Friday, September 25, 2020

सुक्यो गजाली . . .



  गेट वे ऑफ गोवा


       पुतळ्याकडे उभे रवान आम्ही आबा येवची वाट बघी
होतो. मुंबई - गोवा रोड असल्याकारणान, बरेच मुंबैकर
गोव्याक जाय होते. 

        थय दिशादर्शक फलक नसल्याकारणान
जो येय तो आमच्या समोर गाडी थांबवन गोव्याचो
रस्तो इचारी. प्रत्येकाक रस्तो दाखवन दाखवन आम्हीय
वैतागललो. तितक्यात फॉरेनची एक उघडी जीप इली.
पाठोपाठ पाच-सहा मोटारसायकली! त्येंचोय ताफो
आमच्यासमोरच थांबलो.

'गोवा,...गोवा?' करूक लागले.

पेद्रुक काय सूचला कोणाक ठावक. त्येनी सरळ राजवाड्याच्या दरवाज्याकडे ब्वाॅट दाखयल्यान, 

'गोवा,...गोवा! गेट वे ऑफ गोवा!'

झाला! सगळे गाड्ये सूसाट राजवाड्यात घुसले.
आम्हीय आबाची वाट न बघता,थयसून सोमते गायब.

 उडाणटप्पू

No comments: