Sunday, September 27, 2020

सुक्यो गजाली . . .


  कायय आण !

        गणपतीच्या वेळची गजाल ! सीमा खुले केल्लले !आबा बांबार्डेकाराक मुंबैकर भावाचो फोन इलो, ' माटी बांधून ठे ! सजावटीचा सामान घेवन येतसय !'
  
   आबाचो भाव दरवर्षी न चुकता गणपतीक येता. येताना फुगोट्यो, केपी असला कायमाय पोराटोरांसाठी, आबा आणि आबाच्या बायलेक कपडे आणि गणपतीच्या सजावटीचा सामान घेवन येता.
     
 आबान भावाक, 'ठीक आसा.' असा सांगल्यान.

' नरम सो ? बरा नाय काय रे ? . . . भाव

' बरा आसा ! ये तू !' . . . आबा

' तरी पण ?' . . . भाव

' काय नाय रे !'. . . आबा 

' तुका आणखी काय आणूक होया,
लाजा नको ! सांग तू !' . . .भाव

' कोरोना सोडून कायय आण !' . . . आबा

उडाणटप्पू


No comments: