Tuesday, November 10, 2020

सुक्यो गजाली . . .

पक्षीमित्र पेद्रु !

मध्यंतरी आबाक पेद्रुचो फोन इलो, ' आबा ! काय करतसय आज दुपारी ?'

' काय नाय, . .  आज माझो ऑफ . .साप्ताहिक सुट्टी !
 ख्येका रे ? '. . . आबा

' दुपारी जेवन खावन माझ्याकडे ये !' . . . पेद्रु

' ख्येका रे ?' . . . आबा

' पक्षांचे फोटो काढूक . . मी खळ्यात मातयेच्या भांड्यात पाणी ठेयतय रोज . . ता पिवक आणि भितुर न्हावक पक्षी येतत !' . . . पेद्रु

     आबा दुपारी कॅमेरो घेवन पेद्रुकडे हजर. पेद्रुच्या बेडरूमच्या खिडकेच्या एका कोपऱ्यात आबाचो कॅमेरो, तर दुसऱ्यात पेद्रुचो मोबाईल. दोघंय फिल्डिंग लावन बसले. बऱ्याच वेळान पेद्रु कुजबुजलो, ' इलो . . !'

   आबाक कायच दिसाक नाय. पेद्रुन क्लिक केल्याचो आवाज इलो. तितक्यात एक कुत्रो मात्र इलो. भांड्यातला पाणी लपाक, लपाक करीत दोन घोटात फस्त करून चलत रवलो !

' बघया फोटो !' . . . आबा
पेद्रून मोबाईल वरचो फोटो दाखयल्यान. एक कावळो पाण्यात चोच बुडय होतो !

उडाणटप्पू


Monday, November 9, 2020

सुक्यो गजाली . . .


नि: श्वास

खयचाय लग्नासून इली काय आबाची बायल खूपच अस्वस्थ आणि भावनिक होय. चडू लग्नाचा झाल्याचो तो परिणाम होतो.

' चडवाचा लगीन बरेपणान पडासर, आवाशीबापाशीच्या जीवाक घोर आसता ! एकदा काय लगीन झाला काय त्येंका मोकळो श्वास घेवक गावता !' . . . आबाची बायल

' हू !' . . . आबा

' माझा लगीन झाला, त्याय पावटेक आमच्या घरात अशीच परिस्थिती होती ' . . . बायल

' हू ! ' . . . आबा

' बाबांका थार नाय होतो. हय तर. एकीकडे लाडात वाढलेला चडू दुसऱ्या घराक जातला म्हणान त्येंका जड झाला आणि दुसरीकडे जबाबदारी मोकळी जातली, ह्येचा समाधान होता !' . . . ती

' हू !' . . . आबा

' लगीन लागला, त्येवा त्येंच्यानी नि:श्वास सोडल्यानी !' आबाची बायल

' पण त्येवापासून आमचो श्वास हयसर अडकान पडलो त्येचा काय?' . . . आबा

उडाणटप्पू

'

Sunday, November 8, 2020

सुक्यो गजाली . . .

चकणो

मध्यंतरी आबाच्या पोटात खूप दुखा. नुस्तो वळवळा. कोण म्हणा मुतखडो आसतलो, तर कोण म्हणा ॲपेंडिक्स.

सगळे गावठी उपाय करून आबा थकलो; पण वळवाटे येवचे काय थांबानत. शेवटी आबाच्या चुलत्यान आबाक मुंबैक न्हेल्यान आणि तपासून घेतल्यान. त्येवा त्येका ॲपेंडिक्सचो त्रास असल्याचा कन्फर्म झाला.

मुंबैक ऑपरेशनाक खूप खर्च येतलो, ह्या भितीन आबा गावाक परतलो. साहजिक आबाक भेटाक नंदू आणि पेद्रु इले.

' आबा, सरकारी हॉस्पिटलात तो नवीन डॉक्टर इलोसा, त्येच्या कडसून ऑपरेशन करून घेयनय !' . . . पेद्रु

' तो ? . . . आबा किंचाळलो, ' बघता भज्यार आणि मागता
वडो . . तो ? . . नको रे बाबा ! .   ॲपेंडिक्सचा ऑपरेशन करूचा सोडून माजी किडनी काढून दियत !'


उडाणटप्पू

Saturday, November 7, 2020

सुक्यो गजाली . . .

  
  मच्छी फ्राय !

            आबाची बायल खेडवळ आसली तरी नवनवीन खाद्यपदार्थ तयार करुची खूप हौस. लगीन झाल्यापासून आबा ' गिनिपिग '. सुरवाती, सुरवातीक बायलेक काय लागात ता आबा आणून दिय. बरेचदा पदार्थ बिघडा, पण बिचारो आबा, न कुरकुरता तो जळान कुरकुरीत झाल्लो पदार्थ चवीन खाय ! वर्षभरानंतर मात्र नव्याची नवलाई संपली आणि आबाचे कॉमेंट सुरू झाले.

        बायलेची आवड बघून, लगीन झाल्या, झाल्या म्हयन्याभरातच आबान बायलेक तिच्या वाढदिवसाची भेट म्हणान मायक्रोवेव्ह ओव्हन घेवन दिल्यान. सुरवाती, सुरवातीक बायल पदार्थ तयार करून दिय आणि आबा ओव्हनात भाजूचा काम करी.

     एकदा आबान बायलेक सकाळीच पापलेटा आणून दिल्यान आणि आपण आपल्या ऑफिसात गेलो. दुपारी जेवक इलो तर जेवणात पापलेट दिसाना.

' काय गो ! . . पापलेटा रातच्या जेवणाक ठेयलय ?' . . . आबा

' काय सांगू तुम्का ? . .ह्यो बघा कोळसो झालो त्येंचो ओवनात ! . . म्हतला ओवनात भाजूची ! . . भितर ठेयलय आणि सुरू केलय, तर नाचाकच लागली न्हय ओ ती !'' . . . बायल

उडाणटप्पू

Friday, November 6, 2020

सुक्यो गजाली . . .

भारनियमन !

        मध्यंतरी वाडीत भारनियमन सुरू होता, त्येवाची गजाल ! आयतवार आसल्याकारणान अख्ख्या कुटुंबाक सुटी होती. बायलपोरांसकट आबान पिकनिकीक जावचा ठरयल्यान. सकाळीच उठान आबान कपड्यांका इस्त्री करुक घेतल्यान. बायलेन कातु-चिरुक घेतल्यान. साडेसाताक लायट जातली ह्येची भिती दोघांकाय होती. बायलेचा वाटाप लावचा होता.

' गो, सव्वासात वाजले. पटापट कात !' . . . आबा

' तुमची इस्तरी आटपा लवकर !' . . . बायल

तितक्यात फाककन लायट गेली.  आबान गाळ मारून दिल्यान,
' फटकेचो वाको इलो तो !'

' पंद्रा मिन्टा आसत महो आजून . . येयत दिसता परत !' 
. . . आबाची बायल आशेर होती.

' डोंबाल तुजा !' म्हणीत आबान वीज विभागाक फोन लायल्यान.
' लायट बेगीना शी काढल्यात ?' . . . आबा

' भारनियमन ! . . आजपासून सव्वासात . . !' . . . वीज कर्मचारी

' आजचोच मुहूर्त बरो गावलो तुमका ? आमका आज पिकनिकीक
जावचा होता . . इस्त्री रवली . . बायलेचा वाटाप रवला !'
 . . . आबा करवादलो

' पिकनिकीक आजचोच बरो मुहूर्त शोधल्यास ?' . . . पलिकडसून खाडदिशी फोन बंद झालो. आबाची गाळ घशातच अडाकली.

उडाणटप्पू

Thursday, November 5, 2020

सुक्यो गजाली . . .

आबाची तक्रार

    सकाळी सकाळीच आबा बांबार्डेकार घराकडे इल्लो. माज्या समोर येवन बसलो. तो काय बोलुच्या आतच,

' आबा, बरा झाला इलय तो ! आज शंभरावी गजाल लिव्हची आसा. पण कोणती लिव काय कळणा नाय. बग, आठय हल्ली तुझ्यावांगडा काय मजेशीर घडलला काय.'

' उंडग्या ! असा काय आसला, तरी सांगुचय नाय !' . . . आबा तणतणा होतो.

' ह्या बग ! मी उंडगो न्हय. बरा उडाणटप्पू नाव आसा माजा. आवशिन ठेयलासा. ' . . . मी

' आसानेत ! पण फुकटची आमची बदनामी करतस गजालीत त्येचा काय !' . . . आब

' पण काय झाला, काय सांगशीत काय नाय नीट !' . . . मी

' काय  सांगतलय ! खासगी भानगडी लिहितय आणि भांडणा लावन दितय. एकतर सुरग्या बोलाचा बंद झाला आणि घराकडे रात्रभर बायल भांडतासा.' . . . आबा चिडान

उडाणटप्पू

Wednesday, November 4, 2020

सुक्यो गजाली . . .


चडवाची खरेदी

      शाळेचा गॅदरिंग आसला काय आबा बांबार्डेकार खूपच चिंतेत पडता. आता चडू कितक्याक खड्डयात घालीत ह्येचो नेम नसता. चडवाचो कसलो तरी नाच होतो. त्येच्यासाठी चडवाक घेवन आबाची खरेदी सुरू होती. कापड दुकानात चडवान मस्त ओढणी खरेदी केली. आबान दुकानदाराक इचारल्यान, ' कशी ?'

' मस्त दिसता. शोभली चडवाक !' . . . दुकानदार

' पैशे इचारतसय मी !'. . . आबा

' किती, काय इचारा महो ! सत्तर द्या !' . . . दुकानदार
  
       थयसून चपलाच्या दुकानात गेलो. चडवान सँडल घेतल्यान. आबान दुकानदाराक इचारल्यान, ' किती ?'

' सहा नंबर. परफेक्ट आसा !' . . . दुकानदार

' नंबर न्हय हो. पैशे ?'. . . आबा

' भाव इचारा . . ! अडिचशे द्या !' . . . दुकानदार

       थयसून दोघाय कानातली घेवक गेली. चडवान कानातली पसंत केल्यान. आबान दुकानदाराक इचारल्यान,
' भाव ?'

' आज येवक नाय तो. बरा नाय त्येका . . घरातच थांबलोसा !'
 . . . दुकानदार

' भाव म्हंजे, तुमचो भाव न्हय हो ! कानातल्याचो दर इचारतसय !' . . . आबा

उडाणटप्पू