Monday, June 29, 2020

सुक्यो गजाली . . .

सुक्यो गजाली . . .

भिका-याची दया !

आबा इब्लिस तर तेची बायल एकदम साधीभोळी. मुखदुर्बल. स्वत:हून कधी कोणाक हटकीत तर शप्पत! लॉकडाऊन असल्याकारणान आबा घरात. किचनपासून मोरयेपर्यंत सगळ्याभर आबाची लुडबुड. वगीचच बायलेची कामा मात्र वाढय!

त्यादिवशी दुपारची जेवणा झाली. बायल आवराआवर करुन भायर इल्लल्या भिका-याक जेवाण घालूक गेली. पाठोपाठ आबा हजर.

'काय गो! गेलो आठवडोभर मी बघतसय, हेरशी कधी कोणाक गरीबाक फुटी चाय न दिणारा तू बायलमाणूस, हयत्या फाटक्या, दाढयेचे खुंट खराखरा खाजयणा-या बुरशा भिका-यार इतक्या सा मेहेरबान?' आबान बायलेक फैलार घेतल्यान.

'माका दया येता हो तेची!' . . बायलेचो खुलासो.

'इतकी कसली दया?' . . . आबाची शंका.

'तो थोडो थोडो तुमच्यासारखो दिसता!' . . बायल.

'काsssय?' . . . आबा किंचाळलोच.

उडाणटप्पू

6 comments:

Dattaprasad Gothoskar said...

लाॅक डाउन मधे मास्क लावल्यामुळे सगळे सारखेच दिसत आहेत.

अरुण सौदागर said...

हा हा हा!

Madhura Shirsat said...

यामुळे मालवणीची गोडी वाढीस लागेल!

Mukund Vaze said...

हा हा हा

Mukund Vaze said...

बायल म्हणता नवऱ्याक रात्री उरलेला आसा ता तुम्ही खातासात काय घालू कुत्र्याक ....तशी गजाल ही

aryamadhur said...

वा, वा!