

'ते काय करतले ? त्येंका हयली खाट थय सरकया म्हतला,तर जमना नाय '. . .आवस करवादली.

'तू वगी रव गो ! बाळग्या,अरे सगळेच जातलो ' . . .आबा

तितक्यात बारावीचे ऑनलाईन क्लास आटपून बेबला इला.
'बाळगो सो रडता ?'. . .बेबला

'भूकंपाक भियालो '. . .आवस

'कसलो भूकंप ? खय झालो ?. . . बेबला

'जावचो आसा ! धा दिवसात ! सगळा जग नष्ट होतला !
सगळे मरतले ! ' . . .बाळगो हुंदके दिवक लागलो.

'म्हणजे बारावीची परीक्षा दिवक नको !
क्लासाचीय कटकट नाय !'. . .बेबला नाचाक लागला.

उडाणटप्पू

No comments: